http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

व्यवसाय करायचा म्हटलं की बऱ्याच गोष्टी अत्यंत बारकाईने लक्षात घेणे आणि त्या आपल्या व्यवसायमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. कोणतीही कंपनी असेल, व्यवसाय असेल या गोष्टी चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी काही गोष्टी आपण नीट केल्याचं पाहिजे. व्यवसाय करत असताना आपण मार्केटिंग, ब्रॅंडिंग अत्यंत चांगल्या प्रकारे करायलाच हवी. या दोन गोष्टींचा चांगला संगम झाल्यास आपल्याला व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत हे १००% खरं आहे असं समजायला हरकत नाही. बरेच लोक व्यवसाय करत असताना ब्रॅंडिंग करण्याच्या बाबतीत काहीसे मागे पडलेले आहेत असं देखील अनेक ठिकाणी लक्षात आलं आहे. ब्रॅंडिंगचा अर्थ हा प्रत्येक नवउद्योजकाने, व्यावसायिकाने समजून घेणे ही आता काळाची गरज आहे. ब्रॅंडिंगचा कन्सेप्ट नीट लक्षात न घेतल्यास आपल्याला निश्चितच त्याचा तोटा होण्याची शक्यता असते. 


ब्रॅंडिंग म्हणजे काय ?
आपण तयार करत असलेल्या उत्पादनांची जाहिरात करणे, कंपनीची जाहिरात करणे किंवा त्याबद्दल माहिती देणे याला ब्रॅंडिंग म्हणत नाही. ब्रॅंडिंग म्हणज जाहिरात करणे हा समज प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या डोक्यातून काढून टाकणे गरजेचे आहे. ब्रॅंडिंग ही एक संकल्पना आहे.  उद्योग-व्यवसायात प्रगतीसाठी आपल्यात फाजल जिद्द आणि चिकाटीच लागत नाही तर आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंगही तितकेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही उद्योगाची सुरुवात झाल्यानंतर गरज असते ती त्या उद्योगाची ओळख निर्माण करण्याची आणि ती ओळख निर्माण करण्याकरिता त्या उद्योगाची चांगल्या प्रकारे Branding करणे गरजेचे असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ”जेव्हा तुम्हाला तुमच्या उत्पादनाविषयी किंवा व्यवसायाविषयी  लोकांना स्वतःहून सांगावे लागते ती असते मार्केटिंग पण जेव्हा लोक स्वतःहून इतरांना तुमच्या उत्पादनाविषयी किंवा व्यवसायविषयी माहिती देतील ते असेल ब्रँडींग ! ”
व्यवसायासाठी ब्रॅंडिंगची गरज का आहे ?व्यवसायात ब्रँडिंग महत्त्वपूर्ण आहे कारण केवळ यामुळेच आपला ब्रँड ग्राहकांच्या लक्षात राहतो व आपल्या ग्राहकांकडून आणि ग्राहकांना आपल्या कंपनीकडून काय अपेक्षित उद्दिष्टे आहेत याची माहिती ब्रँड देतो. बाजारपेठेतील ओळख मजबूत करण्यासाठी ब्रँड असणे ग्राहकांची ओळख वाढवण्याचे कार्य करते. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा ग्राहक एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी खरेदी करतो किंवा एखाद्या कंपनीची सेवा घेण्याचा विचार करतो तेव्हा तो आपली कंपनी ब्रँड ने ओळखतो. ग्राहक कदाचित त्या वेळेस आपल्या कंपनीबद्दल त्यांना चांगले माहिती नसले तरीही एखादा असा ब्रँड निवडण्याची शक्यता असते.


ब्रॅंडिंगचे फायदे काय ?
१. आपल्याकडील किंवा इतर नवीन उत्पादनाची बाजारात सहज ओळख निर्मण होते. 
२. आपल्याकडे आधीपासूनच एक सशक्त ब्रँड आणि विश्वासू ग्राहक असल्यास, नवीन उत्पादने सादर करणे किंवा त्यामध्ये आणखी गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची चाचणी करणे नेहमीच सोपे आणि जास्तीचा खर्च न करता होते. आपल्याकडे एक निष्ठावंत ब्रँड खालील असल्यास, आपल्या ग्राहकांना बर्‍याचदा आपल्या नवीन उत्पादनांमध्ये रस असेल.
३. मजबूत आणि सुप्रसिद्ध ब्रँड असणे हे आपल्या उत्पादनाची बाजारपेठेत आणि ग्राहकांप्रति आपली विश्वासाहर्ता वाढवण्यास मदत करते.  जेव्हा आपला ब्रँड तयार होतो तेव्हा आपण ओळख, निष्ठा आणि स्पर्धात्मकता देखील तयार करता. प्रत्येक गोष्ट हातात येते.  यामुळे आपल्याला अनुभव येईल की आपल्यावर असणाऱ्या विश्वासार्हतेचा ग्राहकांना खरेदी सुलभतेशी थेट संबंध आहे. जर आपला ब्रँड विश्वासार्ह असेल तर आपणास जास्तीत जास्त विक्री होण्याची शक्यता जास्त असते.
४. ब्रॅंडिंग आपल्याला सशक्तीकरण आणि कार्य करण्यास मदत करते. जेव्हा आपण बाजारपेठेत आपल्या सारखेच उत्पादन घेणारे असतात तेव्हा ब्रॅंडिंग आपल्या इतर व्यावसायिक ब्रँडपेक्षा वेगळे करणे हे एक शक्तिशाली साधन आहे.
५. ब्रॅंडिंगमुळे आपल्याला मोठ्या संख्येने ग्राहकांची उपलब्धता किंवा आपला व्यवसाय अन्य भौगोलिक क्षेत्रावर विस्तारित करा.


ब्रॅंडिंग एका सोप्या भाषेत….
ब्रँड म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेत म्हणून शकतो एक शिक्का, एक ओळख, व्यापारात गाजलेले नाव.  उदाहरण घ्यायचे म्हटलं तर आजही लोखंडी कपाट घ्यायचे असेल तर लोक गोदरेज कंपनीचं नाव घेतात. बाजारात आज कपाट उत्पादन करणाऱ्या  भरपूर कंपनी आहेत. ब्रँड बनवण्यासाठी वर्षानुवर्षे तीच वस्तू त्याच पद्धतीने आणि गुणवत्तेने निर्माण करावी लागते तेव्हाच लोकात त्या ब्रँड बद्दल एक ज्ञान निर्माण होतो. Brand असल्याने लोकांचं त्याचावर विश्वास होतो की जे वस्तू या ब्रँडचा खाली विकली जाणारी वस्तू ते चांगले गुणवत्तेची आहे जसे आपण टाटा किंवा गोदरेज, reliance यांची वस्तू घेताना जास्त विचारपूस करत नाही कारण ते चांगले क्वालिटी असतात असे आपले धोरण असते.कंपनी ब्रँड बनवून स्वतःच्या उत्पादनाचा विज्ञापन त्याद्वारे बाजार पेठात पसरवून आपले धंदा वाढवते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..