http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

         देशी गोवंशामध्ये स्थानिक हवामानात जुळवून घेण्याची वलक्षण शक्ती आहे. तसेच सकस दूध देण्याची क्षमता असते. निकरिष्ठ चार पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकारकता यांसारखे गुणधर्म देशी गोवंशात आढळतात. या गोवंशाचे शास्त्रशुद्ध संगोपन गरजेचे आहे.

देशातील एकूण पन्नास नोंदणीकृत गोवंशापैकी महाराष्ट्रत देणगी, डांगी, गवळाऊ, खिलार, लाल कंधारी आणि कोकण कपिला हे सहा गोवंश आढळतात. वैशिट्य पूर्ण गुणधर्म, उत्पादनक्षमता असलेल्या जातिवंत गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन आवश्यक आहे. गोवंश संवर्धनात प्रामुख्याने पैदासक्षम आणि जतिवंत वाळूची उपलब्धता संबंधित जातीच्या पैदासक्षेत्रात असावीत. यासह पशुपालकांमध्ये शास्त्रशुद्ध पैदास व्यवस्थापनाचे ज्ञान गरजेचे असते.

देशी गोवंश संवर्धनासाठी उपाय :-

पैदास क्षेत्रात जातिवंत वळुंची जोपासना

* ज्या वळूत संबंधित देशी वंशाचे बाह्यलक्षणे आणि प्रजोत्पादन गुणधर्म दिसून येतात. त्यास जातिवंत वळू म्हणतात.

* वळुंची निवड करताना त्याची बाह्यलक्षणे जसे रंगरूप, शारीरिक ठेवणं, बाधा आणि प्रजोत्पादन गुणधर्म म्हणजे त्यापासून झालेली उत्तम वंशावळ ( वासरू / लागवडी ) यांचे सकल आकलन करावे.

* शुद्ध वंशावळींचे जनावरे असावेत.

* शुद्ध वंश हा जातिवंत मादी आणि वळू यांच्या साकारतुन तयार होतो.

* कळपात एक उत्तम वळू अनेक माद्यांना फळविण्यासाठी पुरेसा असतो.

* कृत्रिम रेतना द्वारे एक वळू अनेक पिलांचा (वासराचा ) पिता ठरू शकतो.

* जातिवंत वाळू हा गोवंश सुधारणेचे महत्वाचे अंग आहे.

पैदास प्रणालीची अंबलबजावणी:-

* गावपातळीवर देशी गोवंशाचे वळू / गाईंना नैसर्गिक पद्धतीने फळविण्यासाठी वापरत असल्यास, एकाच एक वळूस दार पिढीला न वापरता आंतरपैदास टाळावी.

 * निवड पैदास म्हणजे शुद्ध देशी गोवंशाच्या गाई कृत्रिम रेतनाद्वारे फळवित असल्यास त्यास शुद्ध जातिवंत त्याच गोवंशाचे वीर्य रेतनासाठी वापरावे.

* मोठ्या प्रमाणावर असलेल्या अवर्गीत किंवा अर्धसंकरीत गाईंना नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाद्वारे फळविण्यासाठी शुद्ध कशी गोवंशाचे वळू किंवा वीर्य वापरल्यास पत सुधारणा या पैदास प्रणालीचा वापर कटाक्षाने करावा.

* देशी गोवंशाचे पैदास क्षेत्र आकसत आहे. देशी गोवंशाच्या संख्यात्मक वृद्धीसाठी पैदास क्षेत्राचा विस्तार करावा.

प्रगत तंत्रज्ञाचा वापर :-

* सिद्ध वाळुच्या वीर्याचे कृत्रिम रेतन, लिंगवर्गीय वीर्य, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान इत्यादी सारख्या प्रगत तंत्राच्या माध्यमातून पशुपालकांना संवर्धन व वेगाने अनुवांशिक सुधारणा करणे सुलभ होईल.

* प्रयोग शाळेतील पशुपालकांनी वाळुच्या प्रजनन गुणधर्माचा लेखाजोखा ठेवावा.

* नैसर्गिक रेतनासाठी वळू जोपासत असल्यास त्याचे वीर्य परीक्षण करून त्यातील जीवितशुक्राणू संख्या तपासावी.

ब्रीड सोसायटीच्या माध्यमातून गोसंवर्धन :-

* गोवांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धनासाठी पशुपालक, पैदासकार, शास्त्रज्ञ, आणि प्रणालीकर्ते यांच्यात सहसमन्व्य असावा.

* अभ्यासू पशुपालकांनी पुढाकार घेत आपल्या भागातील देशी गोवंशाची ” ब्रीड सोसायटी ” स्थापन करावी. अस्तित्वात असलेल्या ब्रीड सोसायट्यानां मजबूत करावे. यासाठी उत्साही आणि देशी गोवंशप्रेमी पशुपालकांच्या लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे.

* पशुपालकांना रोजगार, माहितीचे प्रसारण तसेच जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय किंवा बिगर शासकीय योजनांची माहिती आणि आर्थिक मदत या दृष्टीने “ब्रीड सोसायटी” उपयुक्त ठरते.

* पशुधनाचे कल्याण, चारा-पाण्याची व्यवस्था, अनुवांशिक सुधारणा, उत्पादन क्षमतेत वाढ, पशुपालक समाजाचा सर्वांगीण विकास या पैलूंबरोबर सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा म्हणून पैदासकार संघटना महत्वाची आहेत.

* ब्रीड सोसायटीच्या माध्यमातून उत्कृष्ट जनावरांची नोंदणी संशोधन आणि विक्रीसाठी महत्वाची ठरते.

देशी गोवंशाची सद्य:स्तिथी आणि आव्हाने

* पशुगणनेच्या ताज्या आकडेवाडीनुसार ( २०१९ ) गोधनाच्या बाबतीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर

* मागील पशुगणेच्या ( २०१२) च्या तुलनेत गोवंशात ९.६३ टक्क्यांनी घट झाली.

* राज्य पातळीवर देशी गाईंच्या एकूण संख्येत ८.१७ टक्क्यांनी घट. बैलांच्या संख्येत २९.६३ टक्क्यांनी चिंताजनक घट.

* पशु संवर्धनात पैदासक्षम नर आणि माध्या यांच्या संख्येतील समतोल हा नैसर्गिक संवर्धन करण्याचा हेतू महत्वाचा. या पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचे संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे.

महाराष्ट्रातील गाईंची जातीनिहाय गणना

महाराष्ट्रातील गोवंश१९ वि पशुगणना (२०१२)२० वि पशुगणना – २०१९ (अंदाजे संख्या )
देणगी,२६,६०९,१०,५२९
लाल कंधारी,५६,७६८९५,३०२
लाल कंधारी१२,९३,१८९,८२,३२८
गवळाऊ,४५,७७९५०,९३६
डांगी,०४,५५८,०३,०६९

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..