आरोग्य

आपण ही म्हण नेहमीच ऐकत आलो आहोत की, “जान है तो जहान है”.! अगदी जेव्हा कोरोनाचे महासंकट आले होते तेव्हा, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देखील राष्ट्राला संबोधित करताना हेच शब्द वापरले होते.
माणसाकडे कितीही सुखवस्तू असल्या तरी आरोग्यामध्ये जर बिघाड असेल तर त्याला चैन पडत नाही. ती व्याधी-पीडा त्याला सतावत असते. या विषयाची खोली आणि गरज लक्षात घेऊन व्यंकटेश फाऊंडेशनने अगदी पहिल्यापासूनच आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्याचे ठरवले. आणि केवळ ठरवलेच नाही तर, त्या दृष्टीने सक्रिय कार्य देखील केले. आणि हा वारसा पुढेही सुरूच आहे.
निरोगी जीवन हीच खरी संपत्ती आहे. गावपातळीपासून तर शहरांपर्यंत सर्वांना उत्तम आरोग्य मिळावे व त्यांच्या व्याधी-पीडा दूर व्हाव्यात यासाठी आम्ही आरोग्य क्षेत्रातील सेवाकार्याची विविध उपक्रमांची उत्तम आखणी व अंमलबजावणी केली. नागरिकांनी त्यांस उदंड प्रतिसाद दिला आणि असंख्य आशीर्वाद देखील.
व्यंकटेश फाऊंडेशनची आरोग्य चळवळ
रक्तदान शिबीर

नेत्र तपासणी शिबीर

आरोग्य तपासणी शिबीर

महिला आरोग्य मार्गदर्शन शिबीर

मूळव्याध तपासणी शिबीर

डायबेटीज, रक्तदाब मार्गदर्शन

डॉक्टरांचा सन्मान व पुरस्कार
