http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

शेतकरी मित्रा; ‘या’ सोप्या पद्धतींचा अवलंब केला तर तुही होऊ शकतो चांगला निर्यातदार 

भारत देशात सर्वात जास्त उत्पादन कृषीपूरक पिकांचे होत असते. येथील स्थानिक बाजारपेठेत जर आपण आपला माल विकला तर त्याला म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. त्या ऐवजी आपण त्याच मालावर प्रक्रिया करून जर विविध वस्तूंचे उत्पादन केले आणि त्याला निर्यातक्षम बनवले तर आपणास मोठ्या प्रमाणावर परदेशी मार्केटमध्ये भाव मिळू शकतो. 

आपली अर्थव्यवस्था कृषीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादित आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेली उत्पादने दुसऱ्या देशात निर्यात करण्यासाठी काही परवाने काढणे गरजेचे आहेत. आयात आणि निर्यात संदर्भातील परवाने काढण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा परवाना काढणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट उघडावे लागते. त्यामाध्यमातून आपण याबाबतचे व्यवहार करू शकता. 

आयात निर्यात परवाना कसा काढावा याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. आपल्याला आयात निर्यात परवाना काढताना प्रपत्र ANF२A या फॉर्मचा भाग ए आणि डी हा भरून अर्जदाराच्या स्वाक्षरीने सहसंचालक विदेश व्यापार पुणे, मुंबई किंवा नागपूर या पत्यावर आपण पाठवू शकता. यासाठी आपल्याला काही प्रमाणात चार्ज पण भरावा लागतो. 

आयात निर्यात परवाना तुम्हाला काढायचा असल्यास पणन महामंडळाकडे शेतकऱ्यांसाठी ५७३ रु, संस्थांसाठी ११४५ रु आणि खाजगी व्यापाऱ्यांसाठी २२९० रुपये चार्ज आकारला जातो. मार्केट मध्ये आयात करणारा व्यापारी कसा शोधावा याला पण काही पर्याय सांगण्यात आले आहेत. आपल्याला अपेडाचे ट्रेड लीड्स, इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आदी ठिकाणांवरून याबाबतची अधिक माहिती आपल्याला मिळू शकते. 

आपल्याला ज्या देशात आपला माल पाठवायचा आहे त्या देशाच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क केलात तर अधिक माहिती मिळू शकते. तसेच आपण तेथील स्थानिक बाजारपेठेशी संपर्क केला तरी अधिकची माहिती मिळू शकणार आहे. आयात आणि निर्यात करताना त्याची सुरुवात कशी करावी याला पण काही नियम ठरवून दिलेले आहेत. 

आपण जेव्हा आयात, निर्यात सुरु करू तेव्हा आयातदाराशी प्रथमतः आपण संपर्क साधायला हवा. त्यानंतर त्याला कोणत्या मालाची गरज आहे त्याची तपासणी करायला हवी. त्यानंतर त्याच्याशी ईमेल किंवा फॅक्सच्या माध्यमातून संपर्क साधावा. त्याचा जेव्हा प्रतिसाद येईल तेव्हा त्याच्याशी मेलद्वारे संपर्क साधावा. जेव्हा आपण माल आयात करण्यास सुरुवात करू तेव्हा समोरच्या व्यक्तीची बाजारपेठेतील पत तपासणे खूप गरजेचे आहे. आयातदाराकडून आपली फसवणूक होऊ नये म्हणून हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. 

आपण आपल्या मालाचा विमा पण उतरवू शकता. एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्प्रेशन इंडिया यांच्याकडून आपण विमा उतरवून घेऊ शकता. आपण ज्या देशात आपला माल पाठवणार आहेत त्या देशातील निर्यातीसंदर्भातील नियम आधी समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण त्या मालाच्या गुणवत्तेची आणि पॅकिंगच्या माहितीनुसार माल पाठवू शकता. 

आपण माल पाठवणार असाल तर कस्टम हाऊस एजेंटची आपल्याला आवश्यकता भासू शकते. त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाची मदत घेऊ शकता. जेव्हा आपल्याला आयातदाराकडून रक्कम प्राप्त होते तेव्हा ती परकीय चलनात असते. तिला भारतीय रुपयात रूपांतरित केल्यानंतर ती आपल्याला मिळू शकते. या क्षेत्रात सुरुवातीला कमी प्रमाणावर व्यवहार करावेत. जस जसा अनुभव येत जाईल तस तसे आपण यातील व्यवहार वाढवले तर नंतर काळजी राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..