http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

         ब्राझीलची झेबू कॅटल ब्रीडर असोसिएशन हि संघटना गीर,  ओंगल,  लाल, सिंधी आणि कांकरेज या भारतीय गोवंशाच्या संशोधनामध्ये चांगले काम करत आहे. ब्राझीलमधील गीर गाईचे प्रतिदिन जास्तीत जास्त दूध उत्पादन ३० ते ४० लिटर आहे.

भारतीय दुधाळ गोवंशापैकी गीर हि प्रसिद्ध जात आहे.  भारतातील पशुपालकांकडून गीर जातील मागणी आहे. त्याच बरोबरीने ब्राझीलमधील पशु पालकांनीदेखील गीर गोवंशाला पसंती दिली आहे. साधारणपणे १९३३ मध्ये पोर्तुगीजांनी गुजरात राज्यातील भावनगर आणि सुरत भागामधून गीर गाई पहिल्यांदा ब्राझीलमध्ये नेल्या. कालांतराने ब्राझीलमधील कमी दूध देणाऱ्या गाईंची जागा आता गीर गाईंनी घेतली आहे.

ब्राझिलियन गीरच्या यशाचे गमक :-

             सध्या ब्राझील मध्ये सुमारे ४० लाख गीर गाई आहेत. येथील गीर गाईंचे प्रतितिदिन जातीत जास्त दूध उत्पादन ३० ते ४० लिटर आहे. काही उच्च वंशावळीच्या गाई प्रतिदिन दूध उत्पादन ६० लिटर पर्यंत देतात. चांगल्या दूध देणाऱ्या गाईंच्या पैदाशीसाठी दूध उत्पादनाच्या नोंदी, उच्च प्रतीचा वळू आणि गाईंची निर्मिती याच बरोबरीने संवर्धनासाठी एकत्रित उपाययोजना याबाबत ब्राझीलमधील पशूतज्ञ् आणि पशुपालकांनी अतिशय दिशा दर्शक काम केले आहे.

            ‘ब्राझिलियन झेबू कॅटल ब्रीडल असोशिएशन’ ही संघटना गीर, ओंगोल, लाल सिंधी आणि कांक्रेज या भारतीय गोवंशाच्या संशोधनामध्ये चांगले काम करत आहे. अगदी सुरुवातीपासून भारतातून आणलेल्या गाई आणि वळुंची नोंद, त्यांच्या उत्पादनाच्या शास्त्रीय नोंदी या ठिकाणी पाहावयास मिळतात. ब्राझील मध्ये फाझू हे सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. या ठिकाणी फक्त झेबू किंवा भारतीय गोवंशाबाबत संशोधन केले जाते. या महाविद्यालयाती तज्ज्ञ् गाईंना लागणार चारा, खुराक, गोठा, रोगनिदान, दूध उत्पादन, आणि जातिवंत पैदास या विषयावर सातत्यपूर्ण संशोधन करीत आहेत.

जातिवंत पैदाशीवर भर :-

            ब्राझिलियन झेबू कॅटल ब्रीडर सोसिएशन या भारतीय गोवंशासंबंधी  संशोधन करणाऱ्या संस्थेचे २१००० सदस्य आहेत. दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात उबेरबा या ठिकाणी होणाऱ्या देशपातळीवरील दूध उत्पादन स्पर्धेमध्ये सर्व सदस्य त्यांच्याकडील जास्त दूध देणाऱ्या गाई घेऊन येतात. त्याच बरोबरीने या ठिकाणी जातिवंत वळूसाठी देखील स्पर्धा भारवली जाते. या स्पर्धेमध्ये उच्च प्रतीच्या गाई आणि वळुंचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांना आकर्षक बक्षीस दिली जाते.

            रेतमाता आणि भ्रूण तयार करणाऱ्या कंपन्या स्पर्धेत निवड झाल्याचे गाईंचे भ्रूण आणि वळुंचे वीर्य  पशुपालकांकडून  कंत्राटी पद्धतीने विकत घेतात. यातून चांगल्या उत्पादन उत्पादनक्षम गाई, आणि वाळूचे निर्मिती केली जाते. निवडक जनावरांची अनुवांशिक चाचणी करून उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा तसेच गाईंचे भ्रूण देशभरातील गीर गाईंच्या गोठ्यात वापरले जाते.

“गिरोलान्डो” संकरि त जात.

         ब्राझीलमधील पशूतज्ज्ञांनी काही प्रमाणात गीर गोवंशाचा होल्स्टिन फ्रिजियन गोवंशाबरोबर संकर करून “गिरोलान्डो” हि नवीन संकरित जात विकसित केली. सध्या दूध उत्पादनासाठी या जातीला देखील वाढती मागणी आहे. या गाई प्रतिदिन ६० लिटर दूध देतात.

पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्र :-

          बारामती मधील ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ” पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्र ” हा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पामध्ये उच्च गुणवत्तेच्या गीर, आणि साहिवाल गाई आणि तसेच मुऱ्हा, पंढरपुरी म्हशीबाबत विशेष संशोधन केले जाते. या प्रकल्पा मध्ये भ्रूण प्रत्यारोपण आणि उच्च गुणवतेच्या ब्राझिलियन गीर आणि भारतीय गीर गाईंमधील भ्रूणापासुन जातिवंत वारसांची निर्मिती सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..