http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

        योगेश इंगवलेच्या दुग्धव्यसायाला मुखप्रसिद्धीच्या माध्यमातून ग्राहकवर्ग मिळाला. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने देशी गाय पाळू नको म्हणणारे ” आम्ही देशी गाई घेतो , तू दूध घे,; असे म्हणू लागले. त्यानंतर गावात देशी गाईंची संख्या वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने गोशाळेचे स्वप्न साकार झाले.

      शालेय शिक्षण घेताना इंगवलेला नेहमी काहीतरी वेगळे करण्याची आवड होती. वडिलोपार्जित शेती आणि चुलते पैलवान असल्याने आजोबांची इच्छा नातवाला पैलवान करायची होती. तब्यतीसाठी येगेश काही काळ कोल्हापूरलाही गेला, परंतु रामला नाही. कोल्हापूरहून आल्यावर ‘पंतप्रधान रोजगार योजने’तून कर्ज काढून सेंट्रिंग प्लेट भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला, तरीही वेगळे काहीतरी करावे हि मानसिकता होतीच. एक दिवस वर्तमानपात्रात सोलर ट्रेनींगच्या कोर्सबाबत “मिटकॉन ची जाहिरात वाचली. त्याने नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण केला २००८ मध्ये पहिल्यांदा वॉटर हिटर बसविण्याचे काम सुरु केले. दरम्यान इतर कामे हि मिळत होती.  त्यानंतर बावधन व पिरंगुटला कार्यालय सुरु केले आहे. त्याचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याचे भरारून कौतुक केल्याने मनाला उभारी मिळाली.

          योगेश सांगत होता, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ” गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या योग्य शिबिरात भाग घेतला. बेंगरूळ आश्रमात गुरुजींना भेटल्यानंतर त्यांनी दिलेला देशी गायीची जोपासना हा सल्ला माझ्या आयुष्यात महत्वाचा ठरला. त्यांच्या प्रेरणेतून देशी गायीची गोशाळा उभी करण्याची कल्पना सुचली. सुरुवातीला व्यवसायाच्या नफ्यातून आजारी व कसायाकडून वाचवलेली अशी एखादी देशी गाय सांभाळायची, असे ठरविले. मित्रांशी चर्चा केली. पण त्यांच्या नकारात्मक सल्ल्यामुळे वैचारिक समस्या वाढल्या. पण मी माझ्या मनाशी व विचारांशी ठाम होतो. त्यानंतर आर्ट ऑफ लिविंग ” च्या सदस्याने गोशाळा उभारणीबाबत माझी माहिती घेतली. मी त्यांना माझ्या मनातील कल्पना सांगितली. त्यांनी चांगल्या व उच्चप्रतीचे गायी घेऊन त्यांच्या पासून उत्पन्न मिळविण्याचा सल्ला दिला. व हा टर्निग पॉईंट ठरला.”

           योगेश पुढे म्हणाला, ” सुरुवातीला सात गायी घेतल्या. माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता त्या दिवशी गोशाळा सुरु केली. त्यानंतर अनेक अडचणींना सुरुवात झाली. मजुरांच्या कामातरतेबरोबरच केवळ २० ते २५ रुपये प्रतिलिटर दूध विकावे लागत होते. योगायोग म्हणा, गोमातेचा आशीर्वाद म्हणा, एक दिवस गावरान गाईचे दूध हवे असल्याचा पुण्यातील मित्राचा फोने आला. त्याने माझ्याकडे ६० रुपये प्रतिलिटर भावाने दूध घेण्याबाबत मला सांगितल्यावर मी हादरलो. मग काय गावात एकच चर्चा, योगेशने गोशाळा उभारली आणि तुपाच्या भावात दूध विकतो आहे. पण त्यावेळीही ६० रु हा दुधाचा भाव खर्चाच्या तुलनेने योग्य होता. अशा रीतीने माझ्या दूध व्यवसायाला सुरुवात झाली. मुखप्रसिद्धीच्या माध्यमातून ग्राहकवर्ग वाढला. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने देशी गाय पळू नको म्हणणारे म्हणू लागले कि, आम्ही देशी गाय घेतो. तू दूध घे. त्यानंतर गावात देशी गायीची संख्या वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने गोशाळेचे स्वप्न साकार झाले. सध्या गोशाळेत ३० ते ३५ गायी आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्हा परिषदांचा आदर्श गोपालक पुरस्कार सपत्नीक स्वीकारला माझ्या कामात पत्नी, आई, वाडील, भाऊ, मुलगा राजवीर, मुलगी राजनंदिनी आणि माझा मित्र विनायक माझिरे यांची साथ असते. गोशाळेमधील दूध, पनीर, तूप, व इतर पदार्थ, व उत्पादनेत सध्या सत्तर ते ऐंशी कुटुंबियांना पुरविली जातात. गोशाळेत गीर, साहिवाल, राठी या देशी गोवांच्या उच्च प्रतीच्या गायींचे संगोपन सुरु आहे. गायींना कोणत्याही प्रकारचे इंजेक्शनं दिले जात नसून, त्या निसर्गात मुक्तपणे चारण्यासाठी जातात. त्यामुळे त्या निरोगी व धष्ठपूष्ठ राहतात. जंगलात, रानात, चारण्यामुळे दुधात नैसर्गिकरित्या औषधी गुणधर्म निर्माण होतात. त्यामुळे दुधाची व तुपाची तशीच मागणी वाढत आहे. “

 उपउत्पादनांतूनही कमाई :-

                ” आम्ही शेणापासून शेणखत, गोखुरखत, गोवरी, बारा ते तेरा प्रकारच्या जडीबुटी, भीमसेनी कपूर व तूप यांपासून बनविलेली रसायनविरहित धूपबत्ती तयार करतो. त्यामुळे घरात वातावरण शुद्ध होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते . त्याचबरोबर शेणापासून ओम, सात्विक, हवनकुंड, शुभ लाभ , गणपती मूर्ती पणती, सिडबॉल, आदी साधारण तीस ते चाळीस प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. त्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. गोमूत्रापासून गोनायल ( फिनेल ) बनविले जाते. घरात, कार्यालयात याचा वापर केल्याने मुंग्या, डास यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. गोमुत्रापासुन गो आर्क हि विक्रीसाठी असते. गोशाळेची आधुनिकतेची  वाटचाल करण्यासाठी डिजिटल व ऑनलाईन मार्केटिंग कडे लक्ष देत आहे. भविष्यात शेणापासून लकिड विटा, बागेत लागणाऱ्या कुंड्या बनविण्याचे काम सुरु करीत आहोत. त्यामुळे गोशाळा स्वावलंबी बनणार असून, ,अनेक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे.” असेही योगेश ने सांगितले.

                 भारतातील कोणत्याही पालकांना प्रश्न केला, कि तुमच्या पाल्य मोठेपणी कोण बनविणार, तर उत्तर मिळते डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, मात्र, गोपालक बनवायचे आहे. असे उत्तर मिळणार नाही. भविष्यात पाल्याना गोपालक बनविण्यासाठी गोष्टीलाही सक्षम असायला हवी. पूर्वीपासून देशी गाईला  धार्मिक दर्जा आहे, तसेच आता वैज्ञानिकदृष्ट्या देशीगाय फायद्याचीच असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न योगेश करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..