दुसऱ्यांसाठी जगणं हेच खरं जगणं..
अभिनाथ शिंदे - चेअरमन
व्यंकटेश फाऊंडेशनचं ध्येय आहे की, केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे. त्यात यथाशक्ती योगदान द्यायचं. इतरांनाही या कार्यामध्ये सामावून घ्यायचं. ग्रामीण आणि शहरी भागात, जिथे जिथे काही नवीन काही बदल घडवता येतील तिथे तिथे विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये सळसळता उत्साह आणि अशा जागृत करायच्या. गेल्या अनेक वर्षांपासून व्यंकटेश फाऊंडेशन विविध क्षेत्रांमध्ये भरीव काम करत आहे. याचा आनंद यासाठी आहे की, लोकसहभाग लक्षणीय पद्धतीने वाढत आहे. लोकांना या कार्यांत जोडले जायला मनातून इच्छा होत आहे. यातून मानवतेची एक मजबूत साखळी तयार होत आहे, जी बुलंद भारत निर्मितीसाठी सक्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, बाबा आमटे, एपीजी अब्दुल कलाम, रतनजी टाटा, पोपटराव पवार अशा अनेकानेक महान व्यक्तीच्या विचारांचा आणि कार्याचा आमच्यावर प्रभाव आहे. सामाजिक बांधिलकी जपताना आम्हाला समाजातूनच प्रेरणा मिळते. विश्वास मिळतो.
सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहावा, चांगली जीवनशैली विकसित व्हावी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक इ. सर्वांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन सातत्याने प्रयत्नशील होती, आहे आणि कायम राहील. या चळवळीमध्ये आपले स्वागत आहे.
व्यंकटेश फाऊंडेशन विषयी
लोकसहभाग
तंत्रज्ञानाची साथ
लोकहितार्थ उपक्रमांची रचना व बांधणी
दूरदृष्टी
परिवर्तन
व्यंकटेश फाऊंडेशन हे आमचे नव्हे तर आपले फाउंडेशन आहे. आम्ही केवळ पहिले पाऊल उचलले आणि समाजातील तमाम लोकांनी आम्हाला साथ दिली. आमच्या पावलांना बळ दिले. पुढे-पुढे जाण्यासाठी हिम्मत दिली.
व्यंकटेश फाऊंडेशनची स्थापना सन २०१५ मध्ये अहमदनगर जिल्ह्यतील, बालमटाकळी येतील माळरानावर झाली. तिथे पेरलेली समाजभावना, मुळं घट्ट करत सर्वदूर पोहोचू लागली. आता अहमदनगरमध्ये संस्थेचे मुख्य कार्यालय आहे आणि कार्य महाराष्ट्रभर.
क्षेत्र कुठलेही असो – आरोग्य, कृषी, अर्थ, कला, क्रीडा, शिक्षण, महिला विकास, विद्यार्थी विकास, समाज प्रबोधन, मानवकल्याण, ग्रामविकास, इ. अनेक क्षेत्रात आजवर व्यंकटेश फाउंडेशनने अखंडपणे आणि भरीव काम केले आहे आणि यापुढेही सुरूच राहील.
आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणे आणि भारतातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही देखील फाऊंडेशनची उद्दीष्टे आहेत.
व्यंकटेश फाउंडेशनद्वारे होणारे प्रत्येक कार्य हे लोकसहभाग, तंत्रज्ञानाची साथ, लोकहितार्थ उपक्रमांची रचना व बांधणी, दूरदृष्टी आणि परिवर्तन या पंचसूत्रीच्या आधारेच केले जाते. अधिक व्यापक उपक्रमांसाठी फाउंडेशन हे चांगले काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना देखील सोबत घेऊन काम करते. संघभावनेतून अधिक उत्तम, दीर्घकालीन आणि प्रभावी काम उभे राहते यावर आमचा विश्वास आहे.
शेवटी काय, दुसऱ्यांच्या कामी येणं आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवणं यासारखं दुसरं समाधान नाही.