http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

                 “खेड्याकडे चला” असा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता. ग्रामविकासाच्या  त्याच्या संकल्पनेत गाय अग्रस्थानी होती, मात्र केवळ दुधासाठी गाईचा उपयोग न होता शेतीसाठी उत्तम प्रतीचे बैल मिळावेत,शेणखताच्या माध्यमातून कंपोस्ट आणि गोमूत्राच्या वापरातून शेतीचा पोत  सुधारावा, असे गांधीजींना अपेक्षित होते. पुरकसंशोधनावरही त्यांनी भर दिला.

              महात्मा गांधी १९३४च्या दरम्यान साबरमती आश्रम सोडून वर्धा येथे आले . त्यांची अहिंसावादी हीच प्रतिमा जनामासात प्रचलित आहेत, मात्र ते संशोधकही होते, हि बाजू प्रभावीपणे समोर आलीच नाही. वर्ध्यात आल्यानंतर त्यांनी ग्रामविकासाला पुरक रोजगारनिर्मितीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या १२ संस्थांची उभारणी केली. त्यामधे चरख्यावरील सूतकताई व इतर रोजगारभिमुख उपक्रमांचा समावेश होतो. देशांच्या ज्या भागात ज्या जातीचा देशी गोवंश असेल, तो तेथील वातावरणाशी एकरूप  होतो. त्यामुळे त्यांचे संवर्धन व्हावे, त्यासोबतच त्याची शेतीकामातील उपयोगिता वाढवण्याकरिता पूरक संशोधन व्हावे, असे महात्मा गांधी यांना वाटत होते. वर्धा जिल्यात गवळाऊ गाय आहे. गाईची दूध उत्पादक्ता कमी असली, तरी त्या गाईपासून मिळणाऱ्या बैलांचा शेतीकामी प्रभावी उपयोग होतो याची जाणीव त्यांना अभ्यासाअंती झाली. वर्धा जिल्यात काळी माती आहे या मातीमध्ये काम करण्यासाठी लहान खूर असलेले बैल उपयोगी ठरतात. गवळाऊ गाईपासून मिळणाऱ्या बैलांचे खूर असे लहान होते, त्यामुळेच या स्थानिक जातीच्या गाईंच्या संवर्धनाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या करीता कारंजा घाडगे तालुक्यातील हेडीकुंडी गवळाऊ गाय संवर्धन आणि संशोधन केंद्राची उभारणी त्यांनी केली. 

दर्जेदार चाऱ्यासाठी :-

              गवळाऊ गाईंच्या संवर्धन आणि संशोधनावरच भागणार नाही, तर दर्जेदार चाऱ्याचीदेखील गरज भासणार आहे. या जाणिवेतून त्यांनी हेडीकुंडी परिसरातच चार संशोधन केंद्रहि उभारले, त्या वेळी विविध जातीच्या चार पिकांची लागवड या ठिकाणी करण्यात आली होती. देशांतगर्त, तसेच जागतिक स्तरावरील संशोधकांना या ठिकाणी त्यांनी बोलावले होते.  गावखेड्यात त्या वेळी शेताच्या बांधावर गवत राहायचे. या माध्यमातून जमिनीची धूप थांबवत होती. गवताच्या संवर्धनाला शेतकऱ्यांनी याच कारणामुळे प्रोत्सहन दिले पाहिजे, यासाठी देखील ते आग्रही राहत याच गवताचा वापर दुधाळ व शेतीकामी असलेल्या जनावरांसाठी चारा  म्हणूनही होत होता. अशा लहान लहान बाबींमधून त्यांच्या सौंशोधक वृत्तीचा परिचय झाल्याशिवाय राहत नाही. गरमविकासात देशी गाय आणि त्यांच्या पासून मिळणारे बैल हे महत्वाचे ठरतात. याच विचारातून त्यांनी देशी गोवंशाचे संवर्धन आणि सौंशोधनाच्या संकल्पनेवर काम सुरु केले होते. महात्मा गांधी यांच्या प्रत्येक आश्रमात त्याच कारणामुळे गोशाळा आपल्याला दिसतात. वर्धा  जिल्यातील सेवाग्राम आश्रमात देखील अशी गोशाळा आजहि आहे.

कंपोस्ट संकल्पना देशभरात रुजवली :- 

           जागतिक स्तरावर शेणखतापासून कंपोस्टहि संकल्पना मंडळी होती. त्यावेळी भारतात मात्र शेणाचे ढीग करून तेच शेण पुढे हंगामात थेट वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर होता  महात्मा गांधी यांनी कंपोस्ट विषयाचा अभ्यास केला शेणखताचा थेट शेतीत होणार वापर आणि त्यामुळे होणारे नुकसान, अशा बाबींची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी भारतात कंपोस्ट ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता जागतिक स्तरावरील तज्ज्ञांना बोलावत त्यांच्या मध्यमातुन भारतीय शेतकऱ्यांसाठी शेणापासून कंपोस्ट तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी जागृती केली त्यातून शेतीचा पोत सुधारण्यास मदत झाली आणि त्यातून उत्पादकताही वाढली आहे. आजहि देशात कंपोस्ट खतांचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. गोमूत्र हे कीडनाशक म्हणून देखील प्रभावी ठरले आहे. त्यामध्ये काही नैसर्गिक घटकांचा वापर करून त्यांची उपयोगिता वाढविता येते त्यावर देखील त्यांनी भर दिला होता. एकंदरीत देशी गोवंश हे महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील ग्रामविकासात त्यावेळी अग्रस्थानी होते त्याच उद्धेशाने त्यांनी सौंशोधनावर देखील भर दिला होता.

 अहिंसक चामड्याचे  उत्पादन :-

             महात्मागांधी यांनी अहिंसक चामडे हि संकल्पना मांडली.  जनावरांचा बाली घेत त्यांचे चाम्बडे सोलणे आणि त्यांचा वापर उद्यजकांकडून करणे, हे हिंसात्मक होते. त्याऐवजी नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे चाम्बडे काढून त्याचा वापर उद्द्योगात झाल्यास हि प्रक्रिया अहिंसक ठरते. अशा प्रकारच्या हिंसक चाम्बड्याच्या उत्पादनाला त्याची मान्यता होती समाजातील केवळ अस्पृश्य घटकांनी जनावरांची चाम्बडि सोलण्याचे काम करावे हि बाबही त्यांना खटकत होती त्यामुळेच वाळुंजकर त्यांच्या पुढाकाराने वर्धा भागात चर्मालय उभे झाले इतकेच नाही, तर  त्यांच्यावर संशोधन आणि संवर्धनाचे कामही त्याच ठिकाणी होत होते. या माध्यमातून सर्व जातींमधील अनेकांनी या व्यवसायात शिरकाव केला व आजही हे काम होत आहे. नजीकच्या काळात माता गाईचे व्यावसायिकरण झाले आहे. गे आणि हिंसा हे सूत्र जुळत नाही. मनुष्य आणि निसर्गातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे, असे मानले जात होते. संकरित वनांमुळे त्यांचा हा अधिक हिरावला गेला. त्या माध्यमातून पक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही कथांमध्ये गोवर्धनपर्वात उचलल्याचे दाखले आहेत हा गोवर्धनपर्वत म्हणजे गावात गाईंच्या शेणापासून तयार झालेला ढीग (पर्वत) असावा. श्री कृष्ण कथांमध्ये गाईंचा उल्लेख असल्याने देखील भारतीयांचे गाईंशी भावनात्मक नाते जुळले असावे.

यातना देऊन काढलेले दूध नको:-

         गाईंना यातना देत दुःख काढले जाते आत्ताच्या काळात तर दुधाचे उत्पादन वाढावे याकरिता रासायनिक औषधांचा अतिरेक वापर होतो. याला मात्र गांधीजी यांची मान्यता नव्हती   दूध काढण्यासाठी गाईला दिल्या जानाऱ्या यातनांमुळे ते व्यथित होत. याच कारणांमुळे त्यांनी. गाईंच्या दुधाचे सेवन करण्याचा त्याग केला दरम्यानच्या काळात त्यांना दुर्धर आजार जडला त्यावर गाईचे दूध हाच एकमेव उपाय होता मात्र त्यांनी गाईचे दूध न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कस्तुरबानी त्यांना शेळीचे दूध घ्यायला सांगितले, त्यालाही त्यांनि नकार दिला होता. केवळ दुधासाठीच देशी गोवंशाचा उपयोग न होता त्याकरिता त्यांचा छळ न करता शेतीमधील त्यांची उपयोगिता लक्षात घेतली पाहिजे यासाठी ते आग्रही होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..