http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

आजकाल ओळखपत्र हे आपली मूलभूत गरज असल्यासारखं झालं आहे. आपल्याला कोणत्याही खासगी, व्यावसायिक आणि इतर महत्वाच्या कामांसाठी ओळखपत्राची ठिकठिकाणी गरज पडत असते. आपल्या सर्वांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड  हे आता असतेच. त्याचप्रमाणे आता आपण शॉपऍक्ट लायसन्स, FSSAI  license (फूड लायसन्स)  या सर्व गोष्टी देखील ऐकल्या असतील आणि जर आपलाही व्यवसाय असेल तर आपल्याकडे या दोन्ही गोष्टी नक्कीच असणार. तर मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना फूड लायसन्स म्हणजेच  FSSAI हे नेमकं काय आहे ? याबाबदल माहिती नाही. तर आज आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला फूड लायसन्स म्हणजेच FSSAI बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. 


फूड लायसन्स म्हणजेच  FSSAI म्हणजे नेमकं काय ?
FSSAI म्हणजे एक संस्था आहे. भारतीय अन्न सुरक्षिता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारची स्वायत्तता असणारी ही संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहेत ज्या अंतर्गत FSSAI हे स्थापन करण्यात आले आहे. FSSAIपरवाना किंवा FSSAI नोंदणी करणे हे कोणत्याही अन्न म्हणजेच खाद्य पदार्थांशी निगडित व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आवश्यक आहे. अन्न, खाद्य पदार्थांशी निगडित व्यवसाय करत असताना एक चौदा अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पॅकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे. 


फूड लायसन्स (FSSAI) परवाना कोणासाठी गरजेचा आहे?
FSSAI परवाना हा डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाना मांस प्रक्रिया, री-पॅकर्स, Relabellers आणि प्रत्येक मँन्यूफॅक्चर किंवा अन्न प्रक्रिया युनिट, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब/कँटीन, अन्न कॅटरिंग, हॉटेल, उपहारगृह, रेस्टोरंट, खाद्यपदार्थ दूध वाहतूक, मार्केटर, फेरीवाला, निर्यातकर, आयतकार, इ-कॉमर्स/ऑनलाईन फूड डिलिव्हरी, फास्ट फूड, चायनीज सेंटर अशा सर्व व्यवसायिंकांसाठी FSSAI परवाना हा गरजेचा आहे. थोडक्यात काय तर जे व्यावसायिक अन्न पदार्थांशी निगडित व्यवसाय करतात त्यांना FSSAI परवाना आपल्या दुकानात लावणे अनिवार्य आहे. 


FSSAI परवान्याचे फायदे काय ? 
१. आपल्याला अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात. 
२. ग्राहक जागरूकता निर्माण होते. 
३. आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता. 
४. अन्न सुरक्षा सुविधेचा लाभ मिळतो. 
५. संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी FSSAI परवाना आवश्यक आहे. 
६. FSSAI परवाना असल्यास व्यवसायात विस्तार करू शकतो आणि मोठ्या संधीचा लाभ आपण घेऊ शकतो. 


FSSAI परवान्याचे दोन प्रकार कोणते ? त्यामधील फरक नेमका काय आहे ?


FSSAI परवान्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे FSSAI स्टेट लायसन्स आणि दुसरे म्हणजे FSSAI सेंट्रल लायसन्स. 


FSSAI state license (स्टेट लायसन्स):

१. ज्या व्यासायिकाची वार्षिक उलाढाल ही १२ लाखांपेक्षा जास्त आहे किंवा २० कोटींपर्यंत आहे त्यांना FSSAI state license अनिवार्य आहे. 

२. ज्या व्यासायिकाचे उत्पादन युनिट हे दररोज दोन टन क्षमतेपर्यंत आहे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज ५० हजार लिटर आहे त्यांना देखील FSSAI state license आवश्यक आहे. 

३ स्टार हॉटेल्स, रिपॅकर्स, रिलेबलिंग युनिट, क्लब उपहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी FSSAI state license करीता अर्ज करणे आवश्यक आहे.  


FSSAI central  license (सेंट्रल लायसन्स)

१. ज्या व्यासायिकाची वार्षिक उलाढाल  २० कोटींपेक्षा जास्त आहे त्याला FSSAI central  license असणे अनिवार्य आहे. 

२. निर्यातकर, आयातकार आणि ई-कॉमर्स व्यावसायिकांना FSSAI central  license असणे अनिवार्य आहे.


FSSAI परवान्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, पत्याचा पुरावा, विजेचे बिल किंवा भाड्याचा करार NOTE(महत्वाचे) = FSSAI परवान्याची वैधता १ ते ५ वर्षांसाठी असू शकते. त्यानंतर आपल्या नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. 


FSSAI state license (स्टेट लायसन्स)

FSSAI central  license (सेंट्रल लायसन्स)*आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, पत्याचा पुरावा, विजेचे बिल किंवा भाड्याचा करार, पाणी तपासणी अहवाल(हॉटेल साठी अनिवार्य, मॅन्युफॅक्चर साठी) अन्न वर्ग यादी, उपकरणे यादी, युनिटचा फोटो, ब्ल्यू प्रिंट, बाकी कागदपत्रे व्यवसायावर अवलंबून असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..