सांगली शहरातील नितेश ओझा यांनी अभ्यासू वृत्तीने खिल्लार गोशाळा उभी केली. दूध हे प्रमुख उत्पन्न न मानता गाईचे शेण आणि गोमुत्रा पासून विविध उत्पादने तयार करून विक्री सुरु केली. आर्थिक दुरुष्टया सक्षम गोशाळा करण्यावर त्यांचा भर आहे.
सांगली येथी नितेश ओझा हे बीई कॉम्पुटर पदवीधर. २००३ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळाली त्यानंतर पुणे शहरात स्वतःची संगणक व्यवसायातील कंपनी सुरु केली. परंतु शहरातील धावपळीच्या कामामुळे जीवनशैली बदलली. आहाराकडे व्यवस्थित लक्षदेणे शक्य होत नसे. पैसे मिळायचे पण सुख शांती, आणि समाधान नाहीसे झाल्याचे लक्षात आले. याच काळात २००५ च्या दरम्यान स्वदेशी उत्पादनाचे पुरस्कर्ते कै. राजीव दीक्षित यांच्या विचारांचा प्रभाव ओझा यांच्यावर पडत गेला. त्यातून त्यांनी २००७ मध्ये पुणे शहर सोडून सांगली गाठले. यासाठी घरातून विरोधदेखील झाला, परंतु न डगमगता त्यांनी स्वतंत्रपणे देही गोपालनाला सुरुवात केली.
खिल्लार गोपालनाला सुरुवात :-
नितेश ओझा यांनी खिल्लार गाईंचे संगोपन करण्याचे ठरविले. यासाठी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई किंवा कायदेशीर प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या ज्या देशी गाई गोरक्षकांना दिल्या जातात, त्यातील बारा भाकड खिल्लार गाई नितेश यांनी सनदशीर मार्गाने खरेदी केल्या या गाईंच्या संगोपनासाठी जागेची आवश्यकता होती. या साठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव जवळच्या ( ता. शिरोळ ) डोंगरकडेला चार एक्कर जमीन १५ वर्ष्याच्या वार्षिक कराराने एक लाख २० हजार रुपये या दराने भाडेतत्वावर घेतली. गाईंसाठी मुक्त संचार आणि बांधीव गोठा तयार केला. दररोज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान गाई डोंगरावर चरायला सोडल्या जातात सायंकाळी ५ वाजता परत आणल्यानंतर त्यांना सकस हिरवा चार दिला जातो. योग्य आहार व्यवस्थापन आणि औषोधोपचार केल्याने सुरुवातीला आणलेल्या १२ गाईंपैकी सात गाई माजावर येऊन गाभण राहिल्या. गेल्या काही वर्षात जातिवंत गाईंची पैदास गोठ्यात झाली या दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी भाकड झालेल्या गाई त्यांच्या गोठ्यात सुमारे शंभर खिल्लार गाई आहेत. ‘ वेदखिल्लार ‘ गोशाळा व पंचगव्य संशोधन केंद्र’ या नावाने ते आपली गोशाळा चालवितात. सध्या त्यांच्या शाळेत जातिवंत खिल्लार पैदाशीचे काम सुरु आहे. नुकतीच त्यांनी गोट्यासाठी दोन एक्कर जागा खरेदी केली आहे.
विविध उत्पादनाची निर्मिती :-
नितेश ओझा यांनी खिल्लार गाई सांभाळण्यास घेतल्या असल्या तरी त्यांची खरेदी-विक्री करून नफा मिळवणे हा मुख्य उद्देश नव्हता. भाकड गाईंची संख्या वाढली तशी शेण व गोमूत्रही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यातून मग विविध उत्पादनाची निर्मिती सुरु केली. सध्या त्यांचा शाळेत तूप, गोमूत्र, अर्क, गोमुत्रासानिटायझर, घनवती(गोळ्या ), गोमय भसम, दंतमंजन, धुपकांडी, गोमायलेप, मछरकोईल, शाम्पू, वेदनाशामक तेल, धुपस्टिक, साबण निर्मिती केली जाते. यासाठी त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले जाते.
विविध राज्यात प्रशिक्षणासाठी जाण्याचा अनुभव नितीन यांना बाजारपेठ तयार करण्यासाठी उपयोगी पडला. त्यातूनच ग्राहक थेट गोशाळेत येऊन उत्पादनाची खरेदी करतात. विविध देशातील भारतीय ग्राहक तूप आणि पंचगव्य उत्पादने त्यांच्याकडून खरेदी करतात. गाईंचे संगोपन आणि उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवलयास विविध उत्पादनातून चांगला आर्थिक नफा मिळविता येतो. गाईंची खरेदी-विक्री न करता उपपदार्थ हेच उत्पन्नाचे साधन ठेवले. उत्पादने तयार करताना त्यांच्या दर्जाकडे विशेष लक्ष ठेवले जाते. सध्या त्यांच्याकडे दहा लोक उत्पादन निर्मितीमध्ये काम कार्यरत आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार सुमारे तीनशे उत्पादने ते तयार करतात. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, केरळ, आणि तामिळनाडू या राज्यातील गोशाळांमध्ये नितेश ओझा यांनी प्रशिक्षण दिले आहे. इतरांच्या दान दिलेल्या रक्कमेवर अवलंबून न राहता गोशाळांनी स्वावलंबी व्हावे हा या प्रशिक्षणा मागील मुख्य हेतू आहे. गेल्या १० वर्षात नितेश यांनी पश्चिम महाराष्ट्रात साडेतीनशे बैलजोड्या आणि अडीच हजार गाईंचे गरजूना निःशुल्क वाटप केले.
‘गोक्रीट’चे उत्पादन :-
ओझा यांनी बाजारपेठीची मागणी लक्षात घेऊन शेण, गोमूत्रापासून विविध उत्पादनाची निर्मिती सुरु केली. गाईच्या शेणापासून गोक्रीट हि एक सामान्य विटे पेक्षा वेगळी विट बनवली. हि वीट जळत नाही भिजातही नाही. शेणपाऊण नावीन्यपूर्ण पणत्या आदी वस्तू बनविल्या आहेत, यासदेखील चांगली मागणी आहे.
दर्जेदार तूप निर्मिती :-
अलीकडच्या काळात देशी गाईंच्या दुधापासून तूपनिर्मिती करण्यावर अनेकांनी भर दिला आहे. आरोग्यदायी घटक म्हंणून त्यास ग्राहकांकडून चांगली मागणी आहे नितेश देखील तुपाची निर्मिती करतात. सध्या अडीच हजार रुपये प्रति किलो दराने तुपाची विक्री होते. या तुपाचे मूल्यवर्धन करून त्याचे औषधी गुणधर्म वाढविण्यात आले आहेत. यास देखील बाजारपेठेत चांगला दर मिळतो. जातिवंत दुधाळ खिल्लार गाईंच्या पैदाशीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
शेणखत, गोमूत्र विक्री:-
दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी गोमूत्र गोळा केले जाते. गोमूत्र अर्कासाठी ऊर्ध्वपातन प्रक्रिया करताना मातीच्या भांड्याचा वापर करण्यात येतो. वर्षभरात साधारणपणे दहा हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केली जाते. वर्षभर विविध उत्पादने तयार करण्याचे काम सुरु असते. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोमूत्राला चांगली मागणी आहे. सध्या शेतीसाठी लागणारे गोमूत्र ३० रुपये लिटर आणि औषधी उपयोगासाठी गोमूत्र अर्काचा सरासरी ३०० रुपये लिटर दराने विक्री केली जाते. ओझा यांनी त्यातूनहि आर्थिक मिळकत वाढविली आहे. शेणखताचे मूल्यवर्धन करून विकले जाते. सरासरी अकराशे रुपये टन दराने मूल्यवर्धित शेणखताची विक्री होते.