• Home
  • शेतकरी विकास
Spread the love

शेतकरी विकास

शेतकरी हा राजा आहे. हे आम्ही म्हणतोही आणि मानतोही! आज शेता-शिवारात राब-राब राबणारा शेतकरी भारताचा कणा आहे. शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी व्यंकटेश फाऊंडेशनने काही ठोस पावलं उचलली. स्पष्ट आराखडा तयार केला. अगदी मुळापासून सुरुवात केली. गावोगावी त्याची अंमलबजावणी केली आणि चित्र बदलायला लागलं. हाती घेतलेल्या कामांना यश मिळू लागलं.

शेतकरी बांधव आपल्या पारंपरिक शेतीबरोबरच नव्या गोष्टी शिकण्यासाठी पुढाकार घ्यायला लागले. आपले उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना दिशा पाहू लागले. नेहमीच्या शेतीबरोबरच अजून नवे जोडधंदे कसे सुरु करता येतील हे आम्ही सांगण्यासाठी विविध शिबिरे घेत आहोत. आपल्या शेतातील माल केवळ भारतातच नव्हे तर विदेशी बाजारपेठेत जाऊ शकतो हे आम्ही त्यांच्या मनावर ठसवत आहोत. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आणि अत्यंत मागणीची असल्यामुळे त्यातही सुजलाम सुफलाम भविष्याचे चित्र रंगवू लागलो.

व्यंकटेश फाउंडेशनने शेतकऱ्यांना केवळ स्वप्नच दाखवली नाहीत तर त्यांच्या असलेल्या असीमित शक्यतांचा परिचय देखील त्यांना करून दिला. दिवसेंदिवस ही कृषी चळवळ अधिक आहे. शेतकरी नव्या युगाशी जोडला जात आहे. हे कार्य अखंडपणे चालणारे आहे. कधीच न संपणारे. पण नित्य नवे बदल घडवणारे. धरणी मातेचे ऋण तर कधी फिटणार नाहीत पण अशी सेवा करून मिळणारी संतुष्टी काही अनोखीच.

व्यंकटेश फाऊंडेशनची शेतकरी विकास चळवळ

शेतीतील उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे

 

सेंद्रिय शेती मार्गदर्शन

 

शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे

 

शेतीमालाची निर्यात

 

दर्जेदार बियाणे लागवड

 

स्वयंसेवक बना. व्यंकटेश परिवारात सामिल व्हा!