http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

   कर्नाल ( हरियाणा ) राष्ट्रीय पशु अनुवांशिक संशोधन संस्थेमध्ये देशातील ५० गोवंशाची अधिकृत नोंद झाली आहे. यातील काही गोवंश दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. काही गोवंश हे दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. काही गोवंश हे दूध उत्पादन तसेच शेतीकाम तर काही गोवंश हे केवळ ओढकामासाठी प्रसिद्ध आहेत. अश्या ह्या नोंदणीकृत महत्वाच्या गोवंशाची तोंडओळख…

गीर :-

 उगमस्थान :- गुजरात

उपलब्धता :- गुजरात मधील गीर विभाग

वशीष्ठे :- दुधाळ गोवंश, दुधातील स्निग्धांश ४ ते ६.५ पर्यत, बिलांची उन्हामध्ये काम करण्याची क्षमता उत्तम, रंग पूर्णपणे लाल, काळसर तांबडा, तांबड्यावर पांढरे ठिपके, मस्तक रुंद, शिंगे पूर्णतः काळी, कां पूर्णपणे लांबट व नाकपुडीपर्यत येणारे, नाकपुडी लहान व काळी, भव्य वशिंड, मोठी कास, दुधाची शीर मोठी व नागमोडी.

साहिवाल :-

उगमस्थान :- माउंटगोमेरी ( सध्या पाकिस्थान )

उपलबध्दता :- पंजाब, हरियाणा

वैशिष्ठे :- दुधाळ गोवंश, दूध देण्यास सातत्य, दुधातील स्निग्धांश ३.३ ते ३.५ पेर्यत. रंग फिका लाल / तांबूस पिवळा, कपाळमाथा लांबट व अरुंद, शिंगे लहान काळसर, डोळे लहान, काम लांबट चपटे, वशिंड माध्यम आकाराचे, कास गोलाकार आटोपशीर व सडलालसर, कातडी सैल, लोमभती नाभी, मान थोडी आखूड

थारपारकर

उगमस्थान :-दक्षिण सिंध थारपारकर जिल्हा ( सध्या पाकिस्थान)

उपलबध्दता :-राजस्थान, गुजरात

वैशिष्ठे :- प्रतिकूल परिस्थिती मध्ये उत्तम दूध देणारा गोवंश. दुधातील स्निग्धांश ३.५ ते ५.५ पर्यंत. बैल शेती कामासाठी उपयुक्त. रंग पंधरा ते संपूर्ण करडा, मस्तक लांब व रुंद, शिंगे अतिशय लहान व गोलाकार, डोळे पूर्णतः काळे, कान लांब व अरुंद. वशिंड माध्यम परंतु भरगच्च. भरीव कास, चारही सड लांबट व गुलाबी, दुधाची शीर ठसठशीत.

राठी

उगमस्थान :- राजस्थान

उपलबध्दता :- राजस्थान, बिकानेर, गंगानगर, हनुमानघर, जैसलमेर, व पंजाबची सीमा.

वैशिष्ठे :- अत्यंत दुधाळ गोवंश, दुधामधील सातत्य व सलगता, दुधातील स्निग्धांश ३ ते ५ पर्यत. रंग संपूर्ण पाने फिका तांबूस, काळा किंवा पंधरा, शिंगे अत्यंत लहान व काली. वशिंड लहान व काळसर छटा. कास मोठी व दुधाची शीर मोठी व नागमोडी. चारही सड सामान उंचीचे असतात.

अमृत महल

उगमस्थान :- म्हैसूर नजीकचा प्रांत

उपलबध्दता :- कर्नाटक राज्य

वैशिष्ठे :- बैल अत्यंत काटक, चपळ व ओढकामात उत्तम, गाय प्रतिदिन सरासरी चार लिटर दूध देते. रंग संपूर्ण पंधरा, मस्तक लांब व अरुंद, शिंगे कोचर व शेवटाला जुळणारी, डोळे लहान व काळभोर, वशिंड आकर्षक व भरदार. गाईची कास लहान.

ओंगोल

उगमस्थान :- आंध्र प्रदेश

उपलबध्दता :- आंध्र प्रदेशातील गोदावरी, कृष्णा, पेन्नार नद्यांचे खोरे.

वैशिष्ठे :- बैल भट शेती व ओढकामासाठी प्रसिद्ध. गाय प्रतिदिन सहा ते सात लिटर दूध देते. दुधातील स्निग्धांश ३ ते ५ पर्यंत. गाईंमध्ये रंग पंधरा, बैलांमध्ये मस्तक व शिंगांजवळ रंग गडद करडा.  शिंगे लहान व मागून पुढे येणारी. कास मोठी व झोळीदार व दुधाची शीर स्पष्ठ व नागमोडी असते.

वेचून

उगमस्थान :- केरळ राज्यातील वेचून जिल्हा

उपलबध्दता :- केरळ राज्यातील कोट्टीयंम एर्नाकुलम, अलापुजा परिसर.

वैशिष्ठे :- गोवंशाचे दूध औषधमूल्याच्यास दृष्टीने अत्यंत उपयुक्त. दुधामधील स्निग्धांश ४.५ ते ६ पर्यंत. बैल लहान व दनकट. गायी उंचीला कमी व लांबट. चेहरा अरुंद असतो. शिंगे लहान व खालच्या बाजूस झुकलेली. कास लहान, दुधाची शीर सरळ व स्पष्ठ असते. चारही सड लहान आणि अगदी जवळ असतात.

पंगनूर

उगमस्थान :- आंध्र प्रदेश.

उपलबध्दता :- आंध्र प्रदेशामधील चितौर विभाग.

वैशिष्ठे :- दुधामध्ये औषधिमुल्य, स्निग्धांशाचे प्रमाण ६ ते ८ पर्यंत. लहान शरीर बाधा असूनदेखील गाय तीन ते पाच लिटरपर्यंत दूध देते. कमी आहारामध्ये जास्त दूध देण्याची क्षमता. विषम हवामान व कोरड्या वैरणीवर तग धरणारा गोवंश. उंचीला लहान व लांबट आकाराचा गोवंश रंग पूर्णपणे पंधरा, बैलांमध्ये वशिंड व मानेभोवती गडद काळसर छटा, कां लहान व लांबट, शिंगे सरळ किंवा कोचर, कास लहान, चारही सड गुलाबी.

कांक्रेज

उगमस्थान :- कच्छजवळील बानस व सरस्वती नदी खोरे.

उपलबध्दता :- राजस्थान, गुजरात

वैशिष्ठे :- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्यरत असणारा गोवंश. गाय निकृष्ठ आहारावर सहा ते सात लिटर दूध देते. दुधातील स्निग्धांश३.५ ते ६ पर्यत. दूध देण्यात सलगता. रंग संपूर्णपणे करडा, मस्तक रुंद, शिंगे मोठी व डौलदार, डोळे लहानसर व काळे, कान माध्यम आकाराचे, भव्य वशिंड, कास मोठी व चारही सड सामान उंचीचे.

निमारी

उगमस्थान :- मध्य प्रदेश

उपलबध्दता :- मध्य प्रदेशातील बारवांनी, खारेगाव, खांडवा, हिरडा आणि सातपुडा पर्वताच्या रंगामधील प्रदेश.

वैशिष्ठे :- हा गोवंश गीर व खिल्लार संकरातून जन्माला आलेला असल्याने गिरमधील दुग्धोपादन क्षमता आणि खिल्लारमधील चपळाई व ओढण्याची ताकद असलेला गोवंश दुधामधील सातत्य उत्तम रंग तांबडा भडक; पंरतु अंगावर पांढरे लहान व मोठे आकर्षक ठिपके. शिंगे पूर्णपणे मागे वाळलेली व गुलाबी रंगाची. वशिंड माध्यम आकाराचे कास  माध्यम आकार, चारही सड गुलाबी व लांबट.

खिलार

उगमस्थान :- महाराष्ट्र राज्याचा पश्चिम भाग.

उपलबध्दता :- पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा, कर्नाटक राज्य

वैशिष्ठे :- प्रचंड ताकद आणि वेगवान गोवंश. पूर्ण पाने पंधरा; क्वचित किंचित कोसा, मस्तक लांब आणि अरुंद, शिंगे सरळ, कोचर व टोकाशी निमुळती व टोकदार, डोळे काळे, कान लहान व आखूड, वशिंड उत्तम, खूर काळे किंवा गुलाबी, गाईची कास लहान, कमी दूध उत्पादन.

देवणी

उगमस्थान :- मराठवाडा

उपलबध्दता :- उदगीर, चाकूर, हरंगुळ, देवणी इत्यादी;

वैशिष्ठे :- हृस्थरीय स्तरावर नामांकन प्राप्त करणारा गोवंश उष्ण हवामान, संपूर्ण कोरड्या आहारावर उत्तम काम करणारा गोवंश. गाय सरासरी सहा ते आठ लिटर पर्यत दूध देते. संपूर्ण पंधरा परंतु अंगावर काळे ठिपके. मस्तक रुंद, शिंगे उगमापासून गोलाकार मागून पुढे येणारी, वशिंड मोठे व घट्ट. कास गोलाकार व चारही सड काळे.

डांगी

उगमस्थान :- उत्तर महाराष्ट्र

उपलबध्दता :- नाशिक, ठाणे, नगर जिल्हा

वैशिष्ठे :- पावसामध्ये शेती कामासाठी उपयुक्त. गाय प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देते. संपूर्ण पांढऱ्या रंगावर काळे लहानसर गोल ठिपके. रुंद मस्तक, शिंगे लहान व गोलाकार, डोळे काळे व पाणीदार, वशिंड आकर्षक, कास गोलाकार पांढऱ्या रंगाची व चारही सड काळे.

हरियानी

उगमस्थान :- हरियाणा

उपलबध्दता :-  हरियाणातील कर्नाल, हिस्सार, गुरगाव, रोहतक आणि जिद

वैशिष्ठे :- अत्यंत दुधाळ गोवंश. दुधामधील स्निग्धांश ३.५ ते ५ पर्यत. बैल शेती व ओढकामासाठी उपयुक्त. रंग पूर्णतः पंधरा ते किंचित करडा, चेहरा लांब व अरुंद, शिंगे आडवी वाढतात. वशिंड भक्कम व मोठे कास मोठी, चारही सड सामान उंचीचे व सामान अंतरावर, दुधाच्या शिरा मोठ्या व ठसठशीत.

माळवी

उगमस्थान :- मध्य प्रदेश, राजस्थान

उपलबध्दता :- राजपुताना, माळवा, इंदौर,उज्जैन, हाजापूर, मांडसूर,रतलाम,

वैशिष्ठे :- बैल शेती कामासाठी प्रसिद्ध. गाय प्रतिदिन चार ते सहा लिटर दूध देते. दुधातील स्निग्धांश ३.५ ते ४.५ टक्के. रंग पूर्ण पाने पंधरा. चेहरा लांब व रुंद, शिंग लहान पण सरळ किंवा चोकर, डोळे काळे, कान लहान व अरुंद वशिंड लहान. कातडी मऊ व चमकदार, कास लहानसर आटोपशीर.

हल्लीकर

उगमस्थान :- कर्नाटक

उपलबध्दता :- दक्षिण कर्नाटकमधील तुमकर, हसन, मंड्या, तसेच कर्नाटकलगतचा आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा काही भाग.

वैशिष्ठे :- बैल अत्यंत काटकव चपळ, ओढकाम व जलद वाहतुकीसाठी उपयोगी. रंग फिका करडा ते गडद करडा, मस्तक लाबंत व अरुंद, वशिंड मध्यम आकाराचे, कातडी पातळ आणि  घट्ट,बहुतेक गायी मेनकासेच्या असतात.

कंगायम

उगमस्थान :- तामिनाडूतील इरोड व कोईमतूर प्रभाग.

उपलबध्दता :- तामिळनाडू राज्यामध्ये कंगायम, इरोड, कारूर, नामक्कल, दिंडीगुल आणि कोईमतूरलागतचा प्रदेश. 

वैशिष्ठे :- बैल ताकतवान व चपळ, शेतीकामामध्ये उत्तम. गाय प्रतिदिन तीन ते पाच लिटर दूध देते. प्रथम वेताचे वय ते महिने. दोन वेतामधील अंतर ते महिने असते. रंग संपूर्ण पंधरा ते करडा यांमधील विविध छटा, बैलांमध्ये वशिंडाजवळ गडद छटा असते. शिंगे उभी किंवा गोलाकार कोचर. वशिंड माध्यम आकाराचे व डौलदार. कास लहान असते. दुधाची शीर सरळ व बहुधा अस्पष्ट असते.

उंबलचेरी

उगमस्थान :- तामिळनाडू राज्यातील तंजावूर व नागापट्टम

उपलबध्दता :- तामिळनाडू राज्यातील नागापट्टम, तंजावूर व तिरुवावरु या प्रभाग.

वैशिष्ठे :- बैल भातशेतीसाठी उपयुक्त. मोठ्या पावसामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. गाय प्रतिदिन तीन ते चार लिटर दूध देते. रंग प्रामुख्याने कराड ते काळा. कपालांवर विविध आकारात पंधरा आकर्षक ठिपका. शिंगे मुळापासून सरळ व बाजुला गेलेली डोळे काळे, नाकपुडी काळी, वशिंड लहान, कास लहान व आटोपशीर.

बारगुर

उगमस्थान :- तामिळनाडू राज्यातील पर्वतरांगा.

उपलबध्दता :-  तामिळनाडूतील बारगुर पर्वत रांगा, इरोड.

वैशिष्ठे :- भातशेतीसाठी उत्तम गोवंशाचे पाय लहान, पण काटक असल्यामुळे ते डोंगरात अडचणीच्या जागी देखील जाऊन चारतात. गाय प्रतिदिन तीन ते चार लिटर दूध देते. रंग लालभडक व त्यावर पांढरे ठिपके किंवा पांढऱ्या रंगावर लालसर ठिपके, नाकपुडी गुलाबी, कां लहान व अरुंद. शिंगे मुळापासून सरळ व बाहेर गेलेली आणि टोकाशी निमुळती. शिंगांचा रंग गुलाबी, काळा. कास लहान व चारही सड लाल रंगांचे व सलग असतात. वशिंड लहान.

लाल सिंधी

उगमस्थान :-कराची, हैद्राबाद ( सध्या पाकिस्तान )

उपलबध्दता :- पंजाब राज्यात उत्तर भाग, हरियाणा राज्यात उत्तर व पुर्वेकडील भाग.

वैशिष्ठे :- जगभर प्रसिद्ध जात. अत्यंत उष्ण हवामानामध्ये तग धरण्याची क्षमता. सरासरी दुग्धउत्पादन ८ ते १० लिटर दुधातील स्निग्धांश ४ ते ५ पर्यत रंग प्रामुख्याने तांबडा तांबडा ठिपका क्वचित आढळतो. शिंगे दंडगोलाकार प्रामुख्याने मागे जाणारी, मस्तक रुंद, मानेखालची पोळी ( लोळी ) मोठी, वशिंड डौलदार व गडद छटा. चारही सड सामान उंचीचे व योग्य अंतरावर असतात.

केरिघर

उगमस्थान :- उत्तरप्रदेश

उपलबध्दता :- उत्तर प्रदेशमधील खेरी लकीमपुर प्रभाग

वैशिष्ठे :- बैलाची पाळण्याची क्षमता व गती उत्तम. गाय प्रतिदिन चार ते सहा लिटर दूध देते. दूध देण्यामधील सलगता. रंग पंधरा व चमकदार; परंतु बैलांमध्ये मान व वशिंड यावर काळसर गडद छटा. कान  लहान परंतु जमिनीस समांतर, मस्तक चपटे व रुंद, शिंगे उगमापासून बाहेर गेलेली परंतु लहान, मान जरा आखूड असते. सामान उंचीचे सड, पण लहान असतात.

सिरी

उगमस्थान :- पश्चिम बंगाल

उपलबध्दता :- दार्जिलिंगच्या पर्वत रांगा व सिक्कीम

वैशिष्ठे :- गॉन्गरावर चारणारे गोवंश. शरीराने लहान; पण काटक. मोठे पर्जन्यमान व कडाक्याची थंडी अश्या परिस्थितीत उत्तम गुणवत्ता. गाय प्रतिदिन सरासरी दोन ते तीन लिटर दूध देते. बैल डोंगरउताराच्या लहान शेतीकामामध्ये उत्तम. रंग पूर्णतः काळा व पंधरा यांचे मिश्रण मस्तक लहान आकाराचे, शिंगे लहान, रसरात पण टोकाला अणकुचीदार. पाय उंच व दणकट, कास लहानसर, चारही सड सलग व काळे.

लाल कंधारी

उगमस्थान :- मराठवाडा विभाग.

उपलबध्दता :- मराठवाडा भागामधील कंधार, मुखेड, नांदेड, बिलोली, नळगाव, उदगीर, चाकूर, रेणापूर इत्यादी.

वैशिष्ठे :- दुधाळ गोवंश तसेच बैल चपळ व ओढकामास आदर्श. कोरड्या हवामानात व दुष्काळसदृश परिस्थितीत उत्तम कामगिरी. दुधातील स्निग्धांश ३ ते ४.५ पर्यत रंग संपूर्णपने लाल, मस्तक माध्यम आकाराचे, डोळे लांबट व काळे, वशिंड आकर्षक व वय वाढेल तसे काळसर होते. कास गोलाकार व गुलाबी रंगाची. कातडी चमकदार.

गवळाऊ

उगमस्थान :- विदर्भ

उपलबध्दता :- अमरावती, नाकपुर, यवतमाळ, वर्धा, आणि मध्य प्रदेशाचा काही भाग.

वैशिष्ठे :- अतिशय उष्ण हवामानात तग धरणारा गोवंश. दुग्धोउत्पादन व शेतीकामासाठी उपयुक्त. प्रतिदिन सहा ते सात लिटर दूध उत्पादन दुधातील शिग्धांश ३ ते ५ टक्के रंग संपूर्णतः पंधरा ते करडा,शिंगे लहान व मागे वाळलेली, डोळे लांबट गोल व काळे, कान माध्यम व लहान आकाराचे, वशिंड शरीरास शोभेल असे. गायीची कास माध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. चारही सड लहान आकाराचे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असतात.

कोकण कपिला

उगमस्थान :- कोकणपट्टी

उपलबध्दता :- कोकणातील जिल्हे, पश्चिम घाट परिसर.

वैशिष्ठे :- भारतातील नांगरट, चिखलणी, ओढकाम त्याच बरोबरीने दुधासाठी चांगला गोवंश. सरासरी प्रतिदिन २.५ ते ३ लिटर दूध उत्पादन. उष्ण, दमट, आणि आता पावसाच्या प्रदेशात, डोंगराळ भागातून चारून पोषण. तपकिरी कला किंवा पंधरा भुरा आणि मिश्र रंगाचा गोवंश. लहान ते माध्यम आकाराचे वशिंड, चांगली रोग प्रतीकारक शक्ती.

केकांथा

उगमस्थान :- उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश सीमेलगतचा प्रभाग.

उपलबध्दता :- मध्यप्रदेशातील टिकमगढ. उत्तरप्रदेशातील केन नदीचे खोरे

वैशिष्ठे :- भातशेतीसाठी बैल उपयुक्त. गाय प्रतिदिन दोन ते तीन लिटर दूध देते. रंग करडा ते संपूर्ण काळा यांमधील विविध छटा मध्ये उपलब्ध. शिंगे बाजूने व सरळ जाणारी लहान असतात. कान टोकदार. कास लहान व चारही सड लहान व सलग असतात.

 गंगातीरी

उगमस्थान :- गंगा नदीचे खोरे.

उपलबध्दता :- उत्तर प्रदेशमधील दौबा; वाराणसी, बिहार व उत्तर प्रदेशाची सीमा.

वैशिष्ठे :- दुधाळ गोवंश. गाय प्रतिदिन चार ते पाच लिटर दूध देते. बैल काळ्याभोर मातीत उत्तम कामगिरी करतात. रंग प्रामुख्याने चमकदार पंधरा, चेहरा रुंद व आखूड, मस्तक मोठे, शिंगे उगमापासून बाहेर गेलेली पण निमुळती. कान आखूड, टोकाशी गोलाकार. कास मोठी, आटोपशीर. चारही सड सामान, अंतरावर व गुलाबी असतात. दुधाची शीर अत्यंत स्पष्ट व नागमोडी.

मेवाती

उगमस्थान :- राजस्थान.

उपलबध्दता :- राजस्थान राज्यातील अलवर व भरतपूर प्रदेश.

वैशिष्ठे :- अत्यंत प्रतिकूल वातावरणात तग धरणारा गोवंश. खोल नांगरट, गाडी वाहतुकीसाठी बैल उपयुक्त. रंग पूर्णपणे पंधरा, मान ते वशिंड काळसर छटा. चेहरा अरुंद व लांबट, मस्तक किंचित उंच व उठावदार, शिंगे उगमापासून विलग दिशेने जाणारी, टोकाला निमुळती व मागे जाणारी, कान लहान व लोंबते, कास माध्यम आकाराची, सड गुलाबी किंवा काळे असतात.

 कृष्णाव्हली

उगमस्थान :- कर्नाटक

उपलबध्दता :- कर्नाटकातील कृष्णा नदीचे खोरे

वैशिष्ठे :-बैल शेतकाम व ओढकामासाठी उपयुक्त. प्रचंड ताकद व गतीने काम करणे हे वैशिष्टय. गाय प्रतिदिन तीन ते चार लिटर दूध देते. रंग पंधरा रे तांबूस करडा किंवा काळसर अशा मिश्र छटेपर्यत असतात. शिंगे मागून पुढे येणारी कोचर. कपाळ अरुंद व लांबट. कपाळाच्या मधोमध खाच असते. वशिंड मध्यम आकाराचे, डोळे उभे व काळे. कान अरुंद. कास लहान चारही सड लगत असतात.

नागोरी

उगमस्थान :-  राजस्थान

उपलबध्दता :- राजस्थान मधील नागौर विभाग.

वैशिष्ठे :-अत्यंत उष्ण हवामान व निकृष्ट वैरणीवर उत्तम दुग्धउत्पादन देणारा गोवंश. बैल वाहतुकीसाठी उत्तम रंग पूर्णतः पांढरा ते किंचित करडा यामधील विविध छटा, डोळे काळे, वशिंड काळसर छटेचे, शिंगे मस्तकापासून बाहेर गेलेली. व टोकाला मागे वळलेली. चारही सड गुलाबी व टपोरे. दुधाची शीर स्पष्ट असते.

पोनवार

उगमस्थान :-  उत्तर प्रदेश

उपलबध्दता :- उत्तर प्रदेशमधील पिलभीत परिसर. 

वैशिष्ठे :- भातशेतीच्या कामासाठी बैल उपयोगी. विषम हवामानात तग धरून राहणारा गोवंश. गाय प्रतिदिन दोन ते तीन लिटर दूध देते. रंग काळसर तांबडा यामध्ये विविध छटा अंगावर पांढरे ठिपके प्रामुख्याने आढळतात. कपाळ लांबट व अरुंद. कपाळावर पंधरा ठिपका. शिंगे लहान, प्रथमापासून लांब जाऊन वर येणारी, कान लहान व टोकदार. कास लहान, दुधाची शीर सरळ व अस्पष्ट. वशिंड लहान.

नवीन नोंदणी झालेले गोवंश. :-

* बाचूर (  बिहार )                  * लडाखी (जम्मू आणि काश्मीर )

* मोतू ( ओडिशा )                  * पोदाथुरपु ( तेलंगणा )

* घुमसरी  ( ओडिशा )             * नारी ( राजस्थान, गुजरात )

* बिंझरपुरी ( ओडिशा )           * डागरी ( गुजराथ )

* खारीर ( ओडिशा )               * थुथो ( नागालँड )

* पुलीकुलम ( तामिळनाडू )      * श्वेत कपिला ( गोवा )

* कोसाली ( छत्तीसगढ )           * हिमाचली पहारी ( हिमाचल प्रदेश )

* मालन गिड्डा ( कर्नाटक )         *  पुर्निया ( बिहार )

* बिलाही ( हरियाणा )

* बद्री ( उत्तराखंड )

* लखिमी ( आसाम )

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..