http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

कठीण काळात व्यंकटेश अन्नछत्रालय मोठा आधार..!

कोणती वेळ कशी येईल, हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे आलेल्या प्रसंगाशी दोन हात करणं, एवढंच आपल्या हातात उरते.. असाच प्रसंग बोधेगाव येथील रहिवाशी अझिम शेख यांच्यावर ओढवला होता.. घरात सगळं काही सुरळीत सुरू होत. एका दिवशी अचानक त्यांच्या आजोबांची तब्बेत बिघडली. त्यांना स्थानिक डाॅक्टरांनी लगेच अहिल्यानगर घेऊन जाण्यास सांगितले.

जेवणाचे व्हायचे हाल…!

अहिल्यानगर त्यांना नवीन नव्हतं. मात्र, संबंध दवाखान्याशी आल्यानं सगळं नवीन वाटायला लागलं होत. कारण, आजोबाला डाॅक्टरांनी दाखल करून घेतल्यावर त्यांना बाहेर जाणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे दवाखान्याच्या जवळ जे जेवण मिळायचं, त्यावरच त्यांना भागवावं लागायचं. ते जेवणही वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे हाल व्हायला लागले.

पण म्हणतात ना, जिथे माणुसकी जिवंत असते, तिथे मार्ग सापडतोच!

त्याच दिवशी गावाकडून त्यांचा मित्र त्यांच्या आजोबांना दवाखान्यात भेटायला आलेला.. तेव्हा दोघांत तब्बेतीविषयी चर्चा झाली आणि जेवणाचा विषय निघाला. जेवणाचे होणारे हाल, अझिम शेख यांनी त्यांना बोलून दाखवले. त्याच वेळी त्यांनी व्यंकटेश अन्नछत्रालयाची माहिती दिली. विशेष म्हणजे ही योजना फक्त व्यंकटेशच्या ग्राहकांसाठी असल्याचंही त्यांनी लक्षात आणून दिलं. अझिम शेख हे खूप जुने व्यंकटेशचे ग्राहक असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था होण्यासाठी फक्त एक फोन करावा लागला.

डब्बा मिळतो थेट रूग्णालयात..

त्या दिवसापासून त्यांच्या आजोबांची तब्बेत चांगली होईपर्यंत त्यांना दोन्ही वेळचा जेवणाचा डबा थेट रूग्णालयात मोफत मिळत गेला. याचबरोबर काही दिवसांनंतर त्यांच्या पत्नीच्या आजारपणातही त्यांना व्यंकटेश अन्नछत्रालयाचा आधार मिळाला, हेही त्यांनी सांगितले. तसेच, व्यंकटेश फाऊंडेशनमार्फत सुरू असलेल्या व्यंकटेश अन्नछत्रालयाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, हा उपक्रम गावातून शहरात उपचारासाठी आलेल्या नागरिकांसाठी मोठा आधार ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..