शैक्षणिक
आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्व. एपीजे अब्दुल कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ते म्हणत “आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याच्या बुलंद भारताचे भविष्य आहे.” आम्ही त्यांच्या आदर्श तत्वांचा पूर्णपणे स्वीकार केला. त्याच पाऊलखुणांवर पुढे जायचे ठरवले. व्यंकटेश फाऊंडेशन ग्रामीण तथा शहरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती कार्य करत आहे. घरची परिस्थिती बिकट असतानाही हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच आज अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रात विविध ठिकाणी चमकत आहेत. बालवयापासूनच मुलांना आर्थिक ज्ञान मिळावे यासाठी विशेष उपक्रम आम्ही राबवतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. सर्वच स्तरातील विद्यार्थी पुढे जावेत, आपल्या परिवाराचे, समाजाचे आणि देशाचे नाव मोठे करावे, या भावनेतून आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीय संस्कार आज संपूर्ण जगात पूज्य आहेत.
त्यांचा गौरव सर्वत्र केला जातो. तेच संस्कार, शिकवण एक आदर्श नागरिक घडवताना उपयोगी पडते. व्यंकटेश फाऊंडेशनने विद्यार्थीरुपी हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उदात्त कार्य चालवले आहे. अर्थात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहयोगानेच !