http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी या कठीण झाल्या आहेत. महागाई सध्या गगनाला भिडली आहे. आपले घरातील किंवा व्यवसायातील आर्थिक नियोजन जर नीट नसेल तर निश्चित याचा फटका आपल्याला बसू शकतो. रोजच्या गरजेच्या गोष्टींपासून ते चैनीच्या हौसे-मौसे पर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीत आर्थिक नियोजन हे अत्यंत चांगल्यारित्या करता आले पाहिजे असा नियमचं प्रत्येकाने अंगिकारला पाहिजे. आजकाल आपण जेव्हा सोशल मीडिया असेल, शैक्षणिक गोष्ट असेल किंवा व्यवसाय, नोकरी असेल या सर्व गोष्टींमध्ये आपण एक शब्द अनेकदा ऐकला असेल तो म्हणजे फायनॅन्शियल प्लॅनींग. बऱ्याच लोकांना योग्य आणि काटेकोर असं फायनॅन्शियल प्लॅनींग करायला जमत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. आज आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून फायनॅन्शियल प्लॅनींग म्हणजेच आर्थिक नियोजन का करावे ? आणि कसे करावे ? हे सांगणार आहोत.

फायनॅन्शियल प्लॅनींग म्हणजेच आर्थिक नियोजन म्हणजे काय ?

आज काल नोकऱ्या, व्यवसाय हे जास्त प्रमाणात असल्यामुळे पैसे बरेच लोक कमावत असतात. मात्र पैशांचे नियोजन कसे करायचे ? पैसे नेमके कोणत्या गोष्टींसाठी खर्च करायचे? पैसे खर्च करत असताना कोणत्या गोष्टींना महत्व देऊन पैसे योग्य ठिकाणी खर्च करायचे ? या सर्व गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक केल्या पाहिजे. पैशाचे म्हणजेच आर्थिक योग्य नियोजन जर आपल्याला करायचे असेल तर आपल्याला इंव्हेसमेंट करायला आलेच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट कोणत्या गोष्टीत करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र दर महिन्याला आपल्याला येणाऱ्या पगारातून किंवा नफ्यातून आपण ३०% किंवा ४०% रक्कम आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून केलीच पाहिजे.

Financial Planning (आर्थिक नियोजन ) ही पैशाच्या योग्य व्यवस्थापनाद्वारे जीवनाचे ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया आहे.सोप्या भाषेत आतापासूनच भविष्यातील पैशांच्या गरजांची व्यवस्था करण्याची ही प्रक्रिया आहे. जसे कि जर तुम्हाला पुढच्या १० वर्षापर्यंत पैसे सेव आणि इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्ही काही गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, समजा तुम्हाला ३० वर्षांनंतर निवृत्त व्हायचे असेल आणि त्या वेळी तुमच्याकडे 1 कोटी रुपये पाहिजेत , तर अश्या कोणत्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवू शकतात कि ३० वर्षापर्यंत १ कोटी रुपये जमा झाले पाहिजेत ?आर्थिक नियोजन करत असताना तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीनुसारतुमचे धोरण सुधारून जीवनाचे ध्येय साध्य करावे लागेल.

आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण काय काय पाऊले उचलणार ?

१. जेव्हा तुम्ही आर्थिक योजना बनवता तेव्हा तुम्हाला तुमच्या उत्पनाची आणि खर्चाची चांगली कल्पना आली पाहिजे. तुम्हाला तुमच्या खर्चांचा अंदाज अत्यंत योग्यरीत्या आला पाहिजे. आपले अधिकचे होणारे खर्च आपण थांबवले पाहिजे आणि बचत करण्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.

२. काहींना असे वाटते की जेव्हा आपण एखाद्या गरजेच्या गोष्टीसाठी कर्ज घेतो तेव्हा आपल्या चैनीच्या गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागेल. मात्र असं काही नसतं. याउलट आपण चांगल्या आर्थिक योजनांना आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करून कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आपल्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो .

३. कधी कधी आपल्याला अचानक काही गोष्टींमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळेस आपण सुरुवातीपासूनच आपत्कालीन फंड म्हणजेच सेव्हिंग किंवा आपण त्याला साठवणूक देखील म्हणून शकतो. अडी-नडीच्या काळासाठी आपण काही पैसे बाजूला काढायलाच हवे.

४. जर आपल्याकडे पैसे असतील तर तुम्ही तुमचे मासिक खर्च भागवू शकता, तुमच्या भविष्यातील ध्येयासाठी गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी काही काळजी न करता खर्च करू शकता.

५. आर्थिक नियोजन तुम्हाला तुमच्या पैशाचे कुशलतेने व्यवस्थापन करण्यास आणि मानसिक शांतीचा आनंद घेण्यासाठी मदत करते. आपण अद्याप या टप्प्यावर पोहोचले नसल्यास काळजी करू नका. जर तुम्ही आर्थिक नियोजनाच्या मार्गावर असाल तर आर्थिक शांततेचे स्वपन जास्त दूर नाही.

कोणत्या गोष्टींमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकता ?
शेयर मार्केट, SIP, रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवून, mutual फंड , FD , saving account, गव्हर्नमेंट योजना, इत्यादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..