• Home
  • युवकांसाठी नवी दिशा
Spread the love

युवकांसाठी नवी दिशा

शिक्षण झालंय पण हाताला काम नाही, असं बेरोजगारीचं चित्र आजूबाजूला नेहमी दिसत असतं. युवकांमध्ये काहीतरी नवं उभारण्याची, साकारण्याची धमक असते पण नक्की काय आणि कसं करावं यासाठी त्यांना कधी-कधी मार्ग सापडत नाही. अशी परिस्थिती यावर उपाय देण्यासाठी आणि तरुणाईला नवी रोजगार व दिशा देण्यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन सातत्याने काम करत आहे.

स्वतःचा व्यवसाय – उद्योग करून आपल्या पायावर उभे राहणे ही मोठी गोष्ट आहे. यासाठी आम्ही तरुणाईला प्रेरित करत आहोत आणि पाठीशी देखील उभे राहत आहोत. युवकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील शिबिरे, प्रशिक्षण देऊन त्यांच्या वाटा मोकळ्या करत आहोत. नव्या युगाबरोबर सर्वांनी पाऊल टाकावे यासाठी आमचा प्रयास यशस्वी होत आहे . सक्षम युवक हे सक्षम महाराष्ट्राची निशाणी आहे आणि ही निशाणी ठळक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

व्यंकटेश फाऊंडेशनद्वारा युवा उद्योजकता चळवळ

तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन

 

सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसाय व नोकरी मेळावे

 

उद्योजकांसाठी नवे तंत्रज्ञान व मार्केटिंग सेमिनार्स

 

व्यवसाय-उद्योग उभारणीसाठी कर्जसहाय्य मार्गदर्शन

 

डिजिटल क्रांतीमध्ये युवा पिढीला दिशादर्शन

 

स्वयंसेवक बना. व्यंकटेश परिवारात सामिल व्हा!