• Home
  • गौरव पुरस्कार
Spread the love

गौरव पुरस्कार

प्रोत्साहन माणसाला बळ देतं. योग्य वेळी पाठीवरती पडणारी कौतुकाची थाप येणाऱ्या काळात इतिहास घडवू शकते. समाजामध्ये उत्तम काम करणारे खूप लोक आहेत. त्यांच्या कार्याला मनापासून वंदन करणं, त्यांना पुरस्कार देऊन गौरव करणं, हे व्यंकटेश फाऊंडेशनने नेहमीच आपले कर्तव्य मानले आहे.

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण कायम ऋणी असतो. हे समाजऋण फेडण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी अनेक व्यक्तिमत्वं झटत असतात. समाजात परिवर्तन घडवत असतात. नवे विक्रम रचत असतात. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, कला, साहित्य अशा अनेक क्षेत्रात निरपेक्षपणे काम
करत असणाऱ्या महावीरांना आम्ही सलाम करतो.

व्यंकटेश फाऊंडेशनद्वारा दिले जाणारे गौरव पुरस्कार

आदर्श शेतकरी पुरस्कार

 

आदर्श पत्रकार पुरस्कार

 

क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल क्रिडाभूषण पुरस्कार

 

कृतज्ञता पुरस्कार

 

आदर्श शिक्षक पुरस्कार

 

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजगौरव पुरस्कार

 

स्वयंसेवक बना. व्यंकटेश परिवारात सामिल व्हा!