Description
गांडूळखताचे फायदे
1. जमिनीचा पोत सुधारतो.
2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
3. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
5. जमिनीची धूप कमी होते.
6. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
7. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
8. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
9. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व
लगेच उपलब्ध होतात.
10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
11. ओला कचरा व्यावास्तापन पण होते
12. मातीचा कस टिकून राहतो
13. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.