सामाजिक चळवळ
एक गोष्ट आम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की, व्यंकटेश फाउंडेशनचे प्रत्येक काम, प्रत्येक पाऊल जे समाजाभिमुख आहे. “दुसऱ्यांसाठी जगणे; हेच खरे जगणे” हा सामाजिक संस्कार आमच्यावर झालेला आहे. आणि आम्ही हेच ब्रीद मनाशी घट्ट बाळगून सामाजिक चळवळ राबवत आहोत.
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आमच्या मनावर तीव्र परिणाम होतो. वेदना जाणणारी संवेदना कायम सचेत असते. मदतीसाठी मानवतेचा हात आपसूकच पुढे होतो. नेमकी कशाची पोकळी आजूबाजूला आहे, कोणत्या गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे याचा शोध नित्यनेमाने सुरु असतो. आणि त्यापाठोपाठ मदतकार्य, यथाशक्ती विविध उपक्रमांचे आयोजन सुरु असते. उद्देश स्वच्छ आहे, “कुणाच्या तरी कामी येणे “, बस्स…
लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसमावेशक सर्वोपयोगी सामाजिक चळवळ दिवसेंदिवस मजबूत होत आहे.