http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

‘या’ सवयीचा अवलंब केला तर आपणही होऊ शकता ‘यशस्वी उद्योजक’;

आपणही करू शकता त्यांचे अनुकरण यशस्वी असणाऱ्या उद्योजकांच्या काही खास सवयी असतात. त्या सवयी त्यांना यशस्वी होण्यास मदत करत असतात. काही उद्योगपती कायम शिकत असतात. त्या माध्यमातून ते नवीन नवीन क्षेत्रात स्वतःचे कौशल्य आजमावून पाहत असतात. त्यांना ऑनलाईन उद्योग सुरु करणे, नवं नवीन भाषा शिकणे, वाचन करणे या गोष्टींची आवड असते. 

१. स्वयंप्रेरित राहणे 

स्वयंप्रेरित राहण्याबाबत उद्योजक कायमच सजग असतो. व्यवसायात प्रत्येकाला अडचणी येत असतात. उद्योजकांना मोठं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. उद्योजक कायम त्यांच्या मनाचे ऐकत असतात. ते प्रेरणा देणारे भाषणे ऐकत असतात. त्यांना प्रेरणा मिळणारी पुस्तके वाचायला आवडतात. ते कायम स्वतःला सांगत असतात की, लढाई अजून संपलेली नाही. 

२. वेळेचे उत्तम नियोजन करणे 

जे यशस्वी उद्योजक असतात ते कायम वेळेचे पक्के असतात. त्यांच्याकडे कधी काय करायचे याचे कायम नियोजन असते. ते आधल्या दिवशीच्या रात्री दुसऱ्या दिवसाचे संपूर्ण नियोजन करत असतात. दुसऱ्या दिवशी कधी काय करायचे याचे त्यांनी पक्के नियोजन केलेले असते. सोशल मीडिया आणि इतर व्यर्थ जाणाऱ्या वेळेत ते मौल्यवान असे काहीतरी करत असतात. ज्या कामामध्ये ते निपुण असतात, ते त्याच कामासाठी त्यांचा वेळ देतात. बाकी कामे ते सहकाऱ्यांकडून करून घेतात. 

३. निरोगी जीवनशैली अंगीकारणे 

उद्योजकाच्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी होते. ते सकाळी लवकर उठतात आणि दिवसाची सुरुवात करतात. सकाळ सकाळी मन शांत राहावे आणि एकाग्र चित्ताने लक्ष लागावे म्हणून ध्यानधारणा करतात. त्यानंतर काही काळ व्यायाम करून ते दिवसाची सुरुवात करतात. त्यांच्या आहारात पण शरीराला उपयुक्त असणाऱ्या पदार्थांचाच समावेश असतो. रात्री खासकरून ते हलके जेवण करून फळांचा ज्यूस घेतात. 

४. उत्तम संघकौशल्य असणे 

उत्तम संघकौशल्य असणे हे एका उत्तम उद्योजकाचे कौशल्य आहे. आपण ज्या संघाकडून आपले काम करून घेणार आहे, त्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य आपल्याकडे असायला हवे. ते जर आपल्याकडे असेल तर आपण सर्वांकडून आपले काम व्यवस्थित रित्या काम करून घेऊ शकता. कामाचे विभाजन आणि व्यवस्थापन करता यायला हवे. ते जर जमले तर आपले काम पटापट होते. 

५. त्यांना आपले ध्येय माहित असते. 

आपण आपले ध्येय ठरवून घ्यायला हवे, आपण जर आपल्या कामाचे ध्येय ठरवून घेतले तर ते आपण व्यवस्थित करू शकतो. कमी कालावधीत जास्त कामे करायची असतील तर आपल्याला कर्मचाऱ्यांना टार्गेट ठरवून द्यावे लागेल. मासिक, त्रैमासिक अशी कामांची आखणी केली की त्या दिवसांमध्ये किती कामे पूर्ण झाली आणि किती राहिली याचा आढावा घेणे सोपे जाते. ध्येयाकडे पाहून उद्योगाची वाटचाल चांगली होत राहते. 

६. कृती करून दाखवतात 

जे उद्योजक असतात ते कृती करण्यावर भर देतात. त्यांना बोलण्यापेक्षा कामातून आपण काहीतरी करून दाखवू शकतो हे करायला जास्त आवडते. ते उगाच एखाद्या गोष्टीला पाघळ नाहीत. त्यांना जी लोक चांगली कामे करतात, ज्यांना काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे अशा लोकांच्या सानिध्यात राहायला आवडत असते. 

७. कमीत कमी निर्णय घेतात. 

जे यशस्वी उद्योजक असतात ते कमीत कमी निर्णय घेण्यावर भर देत असतात. त्यांच्या दृष्टीने जितके कमी निर्णय घेतले जातील, तितक्या जास्त प्रमाणात आपण कृती करण्याला भर देऊ शकतो. त्यांच्या सानिध्यात पण असेच लोक असतात, ज्यांना काम करायला जास्त आवडते. ती लोक पण कमीत कमी निर्णय कसे घेता येतील याकडेच लक्ष देत असतात. 

८. स्वतःसाठी वेळ काढतात. 

उद्योजक अशा गोष्टींसाठी वेळ देतात ज्या गोष्टींमधून स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवता येईल. ते अशा वेळेला फक्त स्वतःसाठी काही खास वेळ देत असतात. त्या निमित्ताने त्यांना स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायला पण काही वेळ काढता येतो. त्या वेळेत काही जण वाचन करतात, काही जण रोजची रोजनिशी लिहितात तर काहीजण आवडीचे चित्रपट, संगीत पाहत बसतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..