राज्यातील अभ्यासू पशुपालक आणि पशुतज्ञनि एकत्र येत खिलार, देणगी, डांगी, लाल कंधारी आणि गवळाऊ गोवंश पैदासकारक संघ स्थापन झाले आहेत. त्याच बरोबरीने साहिवाल आणि थारपारक क्लबच्या माध्यमातून गोवंश संवर्धन आणि प्रसार करण्यात येत आहे. याबाबत घेतलेला आढावा..
लालकंधारी पैदास केंद्र :-
लालकंधारी हा मराठवाड्यात गोवंश शेतीकामासाठी या बैलांना चांगली मागणी आहे. योग्य व्यवस्थापनात या गाई प्रतीदिन ४ ते ५ लिटर दूध देतात. या गोवंशाच्या संवर्धनासाठी पशुपालकांनी एकत्र येत मावलगाव ( जि. लातूर ) येथे २००३ मध्ये लाल कंधारी पैदास केंद्राची स्थापना केली.
याबाबत माहिती देताना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शरद पाटील म्हणाले कि, लाल कंधारी हा शेती मशागतीतही गोवंश आहे. त्याच बरोबरीने गाई देखील योग्य आहार व्यवस्थापनात सरासरी पार्टी दिन ५ ते ६ लिटर दूध देतात. केंद्रातर्फे पशु पालकांना जातिवंत पैदाशीबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते. चांगल्या पैदाशीतून दुधाळ गाय गोठ्यातच तयार करत आहोत. पैदाशी साठी शुद्ध वळू निर्मितीवरदेखील भर दिला आहे. पशुपालनाच्या बरोबरीने गो आधारित शेतीला चालना दिली आहे. यासाठी पोतूळ ( जि. औरंगाबाद ) आणि कणेरी मठ (जि. कोल्हापूर ) येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिस्थानाचे आयोजन केलेजाते. या ठिकाण जीवामृत, घनजीवामृत, गोमूत्र, आधारित कीटकनाशक निर्मिती तसेच दूध, तूप तसेच इतर उत्पादनांच्या निर्मितीबाबत प्रशिक्षण दिले जाते. मालेगावमध्ये प्रत्येक घरी लाल कंधारी गाय आणि गो आधारित शेतीला चालना दिली आहे. या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे..
देवणीसाठी पशुपालन एकत्र :-
देवणी हा मराठवाड्यातील महत्वाच्या गोवंश ओढकाम, शेतीकाम, तसेच दुधासाठी हा गोवंश ओळखला जातो. याच्या संवर्धनासाठी प्रयोगशील पशुपालक आणि पशुतज्ज्ञांनी बारा वर्षांपूर्वी देवणी गोवंश सुधार व गोपालक असोसिएशन’ ची सुरुवात केली.
याबाबत माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर बोरगावकर म्हणाले, कि आम्ही देवणी गोवंश सुधार आणि जातिवंत पैदाशी साठी कर्यरत आहोत. सुमारे ३०० पशुपालक आमचे सभासद आहेत. देवणी गोवंशामध्ये वानेरा, बालंक्या आणि शेवरा हे उपप्रकार दिसतात. या तिन्ही प्रकारचे संवर्धन आम्ही करतो. यासाठी पशुपालकांना शास्त्रीय मार्गदर्शन केले जाते. पशु स्पर्धांचे आयोजन केले जाते. ओढकाम, शेतीकामासाठी बैलजोडीला शेतकऱ्यांची पसंती आहे. गाय सरासरी दररोज सहा लिटर पर्यत दूध देते. चांगले व्यवस्थापन असलेल्या गाई दररोज ८ ते १० लिटर पर्यत दूध देत आहेत. अशा दुधाळ गाईंची नोंद घेतली जाते. जातिवंत वळुंची देखील नोंद ठेवल्याने पैदाशीसाठी फायदा होत आहे.
विदर्भ भूषण : गवळाऊ :-
विदर्भामध्ये गवळाऊ गाय आणि शेतीकामासाठी बैलजोडीला आहे. काळाची गरज ओळखून गोवंशाचे संगोपन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ गवळाऊ गोवंश जातं, संवर्धन, संशोधन व पैदासकारक चॅरिटेबल ट्रस्ट ‘ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. जातिवंत गवळाऊ गोवंश वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, आणि सेलू तालुक्यातील पशुपालकांकडे आहे. गोवंशाच्या संवर्धनापुरते मर्यादित न राहता जातिवंत पैदास, दूध उत्पादन वाढ आणि प्रक्रिया उत्पादनाच्या विक्रीसाठी हि संस्था येत्या काळात कंपनी देखील सुरु करणार आहे. याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकर (तळेगाव रागूज, ता. आर्वी जि. वर्धा )म्हणाले कि, गेल्या १० वर्षांपासून गावलाऊनच्या संवर्धनासाठी एकत्र आलो. आमच्याकडे पशुपालकांकडील २५० जातिवंत गवळाऊ गाईंची नोंदनि आहे. विदर्भातील उष्ण तापनामाचा या गोवंशाच्या आरोग्य तसेच दूध उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. या गोवंशाची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. सरासरी दररोज पाच ते सहा लिटर दूध उत्पन्न मिळते. प्रयोगशील पशुपालकांकडे दररोज सात ते आठ लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत. दुधातील फॅट पाच पर्यंत आहे.
संस्थेचे सल्लागार आणि गोवंश अभ्यास सजल कुलकर्णी म्हणाले, कि दरवर्षी गीता जयंतीला प्रदर्शन होते. या माध्यमातून जातिवंत गाई, वळू पशुपालकांसमोर येतात. या गावात गवळाऊ गाई जास्त प्रमाणात आहेत, तेथे रेतनासाठी जातिवंत कालवडी पशुपालकांकडे तयार होतील. सध्या पशु पालक गवळाऊ गाईंचे दूध रतीब किंवा डेअरीला देतात. आर्वी परिसरातील काही पशुपालक खावा तयार करून २५० रुपये किलो दराने विक्री करतात. आलीकडे नागपूर शहरात तूप विक्रीस सुरुवात झाली आहे.
वाटचाल ‘साहिवाल क्लबची’ ची…
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिह्यातील कृषी पदवीधर, प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येते ” साहिवाल क्लब ” स्थापन केला. क्लबच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना पुणे कृषी महाविद्यालयातील पशतज्ञ् डॉ. सोमनाथ माने म्हणाले कि, शेतीत प्रयोगशीलता संभाळण्याबरोबरच गोसंवर्धन व शास्त्रीय नोंद ठेऊ शकणाऱ्यांना आम्ही क्लबचे सदस्य केले आहे. अभ्यासू पशुपालक गटाच्या माध्यमातून जातिवंत साहिवाल कालवाडीची पैदास, व्यवस्थापन तंत्रज्ञाचा प्रसार, स्वच दूध निर्मिती आणि दूध विक्रिचे नियोजन आहे.
आम्ही राजस्थान आणि हरियाणा राज्यातून जातिवंत साहिवाल गाई आणल्या. आता गटातील पशुपालकांकडे जातिवंत कालवडी आणि वळू तयार झाले आहेत. गटात १०० पशुपालक, बहुतांश कृषी पदवीधर आहेत. या पशुपालकांकडे सध्या ४००० साहिवाल गाई आहेत. गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. गोवंश सुधारणेच्या बरोबरीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती आणि विक्री, गोमूत्र, शेणापासून सेंद्रिय खते, घरोघरी बायोगॅस, शेणस्लरीची शेती आणि फळबागांमध्ये वापर सुरु झाला आहे. येत्या काही दिवसात पुणे शहरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रास सुरु होत आहे. पशुपालकांना कर्नाल ( हरियाणा ) येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतून साहिवाल गोवंशाची रेतमात्रही उपलब्ध देत आहोत, त्यामुळे जातिवंत पैदास गोठ्यात वाढणार आहे. पहिल्या वेताच्या गाईचे प्रतिदिन सरासरी ६ ते ८ लिटर दुग्धोत्पादन आहे, पुढे ते वाढते. केवळ दूध, तूप, उत्पादनाचे उद्दिष्ठ न ठेवता दूध प्रक्रिया, बायोगॅस, गांडूळ खत, जीवामृत दशपर्णी तसेच गोमूत्रअर्क आदींचीही निर्मिती आणि त्यातून नफावाढ हा उद्धेश आहे. ग्रामीण भागात दुधाला ६० ते ६५ रुपये, तर शहरात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते.
वृंदावन थारपारकर :-
पाच वर्षांपूर्वी पुणे शहरातील चंद्रकांत भरेकर यांनी थारपारकर देशीगाईंच्या संवर्धनासाठी मित्राच्या सहकार्याने ‘ वृंदावन थारपारकर देशी काऊ क्लब’ सुरु केला. गोसंवर्धनाबरोबरीने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, गोमूत्र, शेण आधारित उत्पादने आणि देशी गोवंश प्रसाराचे ध्येय क्लबतर्फे ठेवण्यात आले आहेत. याबाबत भरेकर म्हणाले कि, भुकूम (ता. मुळशी, जि. पुणे ) येथे माझ्या २५ एकर क्षेत्रावरील फळबागेमध्ये थारपारकर गोसंगोपनाला सुरुवात केली. राजस्थान मधील पशुसंवर्धन विकासाच्या विभागाच्या परवानगीने स्थानिक पशुपालकांकडून आम्ही पहिल्या टप्यात १५ गाई आणि वळू आणला. पुढे टप्याटप्याने १५ ते २० गाई आणत गेलो. आता आमच्या गोठ्यामध्येच जातिवंत दुधाळ गाई आणि वळू तयार झाले आहेत. या गाईंची योग्य व्यवस्थापनात दिवसाला १२ ते १६ लिटर दूध देण्याची क्षमता आहे. दुधातील फॅट ५. पर्यंत आहे. आम्ही प्रत्येक गाय, वळू, कालवाडीची नोंद ठेवली आहे. यामध्ये आरोग्य, दूधउत्पादन, लसीकरण, डीएनए टेस्ट आदींचा समावेश आहे. प्रत्येक जनावराला टॅगिंग केले आहे. दररोज १५ लिटर दुग्धोत्पादन असलेल्या गाई स्वतंत्र ठेऊन त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन आणि त्यांच्या पासून जन्मलेल्या कालवडींचे संगोपन करीत आहोत. जे. के. ट्रस्ट संस्थेच्या मदतीने चार गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले.
सध्या गोठ्यामध्ये गोवंश संशोधनासाठी २५ थारपारकर, २० गीर आणि २५ साहिवाल तसेच १५ कपिला गाईंचे संगोपन करण्यात येत आहेत. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना थारपारकर गाई, वळू देण्यात आले आहे. प्रक्षेत्रावर डेअरीची उभारणी केली आहे. सध्या प्रतिदिन २०० लिटर दुधाचे संकलन होते. दररोज सकाळी पुणे शहरातील क्लब मेंबर्स ग्राहकांना मागणीनुसार १ ते २ लिटर दूध बॉटल पॅक करून पोचवले जाते. क्लब मेंबर साठी ९० रुपये आणि ग्राहकांना ९९ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. प्रयोगशाळेतून दूध, तुपातील घटकांची तपासणी आणि प्रमाणीकरण केले जाते.
डेरीमध्ये दुधाच्या बरोबरीने दही, ताक, श्रीखंड, पनीर, लोणी, कुल्फी, पेढे, खवानिर्मिती केली जाते. त्याच बरोबरीने पंचगव्यापासून साबण, उताणे, शाम्पू, तसेच शेण, औषधी वनस्पतीच्या मिश्रणातून धुपकांडी, अगरबत्ती, दंतमंजन, निर्मिती केली जाते. गोवंश संवर्धनातील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारतर्फे वृंदावन थारपारकर देशी काऊ क्लबला राष्ट्रीय स्तरावरील कामधेनू पुस्तकाने गौरविण्यात आले आहे.
खिलार : महाराष्ट्राची शान :- खिलार हा राज्यातील देखणा गोवंश. सांगली,सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील खिलार गोपालकांनी, संशोधन, संगोपनाला चालना देण्यासाठी २०१५ मध्ये ‘ खिलार कॅटल ब्रीडर असोसिएशन ‘ ची स्थापना केली. याबाबत अधिक माहिती देताना करगणी ( जि. सांगली ) येथील पशुधन विकास अधिकारी आणि संस्थेचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. अविनाश चव्हाण म्हणाले, कि संस्थेच्या माध्यमातून जातिवंत खिलार पैदास आणि जनजागृतीवर भर दिला आहे. खिलार गोवंश शेती आणि ओढकामासाठी प्रसिद्ध आहे. खिलार गाई सरासरी प्रति दिन २.५ ते ३ लिटर दूध देते. काही पशुपालकांकडील जातिवंत दुधाळ गाई ५ ते ७ लिटर दूध देतात. या गाईंची नोंद घेतली जाते. त्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी उपयोग करीत आहोत. या गोवंशाच्या संवर्धनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. खिलारमध्ये साधारणपणे नऊ उपप्रकार दिसतात. यामध्ये आटपाडी, म्हसवड, कोस, पंढरपुरी, डफळ्या, काजळ्या खिलार असे उपप्रकार शेतकऱ्यांकडे दिसतात. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी खिलार संगोपनाकडे वळले आहेत. शेन, गोमूत्र, स्लरीचा वापर फळबागांच्यामध्ये वाढला आहे. त्यादृष्टीनेही जनजागृती करत आहोत