गोशाळा (गोपालन व गोसंवर्धन)

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला आईचे स्थान आहे. जन्मदात्या आईप्रमाणेच गोमातेची सेवा करणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. आज अनेकांना गाईची सेवा, संगोपन, पूजन करण्याची इच्छा असते, तीदेखील व्यंकटेश फाऊंडेशनच्या गोशाळेमुळे पूर्ण होते.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात, बालमटाकळी या गावात आपली गोशाळा आहे. गोशाळा कसली; गोमातांचं माहेरचं आहे ते. गोशाळेमध्ये आज शेकडो गावरान गाई आहेत. त्यांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित डॉक्टर आहेत. त्यांच्या चाऱ्या -पाण्याची आणि खुराकाची येथे पोटच्या लेकरासारखी काळजी घेतली जाते. शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमालीचे स्वादिष्ट आहेत. तुम्हीही चाखाल तर प्रेमात पडाल.
ग्रामीण भागात समस्याही येतात. पण त्यावर मात करत, नवे उपाय शोधात ही गोसेवा सुरु आहे. अजूनही रचनात्मक विकसित करण्याचा आराखडा बनवला आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या सहयोगातून ते स्वप्न देखील पूर्ण होईल. या गाईंच्या सहवासात आल्यावर सगळी दुःख हलकी झाल्यासारखे वाटते. या गाईंनाही माणसांचा लळा आहे. त्यांना स्पर्शाची भाषा समजते.
आपल्या सेवकांना ती डोळेभरून आशीर्वाद देते.
व्यंकटेश फाऊंडेशनद्वारा संचालित गोशाळा
गोपालन व गोसंवर्धन

दूध व दुग्धजन्य पदार्थ

गांडूळखत

गोवऱ्या

दत्तक गाय – संगोपन पालकत्व

गोपूजन
