• Home
  • महिला सक्षमीकरण
Spread the love

महिला सक्षमीकरण

आज आपण सर्व पाहतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. महिलांमध्ये असलेल्या क्षमतांना आकाशाची देखील मर्यादा नाही. ती सर्वोच्च झेप घेऊ शकते. असे असतानाच अगदी शेवटच्या स्तरापर्यंत जनजागरण आणि महिला सक्षमीकरणास वाव आहे हे व्यंकटेश फाउंडेशनने जाणले. आणि मग सुरु झाले कार्य महिला सक्षमीकरणाचे.

आजची महिला काहीही करू शकते. प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकते. दृढ संकल्प सिद्धीस नेऊ शकते. तिला जर थोडी-फार साथ मिळाली तर ती  नवे विक्रम रचू शकते. आम्ही महिलांनी स्वावलंबही व्हावे यासाठी अखंडपणे चळवळ चालवतो. विशेषतः ग्रामीण भागात याची फार गरज आहे. चूल आणि मूल यापलीकडे जाऊन हातात बांगड्या घालणारी आजची महिला त्याच हाताने भारताचा नवा इतिहास रचेल हा आम्हाला विश्वास आहे.

महिला उद्योजक घडविण्याचे आम्ही सत्र सुरु ठेवले. जिथे जिथे त्यांना अडचणी समस्या येतील, त्या त्या सोडविण्यासाठी फाऊंडेशन या सर्व माता- बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महिला केवळ सक्षम करणे इतकेच आमचे ध्येय नाही, तर त्या निरोगी आणि आनंदी देखील असल्या पाहिजेत यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

व्यंकटेश फाऊंडेशनची महिला सक्षमीकरण चळवळ

महिलांना कर्जसहाय्य करून स्वावलंबी व उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा

 

व्यवसाय प्रशिक्षण शिबीर

 

आर्थिक साक्षरता व सबलीकरण मार्गदर्शन

 

निरोगी जीवनासाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिरे

 

स्वयंसेवक बना. व्यंकटेश परिवारात सामिल व्हा!