http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

देशी गोवंशापासून मिळणारे शेण, गोमूत्र या घटकांचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारत जातो. सेंद्रिय घटकांच्या वापराने पीक उत्पादकता खर्च नियंत्रणात आला; तसेच गुणवत्तापूर्ण शेतीमालाला ग्राहकांची मागणी वाढली.

     शेतीचा मूळ आत्मा गोपालन आहे. कारण शेणखतापासूनच उपयुक्त जिवाणू तयार होतात, जमिनीची सुपीकता वाढत जाते सेंद्रिय कर्ब् वाढविण्यातही यांचे योगदान मोठे आहे. देशी गोवंशापासून मिळणाऱ्या शेणखतामध्ये मोट्या प्रमाणात सूक्ष्म आणि मुख्य अन्नद्रवे तयार करण्याची क्षमता आहे. मात्र प्रक्रियेविना त्यांचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. यासाठी मी अलौकिक खत आणि विद्राव्य स्वरूपात गोसंजीवक, गोकृपा, अमृतमय तयार करतो. त्यांचे चांगले परिणाम जमीन सुपीकता आणि पीक गुणवत्तेमध्ये दिसून आले.

      जमीन सुपीकतेसाठी उपयुक्त घटक पिकांच्या अवशेषातून उपलब्ध होतात. निसर्गताच हे निर्माण करण्याची क्षमता असल्याने आपण त्यांचा वापर करण्याचे तंत्र जाणले पाहिजे. या माध्यमातूनच सेंद्रिय कर्ब् वाढविणे शक्य होते. त्या करीत इतर काही विशेष करण्याची गरज नाही. मात्र त्याचा मूळ स्रोत हा देशी गोवंशपालनापरच आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मी सध्या गावठी गाई, तसेच लाल कंधारी, देवणी आणि गिरी गोवंशाचे संवर्धन करीत आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मी अलौकिक खत, गोसंजीव खत आणि गोकृपा अमृतम माझ्या शेतावर तयार करतो. यासाठी देशी गाईंचे शेण, मूत्र, शेतातील सेंद्रिय घटकांचा जास्तीत जास्त वापर करतो.

     विनाखर्चिक आणि शेती उपयोगी घटकांचे उत्पादन देशी गोवंश संगोपनातून करता येते. त्यामुळे देशी गोवंश संगोपन हे स्वावलंबी शेतीचे प्रतीक आहे. शेण, गोमूत्राच्या माध्यमातून तयार होणारे जीव-जंतू, जिवाणूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक पद्धती विकसित करावी लागते. अन्न पाणी, हवा, या प्रत्येकाच्या सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत. त्या करीत शेतात वृक्ष लागवडीचे नियोजन महत्वाचे आहे. कारण वाढत्या तापमानामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंवर अनिष्ठ परिणाम होतो त्या करीत शेतात २०० ते ३०० फुटांवर झाडांच्या रांगा आसल्या पाहिजेत झाडांच्या रांगा पूर्व- पश्चिम असाव्यात. उत्तर-दक्षिण दिशेला बेल, पेरू, सीताफळ, लहवड असावी. 

       गोपालन आणि वृक्ष यांच्यात अभिन्न आणि वैज्ञानिकदृष्ट्या नाते आहे. या माध्यमातून तापमान नियंत्रणासोबत सजीवांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जीव-जंतू, जीवाणूंना खाद्यान्न लागते, त्या वेळी गोपालन आणि नैसर्गिक घटक महत्वाची भूमिका बजावतात. जिवाणूंच्या खाद्यासाठी आपल्याला तीन प्रकारच्या अवशेषांचा वापर करावा लागतो. पिकातून निघणाऱ्या तणांचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य विकसित करावे लागते पिकांचे अवशेष न जळता ते कुजवून त्यांचा वापर, तसेच हिरवळीचे खत तयार करण्याचे कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे. या सर्व सेंद्रिय घटकांचा पुरेपूर वापर केल्यानंतर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब् वेगाने वाढतो. या सगळ्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर कीड- रोग नियंत्रणाची गरज पडत नाही. करान्नीसर्गिक संतुलन तयार होते.

       गोपालना मुले बांधावर वृक्ष लागवडीची संकल्पना पुढे आली. यातूनच पक्ष्यांच्या वावर शिवारात वाढला आणि ४०% कीडनियंत्रणाच्या व्यतिरिक्त असंख्य जीव-जंतू शेती परिसरात, जामिनिट तयार होतात. सेंद्रिय घटकांच्या वापराने जमीन भुसभुशीत झाली, पावसाचे पाणी जिरू लागले या,उले धावणारे पाणी चालने आणि चालणारे पाणी बसने शिकते. एवढ्या बाबी एका देशी गोपालनातून शक्य होते. हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. या पद्धतीने शेती केली तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शेती नफ्याची आणि कमी खर्चाची असल्याने आर्थिक संपन्नता येते. परिणामी व्यक्ती, मानसिकताणापासून दूर राहते. हे कारण देखील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारण्याला पूरक ठरते.

तयार करा शेतमालाचा ब्रँड :-

             शेतकरी उत्पादनापुरताच मर्यादित राहतो, त्याची बाजार अवलंबिता आहे. त्यांनी ती कमी केल्यास निश्चितच  फायदा होणार आहे. ग्राहकांची मागणी वाढवावी याकरिता शेतकऱ्यांनी नमुन्यादाखल सेंद्रिय ऊत्पादनाची गरज पडल्यास फुकटात ब्रॅण्डिंग करावे. मी सुरुवातीला पाचशे कुटुंबियांशी संपर्क साधला त्यांना उत्पादित केलेल्या शेतीमालातील पोषक घटकांबाबत सांगितले. त्यांना सॅम्पल दिल्यानंतर त्यापैकी २०० कुटुंबियांकडून मागणी आली आणि माझ्याकडील तूरडाळ, हळद पावडर हातोहात विकली गेली. अशा प्रकारे स्वतःच्या पातळीवर बाजार साखळी विकसित केल्याने फायद्यात वाढ झाली आहे. मार्केटिंगचे असे पर्याय देखील शेतीमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी पोषक ठरतात. प्रत्येकाने आपापले विक्रीचे मॉडेल विकसित केले तरच निश्चित पणे आर्थिक नफा वाढतो, हे मी अनुभवतो आहे.

पीक व्यवस्थापनाचे सूत्र :-

             माझ्या शेती पद्धतीत खत, फवारणीचे तंत्र हे शेतकऱ्यांचे असल्याने पीक उत्पादकता खर्च कमी झाला. परंतु पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजनाच्या पद्धती शिकता आल्या पाहिजेत. एका पिकानंतर लगेच दुसऱ्या वर्षी तेच पीक पुन्हा घेण्यात येऊ नये. पीक नियोजनाचे हे शास्त्र शिकावे लागेल. मी तरीसुद्धा हिरवळीचे पीक घेतो. या माध्यमातून जमिनीच्या सेंद्रिय कर्ब् विकसित झाला. त्यातून जमिनीची सुपीकता वाढविली. माझ्या शिवारात कापूस, हळदीचे पीक दुसऱ्या वर्षी उत्तम येते. तूर सोडून कोणतेही पीक घेतल्यास त्याची प्रत चांगली आणि उत्पादकता अधिक मिळण्यास मदत होते. व्यवस्थापनाच्या अशा बाजूदेखील अभ्यासून शेतीपद्धतीत स्वीकार केला पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..