http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

वाजगाव ( ता. देवळा जि. नाशिक ) येथील बाळासाहेब देवरे आणि भावंडानी आई-वडिलांच्या कष्टापासून प्रेरणा घेत शेती आणि देशी गोवंश संवर्धनाचा प्रेरणादायी वसा जपला आहे. सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत जमिनीची सुपीकता वाढविण्यास फलोउत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारले आहे.

        नाशिक जिल्हा हा प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. वाजगाव ( ता. देवळा , जि. नाशिक ) येथील बाळासाहेब देवरे आणि त्यांच्या भावंडानी वडील काडुजी आणि आई पार्वती यांच्या शेतीमधील काष्टापासून प्रेरणा घेत शेतीमध्ये स्वतःची वेगली ओळख तयार केली आहे. वाजगाव शिवारातील शेतीमध्ये केवळ, बापूसाहेब, बाळासाहेब, शिवाजी, संजय, आणि राजाराम यांचे एकत्रित कुटुंब राबत आहे. शेतीची प्रमुख जबाबदारी बाळासाहेब यांच्याकड आहे. कालानुरूप बदल स्वीकारत देवरे कुटुंबीय १९९० पासून पारंपरिक पिकांकडून फलोत्पादनाकडे वळले. यापुढील टप्प्यात गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती नियोजनाची दिशा पकडली आहे. शेतीसह व्यावसायिक क्षेत्रात देवरे बंधूंची प्रगती वाखाणण्याजोगी आहे.

देशी गोवंशाचे संगोपन :-

          आई-वडिलांना गाईचा लळा होता. १५ ते २० गाईंचे संगोपन ते करायचे. “आपली काली आई आणि देशी गाय हि शेतकरी खरी संपत्ती आहे.” हा वडिलांचा विचार. सुरुवातीला अवघी ४० एकर जमीन असताना. कष्टातून ती ७० एक्कर केली. हे सर्व श्रेय कुटूंबाच्या एकी व कष्टाचे आहे. माझे वडील म्हणायचे, “जोपर्यंत हयातीत गाईची जोपासना शक्य आहे. तो पर्यत करावी., आयुष्यात गोमातेची सेवा केल्यास कधी कमी पडणार नाही. वडिलांचा हाच आदर्श विचार समोर ठेवून गेल्या ४० वर्षांपासून देशी गोवंशाचे संगोपन केल्याने शेतीमध्ये बरकत आल्याचे बाळासाहेब अभिमानाने सांगतात.

            देवरे यांच्या गोठ्यात सत्तरहून अधिक देशी गाई आहेत  गाव परिसर किंवा कुठल्याही पशुपालकाला देशी गाय सांभाळण्यात अडचणी आल्यास देवरे कुटुंब असे गोवंश आनंदाने स्वीकारुण संगोपन स्वखर्चाने करतात. देवरे यांनी १०० जनावरांसाठी मुक्त संचार गोठ्याची उभारणी केली आहे. गाईंसाठी तीन एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने चारा, पिके घेतली जातात. देवरे यांच्या घरातील आबालवृद्ध गायींची सेवा करतात. गाईंचे दूध हे धार न काढता लहान वासरांना पाजले जाते. गाईचे शेण, आणि गोमूत्र फक्त आपल्या शेतीसाठी या पद्धतीने नियोजन आहे.

गोवंश हीच जमीन सुपीकतेची ताकत :-

        ऐकून ७० एकर क्षेत्रावर रसायनिक खतांचा फारसा वापर न करता सेंद्रिय व जैविक खाते वापरण्यावर त्यांचा भर असतो. गोमूत्र संकलित करण्यासाठी २० हजार लिटर क्षमतेची सिमेंट टाकी बांधली आहे. गोमूत्रात विविध उपयुक्त जिवाणू संवर्धक मिसळले जाते. हे द्रावण आणि जीवामृत मड पंपाच्या साहाय्याने उपसा करून पिकांना दिले जाते. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च बऱ्यापैकी कमी होऊन पीक उत्पादन वाढले. शेतीमालाची गुणवत्ता सुधारल्याने व्यापाऱ्यांकडून बांधावरच जास्तीतजास्त फळांची खरेदी होते.

शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट खतनिर्मिती

         शेतीसाठी सेंद्रिय खताची वर्षभर उपलब्धता होण्यासाठी गायीचे शेण, कोंबडी खत, नागरी क्षेत्रातील कंपोस्ट खत आणि शेतातील कुजणारे टाकाऊ घटक एकत्र संकलित करून डेपो केला जातो. हे घटक एकसारखे मिसळून चाळणी केल्यानंतर शेतात वापरण्यापूर्वी त्यामध्ये पीएसबी, केएसबी, यांसारखे उपयुक्त जिवाणू संवर्धक मिसळून गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खात निर्मिती केली जाते. दर वर्षी अशा पद्धतीने १०० ट्रॉली सेंद्रिय खताची निर्मिती होते.

          दरवर्षी फळपिकांना आणि इतर पिकांना सेंद्रिय खत दिले जाते. पाचटाचे आच्छादन केले जाते. यामुळे सेंद्रिय कर्ब् वाढण्यास बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत आद्रता टिकवून ठेवली जाते. तन नियंत्रण आणि पाणी बचत होते. गेल्या वीस वर्षांपासून सुरु ऊस लागवड केल्यानंतर सलग पाच वर्षे खोडवा घेण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अखेरच्या खोडव्याला ६० टन उत्पादन मिळाले आहे.

शेतीची साचेबद्ध आखणी :”-

            संक्षित पाण्यासाठी पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे, एक एकरावर शेडनेट, शेतमाल, हाताळणी व प्रतवारीसाठी पॅकहाऊस, कांदाचाळ, पक्की बांधणी व जाळीच्या झाकणासह विहीर, संपूर्ण क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाचा अवलंब, आधुनि परिपूर्ण शेती-यांत्रिकीकरण, शेतमजुरांना निवास व्यवस्था, संपूर्ण शेत्रालगत कुंपण, शेतातर्गत पक्के मुरूम रस्ते, शेतीची देखरेख करण्यासाठी बांधलेला मनोरा, शेताच्या कानाकोपऱ्यातील स्वच्छता देवरे यांच्या शेतीस भेट देणाऱ्या प्रत्येकास मोहून घेते.

फलोत्पादन शेतीचे प्रयोगशील मॉडेल :-

           ११९०पासून देवरे कुटूंबियांनी द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत आर्थिक सुबत्ता मिळविली. सुमारे ४८ एकरावर डाळिंब लागवड झाली, परंतु तेलकट डाग रोगामुळे डाळिंब क्षेत्र कमी करत आधुनिक संकल्पनांची सांगड घालून पेरू, सीताफळ, नारळ, आंबा लागवडीवर भर दिला. यासह प्रायोगिक तत्वांवर सफरचंद, काजू, सुपारी, मसाला पिके, संत्री, मोसंबी, जांभूळ,लागवडदेखील केली आहे. बाजार पेठेच्या अंदाज घेत टोमॅटो, वॅल, कांदा, मिरची, आले, लागवड केली जाते. शेतीमालाची विक्री प्रामुख्याने नाशिक, मुंबई, सुरत मार्केटमध्ये केली जाते.

सात हजाराहून अधिक जनावरांच्या भेटी :-

            देवरे यांच्या शेतीला कृषी मंत्री दादा भुसे, यांसह आजी-माजी मंत्री, उच्च पदस्थ अधिकारी, शेतकरी आशा जवळपास सातहजारांपेक्षा अधिक जणांनी भेट दिली आहे. याशिवाय दरवर्षी नाशिक जिल्यातील शैक्षणिक सहली त्यांच्या शेतावर येतात.

प्रयोगशील कुटूंबाचा नावलौकिक :-

            सामाजिक उपक्रमात सहभागी आणि समाजाशी एकरूप अशी देवरे कुटुंबाची नाशिक जिल्ह्यात ओळख आहे. शेतीमध्ये प्रयोगशीलता जपल्याने १९९८ मध्ये कृषी विभागाने बाळासाहेब देवरे यांच्या आई पार्वतीबाईयांना तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते ‘जिजामाता कृषीभूषण ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब यांना अन्नधान्य- गळीत धान्य पीक स्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. २०१९ मध्ये राज्यसरकारच्या कृषी विभागाचा ‘उद्यानपंडित’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..