http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उद्योजकांकडून वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी 

जॉब करताना किंवा शिकताना उद्योगात पडल्यानंतर आधी आपण उत्पादित किंवा विक्री करत असलेल्या वस्तूची बाजारपेठेत किती मागणी आहे याचा विचार करत असतो. त्यानंतर त्या वस्तूचा जास्तीत जास्त कसा खप वाढेल याकडे पण आपल्याला लक्ष द्यावे लागते. आपण आपला व्यवसाय वाढावा म्हणून काही स्ट्रॅटेजीचा पण वापर करणे गरजेचे झाले आहे. 

आपण अशाच काही संकल्पनांबद्दल पाहणार आहोत ज्याचा उपयोग आपण आज पाहणार आहोत. 

१. सेलिब्रेटी चेहरे 

आपण आपल्या उद्योगाची जाहिरात करताना सेलिब्रेटींची मदत घेऊ शकतो. आपले उत्पादन दर्जेदार असेल तर आपल्याला सेलिब्रेटींच्या मदतीने सेल वाढवण्यास मोठ्या प्रमाणार मदत मिळते. आपले ग्राहक सेलिब्रेटींचे चेहरे पाहून उत्पादनाकडे वळण्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर मदत मिळत असते. आपल्या ओळखीचा सेलिब्रेटी असेल तर आपले काम कमी पैशात पण होऊन जाते. त्याच्याकडून आपण कमी पैशात आपल्या उत्पादनाची जाहिरात करू शकता. 

२. ट्रेंडिंग मध्ये राहण्याच्या पद्धती 

काही कंपन्या विविध मार्गाने जाहिरात करण्याच्या विविध संधी शोधत असतात. आपले उत्पादन दर्जेदार असेल आणि एखाद्या ट्रेंडिंग गोष्टीशी समरस होत असेल तर त्याची जाहिरात होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळते. या ट्रेण्डमधून एखाद्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात होण्यास मदत मिळते. सोबतच त्या उत्पादनाची जाहिरात झाल्यास पुढच्या वेळी त्याची विक्री वाढण्यास मदत मिळते. आपले उत्पादन जर दर्जेदार असेल तर आपल्याला जास्त जाहिरात करण्याची वेळ येत नाही. 

३. प्रोडक्ट कॅम्पेनिंग करणे 

काही ठिकाणी जगावेगळे उद्योग सुरु झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. असे अयोग्य पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. आपण स्टारबक्स कॉफी मध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण आपली ऑर्डर देतो तेव्हा आपल्याला आपल्या नावाचा कप असणारी कॉफी दिली जाते. त्यामुळे समोरच्या ग्राहकाला आपलेपणा वाटतो. आपणही आपल्या उद्योगाची अशा प्रकारे जाहिरात करू शकतो. काही दिवसांपूर्वी चहाच्या शॉपवाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता. कारण त्याने आपल्या चहाच्या कपाला बिस्कीट बनवले होते आणि चहा पिल्यानंतर आपण ते खाऊ शकत होतो. 

३. डिस्काउंट 

आपण जेव्हा एखाद्या वस्तूवर डिस्काउंट जाहीर करतो तेव्हा ग्राहक आल्याकडे आकर्षित होत असतो. आपले उत्पादन हे ग्राहकाला कमी किमतीत मिळत असल्यामुळे तो वस्तूकडे आकर्षित होत असतो. आपण डिस्काउंट देताना काळजी घ्यायला हवी की वर्षातून एकदा किंवा दोनदाच तो द्यायला हवा. त्यामुळे वास्तूच्या किमतीत वर्षातील काही विषोस्थ वेळेसच डिस्काउंट मिळत असल्याचे ग्राहकाच्या ध्यानात येईल आणि तो वस्तू घेण्याकडे आकृष्ट होण्यास मदत मिळेल. 

४. जाहिराती करणे 

आपले उत्पादन नवीन असले तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून जाहिरात करणे गरजेचे झाले आहे. आपल्या उत्पादनांची ओळख होण्यासाठी जाहिराती करणे काळाची गरज बनली आहे. उत्पादनाशी भावनिक नाते जोडून जेव्हा ग्राहकाला दाखवले जाते तेव्हा त्याची खरेदी करणे गरजेचे दाखवले जाते. चितळे ब्रँडची जाहिरात आपण सर्वाना पहिली असेल. त्या जाहिरातींमधून एक आपुलकीचा कनेक्ट साधण्याची अनोखी किमया साधली होती. 

५. सिम्बॉल मार्केटिंग 

एखाद्या प्रोडक्ट्ची ओळख त्याच्या सिम्बॉलमधून करून दिली जाते. त्यामधूनच त्या प्रोडक्ट बद्दल सर्वाना ओळख होते. आपण जेव्हा एखादे उत्पादन खरेदी करायला बाजारात जातो तेव्हा आपल्याला त्याच उत्पादनाची ओळख सिम्बॉलच्या रूपात होत असते. आपण जेव्हा त्या उत्पादनाला पाहतो तेव्हा साहजिकच आपल्क्याला त्या सिम्बॉल मधून त्याची माहिती मिळते. 

६. यशस्वी कथा सांगणे 

जी लोक यशस्वी असतात त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचं कल वेगळाच असतो. जेव्हा एखादा सेलिब्रेटी त्याच्या उत्पादनांची जाहिरात करतो तेव्हा समोरच्याचा पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून जातो. हल्लीच्या काळी रोनाल्डो, विराट कोहली ते अनुष्का शर्मा यांनी सर्वानी स्वतःचे ब्रँड चालू केले आहेत. त्यामुळे आपण आपली यशस्वी कथा जोश टॉक्स, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करून स्वतःचा उद्योग वाढवू शकतो आणि ब्रँड पण उभा करू शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..