• Home
  • नारीवंदन
Spread the love

नारीवंदन

यामध्ये आपण दिलेली देणगी महिला सक्षमीकरणासाठी वापरली जाते. भारतीय नारी स्वाभिमानी आहे. तिला सहानुभूतीची नव्हे तर मदतीची गरज आहे. ती अवघे विश्व नव्याने उभे करु शकते. हवी असते फक्त साथ.
व्यंकटेश फाऊंडेशन ही साथ देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सोबत चालत आहे. साथ आणि आधाराचे हात देत आहे. ही चळवळ अधिक बलवान करायची आहे. आपण दिलेल्या देणगीमधून महिला सक्षमीकरणाची ही चळवळ अधिक सक्षम होण्यास मदत होईल. महिलांना आत्मसन्मान, स्वावलंबी जीवन मिळेल. नवा इतिहास रचण्यासाठी पाठबळ मिळेल. नव्या गोष्टी शिकायला, नवे तंत्रज्ञान आत्मसात करायला उर्जा मिळेल. आणि मग ही देणगी खऱ्या अर्थाने “नारीवंदन” ठरेल.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..