http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

                        आपल्या वातावरणात रुळलेले, शेकडो वर्षात जाणीवपूर्वक विकसित केलेले कशी गोवंश गेले कुठं ? आता देशी गोधनाला पूर्वीचे वैभव कसे प्राप्त होईल? हा महत्वाचा विषय सर्वांच्या पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ प्रकाशन ने प्रसिद्ध केलेले देशी गोवंश पुस्तक देशी गाईंचे संगोपन करणारे पशु पालक, तसेच यामध्ये पुढे धोरणात्मक कार्य करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन ठरणारे  आहे. 

गेल्या काही वर्षात गोपालन आणि गोसंवर्धन क्षेत्रात मोठे बदल घडतआहेत. शेतीच्या बरोबरीने एक आश्वासक पूरक उदयॊग म्हणून पशुपालन  हा व्यवसाय पुढे आला आहे. या पार्श्ववभूमीवर पशुपैदास आणि व्यवस्थापनासंबंधी तंत्रज्ञानाचा विकास होताना दिसतो. माज नियंत्रण व संमिलीकरण, भ्रूण प्रत्यारोपण, सेक्सडसीमेन, वाळूची क्षमता आजमावण्यासाठी संतती परीक्षण इत्यादी पैदास तंत्रज्ञान प्रत्यक्षात आमलात येऊ लागले आहे. देशात गोसंकरीकरणाचा आवाका वाढत असताना मात्र ‘ ब्रीडिंग पॉलिसीचा ‘ विसर पडून देशी गोवंशाचे देखील संकरीकरण होऊ लागले. त्यामुळे वातावरणात रुळलेले, शेकडो वर्षात जाणीवपूर्वक विकसित केलेले देशी गोवंश गेले कोठे? आता देशी गोधनाला पूर्वीचे वैभव कसे प्राप्त होईल ? हा महत्वाचा विषय सर्वांच्या पुढे आला आहे. या पार्श्ववभूमीवर ‘ देशी गोवंश’ पुस्तक हे देशी गाईंचे संगोपन करणारे पशुपालन, तसेच यामध्ये पुढे धोरणात्मक कार्य करणाऱ्या लोकांना मार्गदर्शक ठरवणारे आहे.

       देशी गोवंश पुस्तकामधील विविध प्रकरणामध्ये भारतीय गोवंशाच्या जाती, संगोपन आहार, पैदास, प्रजनन धोरण, आरोग्य व्यवस्थापन, उत्पादनाची निर्मिती, जातिवंत गोवंशाची निवड आणि खरेदी, पशुपैदासकार संघटना आणि आणि प्रयोगशील पशुपालकांच्या यशोगाथांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत देशी गोवंश आपल्या गोट्यामध्येच कसा विकसित होऊ शकतो. या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार पुस्तकामध्ये विविध विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकरणातून पशु व्यवस्थापनबाबत नवीन तांत्रिक माहिती देण्याचा पर्यत केला आहे. गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन होणे भविष्यकालीन दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.  हे निर्विवाद सत्य आहे. त्या दृष्टीने गोउत्पादने आणि यशोगाथा हे हे विभाग दिशादर्शक आहेत . त्याच बरोबरीने शासकीय आणि अशासकीय स्तरावर असलेल्या येजना तसेच उपक्रमांची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे.

      प्रदेशातील गोधनाचा विचार केला तर असे दिसून येईल, कि गोवंश सुधारण्यातही केवळ अभिनिवेश उपयोगाचा नाही; तसेच प्रत्येक गोष्ट शासनाने करावी हि अपेक्षाही फोल आहे. त्या ऐवजी प्रयोगशील गोपालकांनी सामान दृष्टिकोन एकत्र येणे, विचार मंथन करणे, नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे आणि आपला ब्रँड निर्माण करणे गरजेचे आहे. विभागनिहाय प्रत्येक गोवंशाची पशुपैदासकार संघटना ही संकल्पना समविचार गोपालकांनी उचलून धारावी, हा संदेशही प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे हे पुस्तक पोहचवते.

        “देशी गोवंश या पुस्तकातील पहिली आवृत्ती जुलै, २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली. आज पर्यंत या पुस्तकाच्या मराठी भाषेतील सहा आणि हिंदी भाषेतील एक आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. गेल्यावर्षी देशी गोवंश पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीला नवीदिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे डॉ. राजेंद्र प्रसाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..