आपल्या समाजात गाईला अध्यात्माबरोबर वैज्ञानिकही तितकेच महत्व आहे. गोमय, गोमूत्रापासून केवळ औषधेच तयार होत नाहीत, तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गृहउपयोगी वस्तूही तयार होतात. गोउत्पादनातून स्वयंरोजगाराची कास अनेकांनी धरली आहे.
वैयक्तिक :-
हेअर टॉनिक, शाम्पू, तेल
पंचगव्य साबण
लहान मुलांसाठीही साबण
फेसपॅक, फेसवॉश
अंगराग पावडर
हॅन्डवॉश
फेसक्रीम
गोमायलेप
उटने
दंतमंजन
गृहउपयोगी :-
फिनेल
डिशवॉश बार
डिटर्जंट पावडर
दासांवरील कॉईल
टॉयलेट क्लिनर
सॅनिटायझर
उत्पादने :-
तूप
दूध पावडर
गोजल सरबत
पूजेचे साहित्य :-
धूप
गोबर कंडा
उदबत्ती
गोमय गणपती
शेतीसाठी पूरक :-
सेंद्रिय खत
कीडनाशके
गांडूळखत
जीवामृत
दशपर्णी अर्क
वेगवेगळ्या गोशाळांमध्ये गो उत्पादनासाठी खास मशीनरी विकसित करण्यात आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होत असते. नागरिकांमध्ये गो उत्पादनाबाबत दिवसेंदिवस जागरूकता निर्माण होत असून, या उत्पादनांना मागणीही वाढत आहे.
कणेरी मठात होत असलेले प्रयोग :-
कणेरी मठात विविध प्रकारच्या यंत्राद्वारे औषधनिर्मिती होत आहे. औषधे व अन्न पदार्थ तयार करण्यासाठी माठाने स्वतंत्र इमारत उभारली आहे. डिस्टिलेशन प्लॅंट, पणती, तेल, गोमय, व कुंडी तयार करणाऱ्या मशीनचा समावेश आहे. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी यंत्रे आहेत.
औषधांबरोबर टॉयलेट क्लिनरची निर्मिती :-
कणेरी मठात एक हजार गाईंच्या गोमूत्राच्या माध्यमातून दिवसाला सुमारे १०० ते २०० लिटर अर्क तयार केला जातो. या अर्काची बाजारभावातील किंमत २५० ते ३०० रुपये प्रतिलिटर इतकी आहे. याशिवाय आरोग्यदायी तेलाची निर्मिती केली जाते. महिन्याला सुमारे ५०० लिटर तेल या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार केले जाते. पंचगव्य घृत महिन्याला ५० किलो इतके तयार होते. ४००० रु किलो या दराने हे घृत विकले जाते. दंतमंजन, डोळ्यात, कानात घालायची औषधे तयार केली जातात. महिन्याला सुमारे एक हजार बॉटल तयार होतात. एशियाव टॉयलेट स्वच्छता करणारी औषधेहि तयार केली जातात. फिनेल, डिशवॉश, टॉयलेट क्लिनर आदी पदार्थ तयार होतात.