http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

                    भारतीय संस्कृती विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. उच्च आदर्शाचे पूजन, उत्तमांचा आदर, सहकार्याविषयी प्रेम, समाजासाठी समर्पण, कृतज्ञता हि श्रेष्ठ जीवनमूल्ये प्राचीन काळापासून जातं केली आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये परोपकारार्थ समर्पिताना, आदराने मातेचे स्थान देऊन गुरवान्वीत करण्यात आले आहेत. नद्यांना लोकमाता, दिव्य औषधांनी वनस्पतीमाता, भूमी हि भूमाता व गाईंना गोमाता म्हणून संबोधले जाते.

  भारताच्या अनादी काळापासून चालत आलेल्या महान संस्कृती मध्ये प्रभू श्रीरामचंद्र, भचालत आलेल्यागवान परशुराम, सर्वच ऋषीमुनी, तसेच समस्थ भक्तांच्या भावगीतांचे सम्राट भगवान श्री कृष्ण यांचे गोमातेवरील प्रेम प्रचलित आहे. सर्व प्रकारच्या धानांमध्ये पशुधन श्रेष्ठ मानले आहे. त्यातील गोधनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

भारतीय गोवंशाचे महत्व :-

      योगशास्रानुसार भारतीय गोवंशात आढळणारे वशिंड म्हणजे पाठीवरील उंचवठा हे सूर्यकेतू व चंद्रकेतु नडीचे संगमस्थान आहे. वेदांमध्ये सूर्यनारायणाच्या किरणांना गौ असेही म्हणतात. सूर्यकिरणात ज्योती, आयु व गौ असेही या तीन प्रकृती आहेत. याचमुळे वनस्पती व जीवजागताला पुरेशी ऊर्जा मिळत राहते. भारतीय गोवंशाच्या वशिंडातील सूर्यकेतू नाडीच्या अस्तित्वाने गोप्रकृतेचे किरण शोषले जातात व त्या ऊर्जेचा प्रभाव गोमय, गोमूत्र, गोदुग्ध या मूळ गव्यांवर पडतो.

अशी गव्ये उर्जावान, तेज प्रदान करणारी व बलवर्धक आहेत. भारतीय गोवंशापासून प्राप्त होणारी गव्ये ( गोमय म्हणजे शेण, गोमूत्र, आणि दूध ) म्हणजे मानवी शरीरात उध्दभवणाऱ्या अनेक प्रकारच्या रोगांवर उत्तम विकल्प आहे. गोमयामध्ये उपयुक्त २२ गुणतत्वे, गोमूत्रात शरीर संतुलनासाठी उपयुक्त २४ गुंतावे आणि दुधामध्ये १८ पोषणमूल्ये आहेत, असा महत्वपूर्ण उल्लेख प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. मुळातच अत्यंत औषधी वनस्पतींशी संयोग पावल्या नंतर व्याधींवर अधिक परिणामकारकरित्या कार्य करतात.

पंचगव्याचे परिणाम :-

              मानवीशरीर  पंचमहाभूतांची बनलेले आहे, शरीरातील या पंचतत्वांच्या असंतुलनाने अनेक रोग उध्दभवतात. भारतीय गोवंशापासून मिळणाऱ्या गव्य आणि उपगव्य यांच्या निनियमित सेवनाने शरीरातील पंचतत्वांचे संतुलन दिर्गकाळ राखता येते. सध्याच्या गतिमान,तणावपूर्ण आणि वैफल्यग्रस्त अशा सर्व परिथितीवर सखोल व गांभीर्याने विचार करून शास्त्रोक्त पद्धतीने पंचगव्य चिकित्सापद्धतीचा उपयोग मानवी स्वास्थ्य दोष निवारण व आरोग्यवर्धनासाठी करण्यात येतो. 

             पंचगव्य चिकित्सा पद्धतीत सर्वच औषधी अत्यंत प्राकृतिक पद्धतीने सिद्ध केलेली असल्याकारणाने त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. स्वास्थ्य संतुलनासाठी पंचगव्य सेवन व चिकित्सा हा अत्यंत प्रभावी व सुलभ उपाय आहे. पंचगव्य चिकित्सेने अनेक दुर्धर रोग समूळ बरे होऊ शकतात. त्याच बरोबर केवळ आजारांवरच नव्हे, तर आजार होऊच नयेत, मानवी स्वास्थ्य कायमस्वरूपी निरामय राहावे यासाठीही पंचगव्य सेवन आणि पंचगव्य चिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे.

    नमो गोभ्य : श्रीमतिभ्य एवं च ।

    नमो ब्रहयसुताभ्यश्चभ्य: पवित्राभ्यो नमो नाम: ।

    सर्व कंदूधे देवी सर्वतीर्थ भिशेचिनी ।

    पवनी सुरभीश्रेठे देवीतुभ्य नमो नमः ।।

रोग निवारणासाठी भारतीय वंशाच्या गाईंचे दूध, दही, ताक, लोणी, शुद्ध तूप, गोमूत्र व गोमय ( शेण ) यांचा वापर औषधी स्वरूपात करून मनुष्याचे स्वस्थरक्षण  करता येते. रोगांचा उध्दभव म्हणजे पंचमहाभूतांपासून ( पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ) तयार झालेल्या भौतिक शरीरातील वात-वायू, पित्त- अग्नी, कफ-जल,

यांच्यात असंतुलन होणे. यापैकी कोणतेही एक तत्व प्रथम दूषित होते, मग कुपीत होते व कालांतराने विकृत होते. याचेच पर्यवसान मनुष्यशरीरात वातजन्य, कफजन्य आजारणामध्ये होते. 

रोग निदान :-

      सद्य: स्तिथीत  रोगनिदान न करता वेगवेगळ्या  यंत्रांद्वारे तपासण्या करून आजार काय, त्यांची स्थिती काय यावर विचारविमर्श होतो व त्याचे निवारण करण्यासाठी शस्त्रक्रिया, लेझरकिरण किंवा विविध प्रकारची इंजेक्शन्स, औषधे यांच्या माध्यमातून अलोपॅथी मॉर्डन आयुर्वेद, होमियोपॅथी इ. सारख्या पद्धतीचा वापर प्रथमतः केला जातो ; परंतु रोगाच्या कारणाचा शोध मुलापरेंत घेतला जात नाही. परिणामतः काही वर्षातच त्याच रोगाचा उध्दभव पुन्हा होऊ शकतो किंवा त्यांचे विविध दुष्परिणाम मनुष्यशरीरावर दिसू लागतात. यासाठी भारतीय पौराणिक चिकित्सा म्हणजे काय हे हे समजणे आवश्यक आहे. 

चिकित्सा पद्धती :-

          सर्वप्रथम शास्त्राच्या आधारे नाभी, नाडी, जीव्हा,त्वचा, चेहरा, ध्वनी, परीक्षण इ. द्वारे अचूक रोग निदान करून, स्थाननिश्चिती व रोगस्तीथी समजून घेऊन, मानवी शरीरात उद्भवणाऱ्या रोगांवर औषधी द्रव्याची रचना करून, समूळ रोगनिवारण करणे आणि मनुष्याला स्वस्थ प्रदान करणे यालाच चिकित्सा म्हणतात. भारतीय पौराणिक चिकित्सा विज्ञान पद्धतीचा हाच शुद्ध हेतू आहे.

                त्यानंतर आहार, पथ्य,औषधांच्या वेळा, बाळ व रोग स्तिथी पाहून औषधांच्या मात्रा ठरवल्या जातात. यात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी किंवा रोग तीव्रता कमी करणारी द्रव्य औषधांची योजना केली जाते. रोग्यांचे मनोबल उच्च व संतुलित राखण्यासाठी विवेकपूर्ण संवाद, व्यायाम व यौगिक क्रिया यांचाही उपयोग उत्साहाने केला जातो, यालाच रोग्यांची संपूर्ण चिकित्सा असे म्हणतात.

                वैदिक शास्त्रानुसार सिद्ध झालेले नियम, सूत्रे, सिद्धांत मानवाच्या आरोग्य संरक्षणासाठी व संस्थसंवर्धनासाठी आहेत. या सर्वांचे मूळ भारतीय आयुर्वेदशास्त्र हेच आहे. महर्षी चरक यांनी या शास्त्राला ग्रंथबंध केले.

                गोमय, गोमुत्राधारित जैविक खतांवर पोषण झालेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला, इ. शरीराच्या पृथ्वीतत्वाचे संवर्ध करते. गोदुग्धाचे नियमित सेवनाने शरीरातील जलतत्वांचे संतुलन राखले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने गाईंच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध तूप शरीरातील जलतत्वांचे संतुलन राखले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने गाईच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध तूप शरीरातील अग्नितत्त्वांचे नियमन करते. ब्राह्ममुहूर्तावर वरच्यावर धरलेले गोमूत्र सेवन केले असता शरीरातील वायूमंडल सुविहित होत असते. मंथनप्रक्रियेतून निघालेले लोणी, अग्नी, व जलाचे संतुलन करते, त्या खाली राहिलेले रसायन शरीरातील अनेक रोगांवर गुणकारी औषध आहे. आकाश या सूक्ष्म तत्वांचे संचालन या रसायनाद्वारे होते. यालाच दही, ताक, लस्सी, छाछ व मोरे असे विविध प्रदेशात संबोधले जाते.

अमृत क्षीर भोजनम् ।

      शरीर बालवर्धनासाठी भारतीय गोवंशापासून मिळणारे दूध- सर्व औषधी सार असे संबोधले आहे. आजीवन सात्म्य म्हणजे जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून ते वृद्ध व्यक्तींपरेंत सर्वाना सहज पचणारे, शरीरातील १८ पोषणमूल्यांची पूर्तता करणारे एकाच प्राकृतिक औषध । भ्रम, मद, दारिद्रय, शुष्कता, भूक, जीर्णज्वर व रक्तपित्तांच्या रोगावर औषध म्हणून कार्य करते.

तक्र शक्रस्य दुर्लभ ।

      भारतीय गोवंशाच्या गाईंच्या दुधापासून तयार केलेले ताक पचनास हलके जठराग्निद्दीपक, वातनाशक व मूत्रपिंड व मुत्राशयाशी निगडित आजारांवर अत्यंत प्रभावशाली.

घृत प्राश्य विषुवृत्ती ।

      भारतीय गोवंशाच्या गाईंच्या दुधापासून तयार केलेले तूप ग्रहणशक्ती, बुद्धी व सृतीवर्धक, विष व ज्वरनाशक, विविध औषधांच्या संयोगाने अनेक कार्य करणारे एकमेव औषध.

गोमूत्र धन्वंतरी ।

      गोमूत्र रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्त शुद्ध करते, अतिरिक्त मेद घटविते. अँटी बॅक्टीरिअल, अँटी फंगल व अँटी ऑक्सिडंट असते.

पंचगव्य महारसायन ।

      गोमय रस, गोमूत्र, गोमुग्ध, ताक, व घृत यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणांनी तयार होणाऱ्या औषधास पंचगव्य महारसायन म्हणतात.

      देशविदेशातील विविध स्तरावरील व्यक्तींनी पंचगव्य चिकित्सेचा विलक्षण अनुभव घेतला आहे. दुर्धर वेदनादायी, कायमचे पंगुत्व निर्माण करणाऱ्या, असाध्य वाटणाऱ्या व्याधीतून पूर्ण बरे होऊन रोगाचे समूळ निवारणही होऊन आता ते सर्व आरोग्यपूर्ण, आनंदी जीवन जगत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..