• Home
  • विद्यादान
Spread the love

विद्यादान

आज खूप हुशार मुले-मुली समाजामध्ये असे आहेत, की जे उत्तम बुद्धिमत्ता असून देखील उत्तम शिक्षण घेऊ शकत नाही. कारण पैसा. घरची बिकट परिस्थिती. आई-वडील निरक्षर किंवा कमी शिकलेले. खायला महाग तिथे मग शिक्षण कसे सुरु ठेवणार. असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर असतात. व्यंकटेश फाऊंडेशन “विद्यादान” माध्यमातून गरीब हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारते. त्यांच्या शिक्षणाचा खर्च देते. शैक्षणिक साहित्य पुरवते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करते. आपण “विद्यादान” देणगी दिल्यास उद्याची सुंदर भारताची पिढी निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यातूनच भारताचे उच्च अधिकारी, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू घडतील.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..