http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

देशात २०१४ साली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातील जवळपास प्रत्येक घटकांसाठी विविध योजना आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये *डिजिटल INDIA* ही योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहे. डिजिटल या शब्दाचा खरा अर्थ देखील आता भारतीय बाजारपेठांना, व्यावसायिकांना, नागरिकांना आणि देशातील प्रत्येकाला कळला आहे असं आपण आता म्हणू शकतो. आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल  मार्केटिंगचा उपयोग केला जात आहे. डिजिटल मार्केटिंग हे नेमकं काय आहे ? हे ज्यांना अजूनही माहित नाही त्याच्यासाठी आमचा हा ब्लॉग अत्यंत मत्त्वपूर्ण आणि सोप्या शब्दात माहिती देणारा ठरणार आहे. 


डिजिटल मार्केटिंगची व्याख्या नेमकी काय आहे ?
पूर्वीच्या काळापासून तर आताच्या २०१० ते २०१२ सालापर्यंत मोठ्या मोठ्या कंपन्या, व्यावसायिक आपल्या कंपन्यांची किंवा उत्पादनांची जाहिरात मोहिम राबविण्यासाठी टीव्ही, वृत्तपत्र, मासिके, रेडिओ, कागद, पोस्टर आणि बॅनर या सारख्या साधनांचा वापर करीत असे आणि बर्‍याच कंपन्या घरोघरी जाऊन देखील आपल्या उत्पादनाबद्दल सांगत असत. परंतु आता काळ बदललेला आहे आणि मार्केटिंगच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. २०१०च्या नंतर मोबाईलचा वापर हा कमालीचा वाढला होता आणि सध्याही लोक सर्वात जास्त म्हणलं तरी मोबाईलचा वापर करत असतील. सध्याच्या काळात  इंटरनेट जगातील सर्वात मोठी मार्केटींग साठी जागा बनली आहे. जेव्हा स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टॅब्लेट आणि इंटरनेट सारख्या डिजिटल उपकरणांद्वारे जगभरातील लोकांना एखादे उत्पादन किंवा सेवेचा प्रचार केला जातो, तेव्हा या पद्धतीला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. थोडक्यात काय तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग. 


डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय ?
१. आपल्या सेवा व उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग करणे हा एक सरळ,सोपा आणि वेगवान मार्ग आहे.
२. ऑनलाइन मार्केटिंग हे ऑफलाइन मार्केटिंग करण्यापेक्षा अत्यंत स्वस्त आहे.
३. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण आपल्या ब्रँडची value(मूल्य) वाढते. 
४. डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने फक्त आपल्या उत्पादनांबद्दल प्रचार करत नाही तर ते ऑनलाईनच विकू शकतो. 
५. डिजिटल मार्केटिंग आपले उत्पादन आणि सेवा योग्य लोकंकडे पोहचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार कोणते आहेत ?
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ), सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, कन्टेन्ट मार्केटिंग, पे पर क्लिक (पीपीसी), Affiliate Marketing , इन्फ्लुएंसर मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग हे सर्व प्रकार आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारांद्वारे आपल्या कंपनीची किंवा उत्पादनांची जाहिरात करू शकता. 
१. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) : सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटला सर्च इंजिन वर सर्वात वरती रँक करू शकतात ज्यामुळे तुमच्या वेबसाईट वर जास्त ग्राहक येतील. म्हणजेच जेव्हा कोणी आपल्या कंपनी बद्दल किंवा त्याच्या संबंधी काही सर्च करेल तेव्हा आपली कंपनी किंवा उत्पादन त्याला सर्वात पहिल्यांदा दिसेल. 
२. सर्च इंजिन मार्केटिंग :  सर्च इंजिन मार्केटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे  सर्च इंजिनच्या रिझल्ट पेजमध्ये जाहिरातीसाठी जागा खरेदी केली जाते. यासाठी आपण काही प्लॅटफॉर्म जसे Google ads इत्यादी वापरतो. आपण जेव्हा ऑनलाईन काही पाहत असतो तेव्हा आपल्याला गूगल अड्स म्हणजेच जाहिराती बघायला मिळतात. या जाहिराती म्हणजे आपल्या उत्पादनांची केलेली मार्केटिंग असते. 
३. सोशल मीडिया मार्केटिंग : आजकाल प्रत्येक जण वेळ घालविण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही सर्च करत असतो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. सोशल मीडियाद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाचा प्रसार करण्याच्या मार्गांना सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतात. जेव्हा तुम्ही ट्विटर, फेसबुक, टिकटॉक, व्हाट्सअँप, युट्युब, इन्स्टाग्रामवर असता आणि तुम्हाला जेव्हा जाहिराती बघायला मिळतात तेव्हा त्या सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून आलेल्या असतात. 
४. कन्टेन्ट मार्केटिंग : कन्टेन्ट मार्केटिंग हे असे मार्केटिंग आहे जे सर्च इंजिनऑप्टिमायझेशन आणि सोशल मीडिया मार्केटिंग दोन्ही अंतर्गत येते. कन्टेन्ट मार्केटिंगमध्ये आपण आपल्या उत्पादनांबद्दल किंवा कंपनीबद्दल चांगले ब्लॉग म्हणजेच कन्टेन्ट तयार करू शकतो आणि लोकांपर्यंत ते पोहोचवून आपली विक्री वाढवू शकतो. 
५. पेपर क्लिक (पीपीसी) : पेपर क्लिक हा वेबसाइटवर ग्राहक आणण्याचा एक मार्ग आहे ज्यामध्ये प्रकाशकांना जाहिरातीवर प्रति क्लिक पैसे दिले जातात. यासाठी, बहुतेक लोक Google जाहिराती वापरतात, ज्यामध्ये कंपन्या साइटवर येण्यासाठी Google ला प्रति क्लिक पैसे देतात.
६. ईमेल मार्केटिंग : ईमेल मार्केटिंगमध्ये आपण मेल द्वारे तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगू शकतात, किंवा तुम्ही त्यांना खरेदी करण्यासाठी ऑफर देखील मेल द्वारे पाठवू शकतात. ईमेल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या उत्पादनांबद्दल किंवा कंपनीबद्दल चांगली जाहिरात करू शकतो. 
७. इन्फ्लुएंसर मार्केटिंग : इन्फ्लुएंसर मार्केटिंग हा डिजिटल मार्केटींगचा एक नवीन प्रकार आहे, ज्यात अशा लोकांचा वापर केला जातो ज्यांना खूप जास्त लोक फोल्लोव करतात, आणि ते सोशल मीडिया वर तुमच्या प्रॉडक्ट बद्दल त्यांच्या फोल्लोवेर्स ला सांगू शकतात ज्यामुळे तुमच्या विक्री वाढू शकते.

ReplyForward

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..