http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
  • एप्रिल 21, 2020
  • admin
  • अनकॅटेगराईज्ड
Spread the love

व्यंकटेश फाऊंडेशनचं ध्येय आहे की, केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे. त्यात यथाशक्ती योगदान द्यायचं. इतरांनाही या कार्यामध्ये सामावून घ्यायचं. ग्रामीण आणि शहरी भागात, जिथे जिथे काही नवीन काही बदल घडवता येतील तिथे तिथे विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये सळसळता उत्साह आणि अशा जागृत करायच्या. गेल्या अनेक वर्षांपासून व्यंकटेश फाऊंडेशन विविध क्षेत्रांमध्ये भरीव काम करत आहे. याचा आनंद यासाठी आहे की, लोकसहभाग लक्षणीय पद्धतीने वाढत आहे. लोकांना या कार्यांत जोडले जायला मनातून इच्छा होत आहे. यातून मानवतेची एक मजबूत साखळी तयार होत आहे, जी बुलंद भारत निर्मितीसाठी सक्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, बाबा आमटे, एपीजी अब्दुल कलाम, रतनजी टाटा, पोपटराव पवार अशा अनेकानेक महान व्यक्तीच्या विचारांचा आणि कार्याचा आमच्यावर प्रभाव आहे. सामाजिक बांधिलकी जपताना आम्हाला समाजातूनच प्रेरणा मिळते. विश्वास मिळतो. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहावा, चांगली जीवनशैली विकसित व्हावी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक इ. सर्वांसाठी प्रामाणिकपणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..