स्थानिक जातींना अत्यंत कमी प्रमाणात चार लागतो व तो शेती मधून उपउत्पादन म्हणून तयार करता येते. आर्ट ऑफ लिव्हिन्गची श्री. श्री. गोशाळा नैसर्गिक शेतीच्या मॉडेलचे पुनरुज्जीवन व त्यांचा प्रसार करण्याचेही काम करीत आहे.
देशात गाईंच्या शेकडो जातींपैकी केवळ ५० शिल्लक असून, त्याही अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. आज गाईंची विशुद्ध जाती सापडणे मोट्या प्रमाणावर सुरु असलेल्या ट्रान्स- ब्रिडींगमुळे अवघड होत चाले आहे. भारतीय जातींच्या गाईंचे संवर्धन करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी बंगरूळमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर मध्ये श्री. श्री. गोशाळा उभारण्यात आली आहे. हि गोशाळा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे व तिला शेती आणि डेअरी फार्मिंग कम्युनिटीमध्ये महत्वाचे स्थान आहे. गोशाळा व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्याच बरोबर भारतीय गाईंच्या संवर्धनासाठी हि गोशाळा सुरु करण्यात आली व आज येथे शेकडो गाई असून, देशभरातील १५ विशेष जातींच्या गाईही आहेत.
श्री. श्री. गोशाळा शेतकऱ्यांसाठी फायद्याची व पर्यावरण पूरक आहे. गोशाळेतील प्रत्येक उत्पादन मौल्यवान व त्याची विक्री होऊ शकते. स्थानिक जातींना अत्यंत कमी प्रमाणात चार लागतो व तो शेती मधून उपउत्पादन म्हणून तयार करता येतो. आर्ट ऑफ लिव्हिंगची श्री. श्री. गोशाळा नैसर्गिक शेतीच्या मॉडेलचे पुनरुज्जीवन व त्याचा प्रसार करण्याचेही काम करीत आहे.
भारतीय गाईंचे वैशिष्ट्य :-
* गाईला वशिंड असते.
* नॅशनल ब्युरो ऍनिमल जेनेटिक्स रिसोर्सेसच्या अहवालानुसार भारतात गाईंच्या ५० मान्यताप्राप्त जाती आहेत. त्यातील काही अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.
* भारतीय गाईंच्या प्रजातींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विविध गोष्टींसाठी उपयोग होतो आणि त्यांच्या गुणधर्मामुळे त्या उष्ण व स्थानिक हवामानाशी सहज जुळून घेतात. त्यांचे केस, कातडी, रंग, घाम बाहेर टाकण्याची क्षमता व शरीरांतर्गत तापमानामुळे त्या कोणत्याही प्रकारच्या विषम हवामानात तग धरू शकतात
* या गाई कीटक आणि विविध आजारांचा सहज प्रतिकार करू शकतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे अन्न व चार चालू शकतो.
भारतीय गाईंपासून मिळणारे फायदे :-
* आरोग्यदायी दूध
* भारतीय गाईंचे दूध सात्विक व त्याच बरोबर पौष्टिक असते. दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या दुधामध्ये विविध जातींच्या गाईंचे दूध एकत्र केलेले असते त्यात म्हशीचे दूध मिसळले जात असल्याने त्यात फॅट्स चे प्रमाण अधिक असते. व त्यातून तामसी गुणांचा संचय होतो.
* भारतीय गाईंच्या दुधामध्ये ए२, बी, डी, ई,के, हि फ़प्रथीने सात प्रकारची खनिजे, २१ प्रकारचे अमिनो ऍसिड व २२ प्रकारचे सॉल्ट आणि २४ प्रकारचे विकर
( एन्झाइम्स ) असतात व ते दूध पचनास खूपच हलके असते.
गाईंचे शेण :-
सेंद्रिय पद्धतीच्या शेतीसाठी गाईंचे शेणखत म्हणूनच उपयुक्त ठरते. शेणाच्या गोवऱ्या अन्न शिजविण्यासाठीचे इंधन म्हणून वापरता येतात. शेणाचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठीही करता येतो व त्याद्वारे खेड्यांमध्ये विजेची मागणी पूर्ण करता येते. ताज्या शेणामध्ये मलेरिया व क्षयरोगाच्या विषाणूंना मारण्याचे गुणधर्म असतात.
गोमूत्राचे उपयोग :-
गोमूत्राच्या वापराने अनेक प्रकारच्या आजारांना बरे करता येते. यामध्ये त्वचारोगापासून मधुमेह व कर्करोगांपरेंतच्या आजारांचा समावेश होतो. श्री. श्री. आयुर्वेद हॉस्पिटल व श्री. श्री. पंचकर्माने गोमूत्राच्या वापरातून अनेक जुनाट आजारांवर यशस्वी उपचार करून दाखविले आहेत. गोमूत्रामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, कार्बोनिक ऍसिड , पोट्याश आणि लेकटोज असते. त्या २४ प्रकारचे सॉल्ट असतात व गोमूत्रापासून अनेक उपयुक्त औषधे तयार करता येतात आर्ट ऑफ लिव्हिंग देशातील प्रत्येक केंद्रामध्ये गोशाळा सुरु करण्याचे नियोजन आहेत.
श्री. श्री. गोशाळेतील भारतीय गाई
गोवंश राज्य
गिरी ————————– गुजरात
ओंगोल ———————- आंद्र प्रदेश
कांगायम ——————– तामिळनाडू
साहिवाल ——————– पंजाब
कांग्रेज ———————– गुजरात
डांगी ————————-महाराष्ट्र
थारपारकर —————– राजस्थान
हल्लीकर —————— कर्नाटक
राठी ————————-हरियाणा
पुलीकुलाम —————- तामिळनाडू
उंबालाचेरी ——————तामिळनाडू
पुंगानूर ———————-आंद्र प्रदेश