http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

 गाईला आपण “गोमाता ” म्हणतो, सर्वसामान्यपणे गो व माय हे शब्द जोडीने वापरले जातात. जन्म देते ती माय व नंतर सर्व इंद्रियांचा विकास करून मुलाला वाढवते ती गाय । गाईची उपमा मनुष्याच्या इंद्रियस्वभावांना दिलेली असते. गाय जशी  दिवसभर इकडे तिकडे भटकते त्याच प्रमाणेच इंद्रिये स्वतःच्या विषयाचे सेवन करण्यासाठी दिवसभर बाहेर भटकतात व धडपडतात. इंद्रियांच्या या जन्मात प्रवृत्तीचा अभ्यास करून त्याचे तत्व जो समजून घेतो, तो गोविंद गोपाल,। संपूर्ण सुष्टीला हवे ते देणारी व मनुष्यमात्रांचे संवर्धन व कल्याण करणारी अशी जी गाय समुद्रमंथनातून बाहेर आली., तिचे नाव कामधेनू.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।

            श्रीमंत आद्य शंकराचार्य यांनी एक स्रोताची सुरुवात अशी ज्याची शक्ती आहे. सर्वाना आकर्षित करणारी अशी ज्यांची शक्ती आहे, तो श्रीकृष्ण. म्हणजे साहजिकच परमेश्वर. श्रीकृष्ण या नावानंतर लगेच गोविंद अश्या नावाचा उल्लेख केला. गो म्हणजे गाय, हे आपणा सर्वाना माहित आहे. आणि गो या शब्धाला विद  म्हणजे जाणून घेणे या धातूपासून बनलेला शब्ध लावून गोविंद हा शब्ध बनला आहे. ” गो धानाचे संपूर्ण ज्ञान ज्याला झाले आहे, तो गोविंद- श्रीकृष्ण आणि गाईंचे पालन- पोषण करणारा तो गोपाल ।

श्रीकृष्णाचे बालपण अत्यंत यशस्वी होते. बालपणापासूनच त्यांनी लोककल्याणाचे काम केले.

           ऐन उमेदीत गृहस्थाश्रमाचा जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पेलली, एक यशस्वी राजा म्हणून त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे व उदंड लोकप्रियता मिळवून राज्य केले, घराघरांवर सोन्याची कौले चढविली, दृष्टांचा संहार करून सज्जनांना तारुण्याचे कार्य केले, नात्या-गोत्याच्या मोहमायेच्या गुंतवल्यात न अडकता वाईट शक्तीचा नाश हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. अशा प्रकारे श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य कशामुळे यशस्वी झाले आले, तर ते गोविंद या गुणवत्तेमुळे. श्रीकृष्णांनी गाईचा व गोसेवेचा महिमा ओळखला व शेती प्रदान देशाला मदत करणाऱ्या पशुधनाचे माहात्म्य ओळखले, तसेच निसर्ग पर्यावरणाची काळजी घ्यायची असल्यास पशुधनातील सर्वात महत्वाचा घटक असलेल्या गाईचे महत्व समजून घेणे खूप गरजेचे आहे, हेही ओळखले आणि म्हणूनच सगळ्या बाजुंनी ते विजयी झाले.  केवळ पैशाच्या लोभापायी किंवा दुसरा कोणताही व्यवसाय करणे शक्य नसल्यास दूध-दुभत्याच्या व्यवसाय करणे वेगळे आणि समजून घेऊन व्यक्तींचे व साष्ठीचे कल्याण या व्यवसायाने होईल अशा ,विचाराने त्यात लक्ष घालणे वेगळे.   श्रीकृष्ण या ठिकाणी गाईचे महत्व ओळखून ते लोकांना पटविण्याचा प्रयत्न करतात.

महत्व गाईच्या दुधाचे :-

                गाय दिवसभर फिरते  ती कधीच एका ठिकाणी बसत नाही गाय उन्हातानात अरण्यात ठेवते गवत खाते व तिचा  आहार कमी असतो म्हशीच्या तुलनेत गाईने दूध कमी दिले  तरी त्याच्या आकाराच्या तुलनेत गाय दूध जास्त  देते.  गाईच्या दुधाचा उपयोग सर्वमान्य  आहेच.  गाईचे दूध पचायला सोपे असते.  जन्मजात मुलाला आईचे दूध  मिळू शकले नाही तर त्याच्यासाठी गाईच्या दुधाची योजना केली जाते,  एवढे  ते पचायला सोपे असते.  गाईच्या दुधाचा  हृदय व  मेंदू या महत्वाच्या अवयवांना जास्त उपयोग होतो म्हणून मेंदू संबंधी,  डोळ्या संबंधित असणाऱ्या औषधांमध्ये गाईच्या दुधाचा व गायीच्या तुपाचा वापर केलेला असतो.  अर्थात म्हशीचे दूध पचायला थोडे जड असले तरी त्याचे हे फायदे आहेतच.  म्हशीचे दूध घ्यायचे असल्यास ते गाईच्या दुधापेक्षा थोडे कमी घ्यावे,  हे सर्वांना माहीत   आहेच.  गाईचे दूध,दही लोणी तूप या सर्व गोष्टींचा भरपूर वापर केला तर मुळात रोग देणार नाही व आले तरी बरे करणे सोपे होईल ही मेख लक्षात घेऊन श्रीकृष्ण आणि स्वतःच्या प्रत्येक अस्तित्वा बरोबर गाय जोडली गेलेले असेल अशी योजना केली. गायीच्या बऱ्याच जाती असतात गीरच्या जंगलातील गिरगाय तिला आपण श्री दत्ताची गाय म्हणून हे खूपच प्रसिद्ध जात आहे सर्व उपयोगी गाईचे महत्व वाढविण्यासाठी महादेवांनी आपले वाहन म्हणून नंदीला स्थान दिले अनेक वर्षे भारतीय संस्कृती गायला मिळालेले प्रसिद्धीचे स्थान उगाचच मिळालेले नसणार. गाईच्या सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे बाळाला बाहेरचे अन्न या स्वरूपात दूध सर्वप्रथम दिले जाते नंतर मनुष्य जसा मोठा होईल व मेहनत करायला लागेल तसतसे जड पदार्थ ही त्याला चौथा येऊ लागतील परंतु धान्य बाळासाठी पचायला हलका असल्याने गाईच्या दुधाला किंवा एकूणच दुधाला पर्याय नाही व   त्यामुळेच गायीचे महत्त्व आहे.  दूध सेवन केल्यानंतर साधारण 24 तासात पत्ते व त्याचे वीर्य धातूत  रूपांतरण  इतर वस्तूच्या तुलनेने लवकर होते.  त्यामुळे हे गाईचे महत्त्व वाढलेले आहे गाईला मानाचे स्थान देण्याच्या दृष्टीने आपल्या भारतीय परंपरेत दिवाळीच्या दिवसात गोवा स्थळ द्वादशीला सवत्स गाय लहान वारसा सहित असलेली गाय पुजली जाते त्यानंतर पुढे दिवसात लक्ष्मीची पूजा केली जाते

 आरोग्य शेती आणि आरोग्य:-

  अंनद भवन्ति भूतान असे म्हटले आहे म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला अन्नाची गरज असते शास्त्रशुद्ध पद्धतीने व अनुभवावर आधारित शेती केल्यास मनुष्याला चांगले अन्न  मिळवून आरोग्य  टिकवून राहते.  उत्तम शेती साठी उत्तम मदत नेसाचीही आवश्यकता असते म्हणुन मनुष्याने विचारपूर्वक बैलाला शेतीत उपयोगाला आणले बैलाबरोबर गाय आली दुधातील गायचा उपयोग होतोच पण शेण व गोमूत्र हे दोन्ही शेतीसाठी अत्यंत पूरक असतात शेणखत ऐवजी इतर खतांचा उपयोग केल्यामुळे शेतजमिनीचे काय नुकसान झाले आहे याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत झाडांचा पालापाचोळा शेन यापासून तयार झालेले खत हे सेंद्रिय शेती साठी उपयोगाला येते खतासाठी गोमूत्र आवश्यक असतेच पण त्याहूनही गोमूत्राचा मोठा उपयोग आहे कीटकनाशक झाडांवर पिकांवर कीड आळ्या माशा यांचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांचे पिकांचे अतोनात नुकसान होत असते त्यासाठी गोमूत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. 

 उपयोग गोमूत्राचा:-

 सध्याच्या आधुनिक काळात मनुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरलेले असतात त्यावर उपचार करताना सेवन केले जाणारे अन्न शुद्ध असणेही महत्त्वाचे आहे हे लक्षात आले आणि पर्यायाने गोमूत्र व शेण वापरून केलेल्या शेतीचे महत्त्व खूप वाढले गोमूत्राचे अनेक उपयोग आहेत व मुद्रा चा अर्थ करता येतो फुलांमधून तेल काढून घेऊन त्यापासून अत्तर बनविले जाते तसेच गोमूत्र उकळून त्याचा विचार करता येतो हा अर्क अशा औषध म्हणून वापरता येतो मूत्र रोगावर गोमूत्राचा उत्तम उपयोग होतो असे सांगितले आहे हे ताजे गोमूत्र घेण्याचा आहे खूप उपयोग होऊ शकतो साधारणतः पाच-सहा चमचे गोमूत्र सुती कापडातून सात वेळा गाळून घेऊन त्यात तेवढेच पाणी घालुन रोज नियमित  घेण्याने फक्त शारीरिक लाभ होतात असे नाही तर व्हायरल इन्स्पेक्शन पासून संरक्षण मिळते पाळीव गाय तिचा आहार आपल्याला माहीत असतो जिला प्रेमाने वागवले जाते अशा गाईच्या व मुद्रा चा वापर करावा असे शास्त्रात सांगितले आहे वर्षातून एकदा दोनदा पंचगव्य प्राशन करून शरीर शुद्धी करावी मोठ्या रोगांना आवरायचे असेल मानसिक बाधा दूर  करायचा असतील तेव्हा पंचगव्य किंवा साधे व मूत्र घेण्याने फायदा होतो मानसिक अस्वस्थता असता मनाचे रोग झाले असता गोमूत्राचा उपयोग होतो हे अनेकांना आलेल्या अनुभवावरून कळू शकते

महत्व ये 2 दुधाचे:-

 सध्या गाईच्या म्हणजे देशी गाईचे महत्व लोकांना समजू लागले आहे.  जी गाय बाहेर उन्हात फिरते,  बाहेर पुरणात  चरते, जी एका ठिकाणी बांधून ठेवलेली नसते, जिला सिंग व वशिंड आहे, जिला मानसिकदृष्ट्या त्रास होईल अशी शेतकऱ्यांकडून  वागणूक मिळत नाही, जी स्वच्छ ठेवलेली असेल, विशेषतः जिच्या  स्तनाची स्वच्छता उत्तम प्रकारे ठेवलेली असेल, ज्याला गायीचे शेण- गोमूत्र गोळा करण्याची नीट व्यवस्था केलेली असेल, अशा गाईंचे दूध व गोमूत्र वापरण्यास उत्तम असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..