http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

व्यवसाय आणि व्यवसायातील पैसा

पैसा हा व्यवसायासाठी भांडवल म्हणून खूप महत्वाचा असतो. व्यवसाय सुरु करतांना किंवा व्यवसाय चालू असतांनाएक ठराविक रक्कम घेऊन आपण व्यवसायात उतरत असतो. पैसा व्यवसायात येतो आणि मग व्यवसायातआलेला पैसा आपले मूळ रूप बदलत असतो. आज आपण प्रामुख्याने व्यवसायातील पैसा यावर बोलणारआहोत. पैसा हा व्यवसायातील महत्वाचा घटक असतो. एक ठराविक रक्कम आपण व्यवसायात आणलीकि त्याचे रुपांतर व्यवसायाची जागा, ऑफिस, फर्निचर, नोकरांचा पगार, कच्चा माल यामध्येहोते आणि जेव्हा वस्तू तयार होते, ती वस्तू बाजारात ग्राहकांपर्यंत गेली कि त्याचेरुपांतर विक्रीनंतर पुन्हा पैशात होते. विक्री व्यवस्था वस्तूचे रुपांतर पैशात करते.म्हणजे पैसा पुन्हा मूळ रुपात येतो पण या वेळी पैशाचे मूल्य कदाचित वाढलेले असते. त्यालाचआपण नफा असे म्हणतो. सुरवातीच्या काळात व्यवसायात नफा फारसा निदर्शनास येत नाही कारणआपण व्यवसायात लावलेला पैसा वस्तू सोबतच इतर स्थिर संपत्ती मध्ये गुंतलेला असतो. पैशाचीवाढ करणे हा खरा व्यवसायाचा हेतू असतो, सेवा उद्योगामध्ये पैसा त्या उद्योगातील सेवेवरअवलंबून असतो. यात वस्तू हा घटक नसल्या कारणाने किंवा अत्यल्प असल्या कारणाने वस्तूवरकेलेली गुंतवणूक कमी प्रमाणत असते. कच्चा माल, मशिनरी, या गोष्टी फार प्रमाणात लागतनाही. म्हणून याच अनुशंगाने आज आपण छोट्या किंवा मध्यम उद्योग व्यवसायावर बोलणार आहोतकि जे व्यवसाय बऱ्याच अंशी व्यवसाय मालकाच्या भरवश्यावर, किंवा त्याच्या निगराणीखालीचालत असतात. ‘शटर बंद तर मीटर बंद’ या प्रकारातील व्यवसाय आज आपल्या नजरेसमोर मोठ्याप्रमाणात आहेत. जोपर्यंत व्यवसायाचा मालक व्यवसायात लक्ष घालून आहे तो पर्यंत व्यवसायव्यवस्थित चालतो अशी आपली मानसिकता बनते आणि मग व्यवसायाला कुठेतरी मर्यादा येतात.पण हि मानसिकता बदलली तर व्यवसाय आँटो पायलट मोड वर येतात आणि तेंव्हाच तो व्यवसायमोठा होतो. पण यात नियोजना सोबत पैसा कामाला लावावा लागतो.

पैसा…..

मुळात पैशाची व्याख्याकरणे किंवा त्याचे स्वरूप ठरविणे जरा अवघडच आहे प्रतेकासाठी पैशाची किंमत हि वेगळीअसू शकते. शंबराची नोट दिसायला एकसारखी असली तरी तिचे मूल्य प्रत्येकासाठी वेगवेगळेअसू शकते. शेतात शंबर रुपयासाठी दिवसभर काम करणारा शेतमजूर आणि एखाद्या हॉटेलात जेवणानंतर बिलासोबत टीप म्हणून शंबर रुपये ठेवणारा एखादा गृहस्थ या दोघांत शंबर रुपयाचेमूल्य वेगळे असते. आज कपाटात ठेवलेली शंभराची नोट पाच वर्षानंतर जरी तशीच राहिली तरीतिचे मूल्य कमी झालेले म्हणजे बदललेले असते. तीच नोट जर बँकेत एफ. डी. करून ठेवली किंवाअन्य कुठे गुंतवणूक केलेली असेल तरी तिचे मूल्य पाच वर्षानंत वाढलेले म्हणजे बदललेलेअसेल म्हणून आजचा पैसा आणि उद्याचा पैसा यात फरक असतो. तो कधीच सारखा नसतो. म्हणूनपैसा दिसायला जरी एकसारखा असला तरी तिचे मूल्य एकसारखे कधीच नसते म्हणून व्यावसायकानेव्यवसाय समजून घेण्याच्या अगोदर व्यवसायातील पैसा समजून घेणे गरजेचे आहे.

व्यवसायाची मोठी जागा,मोठं ऑफिस, खूप सारे कर्मचारी, मोठं गोडाऊन आणि त्यात भरलेला खूप सारा माल, याचसोबतव्यवसायाचा आवाका मोठा आहे म्हणून तो व्यवसाय मोठा असं होत नाही. मुळात त्याचा नफाभांडवलाच्या तुलनेत किती आहे त्यावर व्यवसाय कसा आहे हे दिसून येते. ज्याला व्यवसायातीलपैसा समजला तो व्यवसायात कधीच अपयशी ठरत नाही.

समजा एक व्यावसायिकएक कोटी रुपयाचं भागभांडवल लाऊन जर तो व्यावसायिक वर्षाला सर्व खर्च वजा जाता निव्वळनफा दहा लाख रुपये कमवीत असेल आणि दुसरीकडे दुसरा व्यावसायिक दहा लाख रुपयाचे भागभांडवललावून पाच लाख रुपयापर्यंत नफा कमवत असेल तर कोणता व्यवसाय मोठा?

यामध्ये दोन उत्तरेतुमच्याकडून येऊ शकतील कोणी पहिल्या व्यावसायिकाला मोठे म्हणेल तर कोणी दुसर्या व्यावसायिकालापण यात पहिला व्यावसायिक पूर्णपणे आपल्या व्यवसायात फेल गेला आहे अस्सच मी म्हणेल.जर एवढी मोठी एक कोटी रुपयाची गुंतवणूक करून जर तो वर्षाला दहा लाख रुपयेच नफा कमवीतअसेल तर त्याने तो व्यवसाय बंद करून सरळ ती रक्कम बँकेत एफ. डी. करावी तेवढी नफ्याचीरक्कम तो घर बसल्या कमवू शकतो. म्हणून व्यवसाय करत असतांना आपल्याला अगोदर पैसा समजला पाहिजे.

याच उदाहरणात दुसराव्यावसायिक हा यशस्वी उद्योजक आहे असं मी म्हणेल त्याला पैसा समजला आहे. कारण त्यानेकमी भांडवल गुंतवून तो जास्तीचा नफा कमावतो आहे. म्हणून व्यवसाय करतांना व्यवसायाचाROI रिटर्न ऑफ ई्नवेस्टमेंट कसा आहे हे पाहणे गरजेचे आहे. एका सिनेमा टाकीच्या समोरचाचहा वाला मोठा कि सिनेमा टाकीचा मालक मोठा हे आपण आपले ठरवायचे आहे. पण हे ठरवतानात्यांचा व्यवसायाचा आवाका किंवा डोलारा बघू नका तर त्याचे खेळते भांडवल, व्यवसायातीलचलन, पैश्याची आवक, खर्च, आणि निव्वळ नफा याचा विचार करा. असच एका व्यावसायीककार्यशाळेत मी दोन उद्योजकांना व्यासपीठावर बोलावलं होतं आणि त्यांना मुद्दाम त्यांचाव्यवसायाचा टर्नओवर विचारला, त्यात एका व्यावसायिकाचा वार्षिक टर्नओवर एक कोटी रुपयेएवढा होता आणि एक असा दुसरा व्यावसायिक होता की त्याचा वार्षिक टर्नओवर पन्नास लाखरुपये एवढा होता. मी त्यांना तसच स्टेज वर दोन बाजूने उभं केलं आणि प्रेक्षकातील इतरव्यावसायीकांना प्रश्न केला की या दोन्ही मधुन कोणता व्यावसायिक मोठा किंवा यशस्वीआहे असं तुम्हाला वाटतं? साहजिकच तुम्ही जे उत्तर देणार आहात तेच उत्तर कार्यशाळेतीलउपस्थितांनी दिली. एक कोटी रुपये टर्नओवर असणारा व्यावसाईक दुसऱ्या पन्नास लाख रुपयेटर्नओवर असणाऱ्या व्यावसायीकापेक्षा मोठा आहे असं त्यांनी सांगितलं पण पहिल्या एक कोटीरुपये टर्नओवर असलेल्या व्यावसायिकाचा वार्षिक नफा साधारण बारा ते पंधरा लाख रुपयेएवढा होता पण जो दुसरा व्यावसाईक जो पन्नास लाख रुपयाचा टर्नओवर करीत होता त्याचा व्यावसायिकवार्षिक नफा वीस ते बावीस लाख रुपये होता. तेंव्हा सगळ्यांच्या हे लक्षात आलं कि टर्नओवरजास्त म्हणजे व्यावसायीक मोठा किंवा यशस्वी असं व्यवसायात होत नाही. म्हणूनच व्यावसायीकप्रक्टिस करत असतांना जे व्यावसायिक माझे क्लायंट आहेत त्यांना मी त्यांचा टर्नओवरन विचारता आधी त्यांचा नफा विचारतो. कारण तुमचा टर्नओवर मोठा आहे म्हणून तुम्ही मोठेव्यावसायिक किंवा यशस्वी उद्योजक आहातच असं होत नाही तर तुमच्या टर्नओवर सोबत तुमचाव्यावसायीक नफा देखील मोठा असला पाहिजे. एखाद्या किराणा दुकानाच्या मालका पेक्षा त्याच्याचसमोरच्या गाळ्यात सलून चालवणारा सलून व्यावसाईक किराणा दुकानाच्या व्यावसायिकापेक्षामोठा असू शकतो त्याचा टर्नओवर भले कमी असेल तरी.

व्यवसाय सुरु करतांनात्याचे आर्थिक अंगाने विचार करणे जरुरी असते. ते नाही केले तर व्यवसाय बंद करण्याचीवेळ येऊ शकते. माझ्या एका मित्राने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आणि व्यवसाय करण्याच्याविचाराने तो प्रेरित झाला असल्याने स्वता:च मेडिकल दुकान सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला. नोकरी करून कुणाची गुलामी करायची नाही हा विचार घेऊन तो व्यवसायात आला. शहराच्यागर्दीच्या ठिकाणी व्यवसाय सुरु करून एक यशस्वी व्यावसायिक होण्याचा त्याचा निर्णय व्यावसायिकमानसिकतेतून चांगला होता. त्याने शहरात चांगल्या मार्केटच्या ठिकाणी गाळा घेतला, सहाजिकचदुकान बाजारात मोक्याच्या ठिकाणी असल्या कारणाने दुकानाचे डीपाॅजिट आणि भाडे देखीलजास्त होते. साधारण तीस हजार रुपये महिना या प्रमाणे दुकानाचे भाडे होते. आणि आता खरेव्यवसायासाठी लागणारे भांडवल त्याला लागणार होते म्हणून वडिलांनी आपल्या नोकरीतून वाचवलेलेपैसे त्याला व्यवसायासाठी दिले. पण जर ते त्याला वडिलांकडून मिळाले नसते तर त्यालाबँकेकडून निदान बारा-चौदा टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागले असते. घरचा पैसाआहे असं समजून तो आपण कुठेच हिशोबात धरत नाही. इथेच मराठी उद्योजक चुकतो. पैसा वडिलांकडूनजरी मिळाला असला तरी तो आता व्यवसायाचा पैसा झाला आहे त्याचा परतावा जसा आपल्याला बँकेलाकरावा लागला असता तसाच तो वडिलांकडून, नातेवाईकांकडून, मित्राकडून घेतलेल्या पैशाचाकरणे गरजेचा आहे. (जर तुम्हाला व्यवसायातील पैसा समजला असेल तर) कारण आपला पैसा आपलाअसतो आणि व्यवसायाचा पैसा व्यवसायाचा असतो. त्या मित्राने आता व्यवसायाला सुरवात केलीहोती. फर्निचर बनवले, पूर्ण लीगल कागदपत्रे, लायसन्स यासाठी पण खर्च केला व्यवसायातमाल पण भरला आणि एक व्यावसायिक म्हणून त्याने नव्या उत्साहात व्यवसायाला सुरवात केली.त्याने व्यवसायात आणलेल्या पंधरा लाख रुपयाचे रुपांतर आता पूर्णपणे भांडवलात, स्थिर,अस्थिर संपत्तीत झाले होते. त्याचा व्यवसायासाठी महिन्याचा खर्च दुकानाचे भाडे ३०,०००(तीस हजार रुपये), वडीलांना करावी लागणारी पैशाची परतफेड (बँकेकडून कर्ज घेतले असतेतर बँकेचा हफ्ता) २५,०००(पंचवीस हजार रुपये), लाईट बिल आणि इतर साधारण खर्च साधारण५,००० (पाच हजार रुपये) असा एकूण ६०,०००(साठ हजार रुपये) रुपये खर्च होता. या हिशोबाततो स्वतः दुकान चालवत असल्याने कर्मचारी पगाराचा कोणताच खर्च नव्हता. समजा जर महिन्यालासाठ हजार रुपये खर्च जरी काढायचा म्हटलं तरी दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा दुकानातूनयेणे अपेक्षित होते. त्यासाठी विक्री किती हा हिशोब त्याच्या पलीकडे होता. तरीही ह्यासर्व हिशोबात त्याचा पगार कुठेच नव्हता आणि दिवसेंदिवस आपण व्यावसायिक बाजूने चुकतआहोत हे त्याच्या लक्षात यायला सुरवात झाली. अर्थात व्यवसायातील पैसा काय असतो हे त्यालासमजायला सुरवात झाली आणि पुढील सहाच महिन्यात त्याला आपल्या व्यवसायाची जागा बदलूनव्यवसायात अनेक बदल करावे लागले. बऱ्याच व्यावसायीकांच व्यवसायात असच होतं. बाजारातनवीन सुरु झालेले अनेक दुकानं पाच सहा महिन्यात आपला गाश्या गुंडाळतात याचं प्रमुखकारण ते पैसा समजायला कुठेतरी कमी पडलेले असतात म्हणून व्यवसाय सुरु करतांना फक्त व्यवसायाचीप्रेरणा असून चालणार नाही तर व्यवसायातील पैसा पण एक व्यावसायिक म्हणून आपल्याला समजला पाहिजे.

अशीच गल्लत आपल्याकडूननेहमी होत असते ती म्हणजे व्यवसायातील पैशाला आपण आपला पैसा समजतो आणि आपल्या पैश्यालाव्यवसायाचा पैसा. पण व्यवसायाचा पैसा हा आपला कधीच नसतो. तो व्यवसायासाठीच वापरला गेलापाहिजे तेंव्हाच व्यवसाय मोठा होतो. भले व्यवसायातून आपण आपला पगार, मानधन, नफा घ्यायलाहरकत नाही. ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय या म्हणीप्रमाणे आपण व्यवसाय करतोपण मग यामुळे व्यवसायाचा ताळेबंद आपल्याकडून कधीच जुळत नाही.

असेच काही उधारीतचालणारे व्यवसाय पैश्याचे मूल्य अप्रत्यक्षपणे कमी करत असतात हे आपल्या कधी लक्षातयेणारही नाही. (उधारीचे पैसे बुडतात म्हणून पैशाचे मूल्य कमी होते हे सांगण्याचा हेतूमाझा मुळीच नाही) उधारीमुळे पैशाचे मूल्य कसे कमी होते हे सांगण्याचा माझा हेतू यापेक्षानक्कीच वेगळा आहे. समझा तुमच्या व्यवसायात तुम्ही शंबर रुपयाची वस्तू एका वर्षाच्यामुदतीवर उधारीत दिली आहे याचाच अर्थ एका वर्षानंतर तुम्हाला त्या ग्राहकाकडून शंबररुपये नक्कीच मिळणार आहे. वस्तू विकल्या गेली म्हणून तुम्हाला एक व्यावसायिक म्हणूनबरे वाटेलही कदाचित. पण हीच वस्तू जर तुम्ही आज नगदीने विकली आहे आणि ते शंबर रुपयेबँकेत एफ. डी. केले आहे तर त्याच वर्षभरानंतर ती रक्कम एकशे सात रुपये किंवा त्यापेक्षाजास्त झालेली असेल. बँकेतील एफ. डी. हे उदाहरण मी कमीत कमी रिस्क म्हणून येते वापरतोआहे भले तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या ज्ञानावर शंबराचे दोनशे रुपये देखील करू शकताआणि व्यवसायात ते शक्य आहे. म्हणून नगदी केलेला व्यवहार पैशाचे मूल्य वाढवणारा असतो.काही व्यवसाय हे पाच-दहा टक्के नफ्यावर चालणारे असतात आणि यातही जर तुम्ही असे व्यवसायउधारीवर करत असाल तर तुम्ही ते तोट्यात करीत असतात कारण आठ-दहा टक्के हा वार्षिक महागाईदर आहे. शंबर रुपयाचे मूल्य महागाई दराप्रमाणे वर्षभरात आठ-दहा टक्क्याने खाली येऊनशंबराच्या नोटेचे मूल्य नव्वद ब्याण्णव रुपये एवढेच होत असते. याचसाठी व्यवसाय आणिव्यवसायातील पैसा आपल्याला समजणे गरजेचे आहे.

व्यावसायिक म्हणूनजसे आपल्याला पैसा समजणे गरजेचे आहे तसेच आपल्याला पैसा कामाला लावता आला पाहिजे, हो……आपण पैशाला कामाला लावू शकतो. तो तुमच्यासाठी काम करेल. हि एक कला आहे आणि शास्त्रदेखील पण त्यासाठी तुमच्याकडे पैश्या सोबत त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. पैसा तुच्यासाठीएकदा काम करायला लागला कि तो तुमच्या अनुपस्थितीत तुम्हाला आणखी पैसा मिळवून देत असतो.दिवस असो वा रात्र, पैसा काम करीत असतो फक्त तो तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतविता आलापाहिजे. गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत जसे की बँका, फायनान्स कंपनी, शेअरमार्केट, रिअल इस्टेट, प्लॉट, गाळे, सोने-चांदी, छोठी-मोठी व्यावसायिक गुंतवणूक, अशीबरीच गुंतवणुकीची पर्याय आहेत. पण यासाठी आधी व्यवसायातून पैसा उभा करावा लागेल आणिजेंव्हा तुम्ही गुंतवणूकदार व्हाल तेंव्हा तुम्ही व्यवसायापलीकडे एक यशाचं पाऊल टाकलेलंअसेल.

व्यवसायातील पैसा समजून घेताना व्यावसायिकाने सावकारी व्याजाच्या पैश्यापासूननेहमी दूर राहावे. कारण जर या सावकारी पैशाच्या चक्रव्युहात तुम्ही आणि तुमचा व्यवसायअडकला तर व्यवसायाचा अभिमन्यू झाला म्हणून समजा. 

✒️ लेखक
निलेश देशमुख

@ उद्योग क्रांती @
👉 स्मार्ट व्यावसायिक / उद्योजक बनायचे आहे? उद्योजकतेविषयक उपयुक्त लेख, माहिती, अपडेट्स, ई नियमितपणे मिळवण्यासाठी 7350500700 या नंबर वर मिस्ड कॉल द्या आणि मेसेज मधील नंबर “Udyog kranti” नावाने सेव्ह करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..