http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

पशुधनाच्या आरोग्याचा लेखाजोखा माहिती असणे पशुपालकांची अत्यंत गरजेचे असते. हि माहिती पशुपालकांकडे नसल्यास त्यांचा उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. पशुपालकांची हि गरज ध्यानात देऊन पद्धतीची सेवादेण्याचे काम ब्रेनवायर्ड हे स्टार्टअप करते. ब्रेनवायर्ड स्टार्टअपची ओळख करून देणारा लेख

        विस्टॉक या ब्रँडच्या माध्यमातून ब्रेनवायर्ड शेतकऱ्यांच्या पशुधनाचे टॅगिंग केले जाते. या टँगच्या माध्यमातून दुधाळ जनावरांच्या आरोग्यसंबंधी माहिती गोळा करण्यात येते. तसेच जनावरांच्या आजारांचे मूल्यमापन हि केले जाते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची सद्य;स्थिती जाणून घेणे सोपे होते. जनावरांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये होणारे बदल, कृत्रिम रेतनासाठी योग्य वेळ यादी माहितीसंबंधीत पशुपालनाकडे असलेल्या अँपवर पाठविली जाते. त्यामुळे विविध आजारांमुळे होणारे जनावरांचे मृत्यू रोखता येऊ शकतात. पशुधानाच्या आरोग्याशी संबंधित डेटा ( माहिती ) नवे तंत्रज्ञान एकत्र केला जातो. जनावरांच्या कानावर डिजिटल टॅग बनविला जातो. या टॅग च्या माध्यमातून संबंधित जनावरांची सर्व प्रकारची माहिती संग्रहित केली जाते., जी पशुपालकांना अँपवर उपलब्ध करून देण्यात येते.

          दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी निगडित सर्व प्रकारचा डेटा उपलब्ध होत असल्याने संबंधित जनावरांला कुठल्या प्रकारचा चार घ्यायला हवा, त्याच्या आरोग्याच्या समस्या समजल्याने त्यावर उपचार करता येतो. जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. यामुळे दूध उत्पादन वाढविण्यासाठीच्या उपाययोजना करणे त्या पशुपालकाला शक्य होते. त्यामुळे दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढविणे शक्य होते.

ब्रेनवायर्ड अँपची वैशिष्ठये :-

१) आरोग्यविषयक :-

दुधाळ जनावरांच्या आरोग्याचे जन्मापासूनच रेकॉर्ड

लसीकरणाची माहिती

झालेल्या आजारांची माहिती

२) कृत्रिम रेतन :-

जनावर कधी आणि कितीवेळा गाभण राहिले ?

कृत्रिम रेतन करण्याची योग्य वेळ

३) जनावरांच्या सर्व हालचालींची माहिती ( लाइव्ह ट्रॅकिंग )

४) दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन आणि अन्न पचविण्याची कालावधी

५) जनावरांचे तापमान, आजारांमुळे आलेला लुळेपणा

६) पशुवैद्यकीय तज्ज्ञाची माहिती

७) कॉल सेंटरद्वारे ऑनलाईन सल्ला सेवा

दोन तरुणाचे स्टार्टअप :-

          अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत पशुधनाच्या आरोग्याची माहिती शेतकऱ्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी ब्रेनवायर्ड या स्टार्टअपची दोघा तरुणांनी निर्मिती केली. केरळ मढी रोमियो जेरार्ड आणि श्री शंकर हे ब्रेनवायर्ड संस्थापक. त्यांनी घरातील व्यवसायाला मदत म्हणून २०१८ मध्ये ब्रेनवायर्ड ची सुरुवात केली. या दोघांचीही कुटुंबे डेअरी क्षेत्राशी निगडित असल्यामुळे या व्यवसायातील अडचणी असल्यामुळे या व्यवसायातील अडचणी दोघांनीही जवळून पहिल्या होत्या. त्या अडचणींवर उपायशोधण्याच्या प्रयत्नातून ब्रेनवायर्ड स्टार्टअपचा जन्म झाला. पुढे या त्याचे रूपांतर कंपनीत झाले.

महाराष्ट्र सरकारकडून गौरव :-

           महाराष्ट्र सरकारकडून २०२० मध्ये उत्कृष्ठ स्टार्टअप चा पुरस्कार ब्रेनवायर्डला मिळालेला आहे. महाराष्ट्रात काम करण्यासाठी १५ लाखाचे कंत्राटही या स्टार्टअपला राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून मार्च महिन्यात ब्रेनवायर्डचा गौरव करण्यात आला. ब्रेंवायर्डची स्थापना झाली त्याच वर्षी ( २०१८ ) या स्टार्टअपने असोचॅपतर्फ़े आयोजित नव्या स्टार्टअपसाठीच्या स्पर्धेत बाजी  मारली होती.

गुंतवणुकीचा ओघ वाढला :-

              ब्रेनवायर्डची स्थापना झाल्या पासून सुरुवातीच्या काळात केरळ स्टार्टअप मिशनने या स्टार्टअप ला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मागील वर्षी गुरुग्राममधील हाडल या इक्यूबेटरने ‘ ब्रेनवायर्ड ” मध्ये गुंतवनुक केली. जुलै २०२० मध्ये मुंबई एन्जल इन्व्हेस्टर आणि इंडिया आक्सिलरेटरने ” ब्रेनवायर्ड ” मध्ये गुंतवणूक केली. अवघ्या तीन वर्षात कंपनीने मोठ्या, प्रसिद्ध गुंतवणूकदाराचे लक्ष वेधून घेतले.

ब्रेनवायर्डची व्याप्ती :-

         मागील वर्षीच्या जून महिन्यापर्यत ‘ ब्रेनवायर्डचे ” कामकाज तीन संगणक अभियंते सांभाळत होते. त्यानंतर त्यात आणखी दहा अभियंत्यांची भर पडली. त्याच्या माहिती नुसार ब्रेनवायर्डने आतापर्यत दोन हजार जनावरांचे टॅगिंग केले आहे. हि कंपनी केरळ मधील चार शहरात काम करते. यंदा महाराष्ट्र, गुजरात, आणि राज्यस्थान अय तीन राज्यात प्रवेश करण्याचा ब्रेनवायर्डचा मानस आहे. त्याचबरोबर विविध राज्य सरकारांबरोबर हातमिळवणी करण्याचाही ब्रेनवायर्डचा प्रयत्न सुरु आहे. बंगळूरमधील स्टेलॅप्स हे स्टार्टअप ब्रेनवायर्डचे मुख्य स्पर्धक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..