http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

रॅचेल कार्सन यांनी कीटकनाशकांच्या परिणामसंबंधी अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या निसर्गाचा अविभाज्य भाग असणाऱ्या मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गावर कब्जा करणे हा माणसाचा उद्धटपणा आहे. या विचारांनी त्या अव्यस्थ झाल्या. सलग ४ वर्षे सप्रयोग अभ्यास करून त्यांनी १९६२ मध्ये ” सायलेंट स्प्रिंग या पुस्तकात जगाला पर्यावरणाचा पहिला-वाहिला शास्त्रीय विचार मांडला..

      मानवी इतिहासाच्या वैज्ञानिक क्रांतीच्या टप्प्यावर दुसऱ्या महायुद्धांदरम्यान अनेक शस्त्रे व तंत्रज्ञाने विकसित झाली. डीडीटी dichloro diphenyl trichloro ethane ह्या विषारी कीटक नाशकांचा शोध याच काळातला. डीडीटी ने त्याकाळात संपूर्ण जगभर टायफाईड, मलेरिया आणि कीटकांमार्फत पसरणाऱ्या इतर रोगांपासून असंख्य लोकांचे पसरणाऱ्या इतर रोगांपासून असंख्य लोकांचे जीव वाचवले. महायुद्धानंतर अमेरिकेने या कृत्रिम रसायनांचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी केला. स्वच्छतेसाठी व कीटक नियंत्रणासाठी सगळीकडे हि रसायने वापरली जाऊ लागली. शेती मध्ये वाढणारे तन आणि उच्छाद आणणारे  कीटक त्यांच्या विरोधात सरकारने आकाशातून डीडीटी सारख्या कीटक नाशकांच्या फवारणीची अनेक अभियाने आम्लात आणली. रसायनांच्या उद्योगांना सवलती मिळाल्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्यांचा भरपूर वापर व्हावा म्हणून कायदे व नियमावल्या तयार झाल्या कुठल्याही प्रकारचा पूर्वाभ्यास, पद्धतशीर नियोजन यांच्या अभावामुळे आणि दृश्य आणि अदृश्य परिणामांमुळे या अनिर्बंध अभियानांना लोकांचा प्रतिसाद थंडच होतो.

कीटकनाशकांचे दुष्परिणाम :-

              सागरी जीवनशास्त्रज्ञ असणाऱ्या रॅचेल कार्सन यांनी या परिणामासंबंधी अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या. निसर्गाचा अविभाज्य भाग असणाऱ्या मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गावरच कब्जा करणे हा माणसाचा उद्धटपणा आहे. या विचारांनी त्या अव्यस्थ झाल्या. सलग ४ वर्षे सप्रयोग अभ्यास करून त्यांनी १९६२ मध्ये ‘ सायलेंट प्रिन्ग ‘ या पुस्तकातून जगाला पर्यावरणाचा पहिला-वाहिला शास्त्रीय विचार मांडला. आज पर्यावरण चळवळीची बीजे येथे रुजली. सरकारच्या अनिर्बंध फवारणी कार्यक्रमांचा आढावा कार्सन भाईंनी घेतला. या रसायनांमधील किरणोत्सर्गी घटक मातीतून, बियाण्यांमधून, पिकांमधुन संपूर्ण अन्नसाखळी पार करून सजीवांच्या ( पक्षी, प्राणी, जलचर, पिके आणि अर्थातच माणसांच्या जनुकांपरेंत पोहचतात, गर्भधारणेपासून मृत्यूपरेंत सजीवांवर परिणाम  सजीवांच्या चरबीमध्ये साठून राहिलेली हि रसायने ठराविक काळाने त्यांचा परिणाम दाखवतात. ती सजीवांच्या आईकडून आनुवंशिकतेच्या माध्यमाने पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

             सरसकट सगळीकडे रसायनांची फवारणी करण्याने सुरुवातीला कीटकांचा उपद्रव कमी होतो. पण लवकरच कीटक रसायनांना प्रतिक्षम होऊन दुप्पट वेगाने व तीव्रतेने त्यांचे पुनरुत्पादन होते व मग आपल्याला अधिक क्षमतेची रसायने तयार करावी लागतात. या अव्याहत चक्रामुळे पर्यावरणाचा समतोल आढळतो. तोपर्यंत आसा सर्वांगीण विचार जगापुढे आला नव्हता, त्यामुळे हे पाहायला अवघड होते. त्याच्या निंदकांनी त्याच्यावर व पुस्तकावर प्रचंड टीका केली. रसायन उद्योगाने कार्सन भाईंना कम्युनिकेट हस्तकठरविले, इतकेच काय त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडेही उडविले. शेवटी कॅन्सरशी लढा देणाऱ्या भाईंना काँग्रेसच्या सुनावणीला कोर्टात हजर राहावे लागेल. त्यांच्या समर्थक शास्त्रज्ञांनी मात्र त्यांना चांगली साथ दिली.

कायदा पर्यावरणाचा :-

              कीडनाशकांवर बंदी घालावी, असे कार्सन भाईंनी म्हंटलेले नाही. त्यांचा विरोध होतो तो रसायनांच्या बेबंद व बेदरकार वापरला । रसायनाच्या घटकांची व परिणामांची पूर्ण माहिती ग्राहकांना देणे हे उत्पादकांना बंधनकारक असावे, असे त्यांनी मांडले, कृत्रिम रसायनांना अनेक जैविक पर्यावर सुचवले. आजच्या पर्यावरणीय समतोलास कारणीभूत आलेल्या घटकांमध्ये ६०च्या दशकात निर्माण झालेल्या कृत्रिम रसायनांचा सहभाग फार मोठा आहे. अमेरिकन राज्यकर्त्यांनी मात्र पुस्तकाची दाखल घेतली. पुढे १९६४ मध्ये अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी त्यांच्या अनेक शिफारशी आमलात आणल्या पर्यावरणाचा कायदा केला व त्याची अंबलबजावणी करणाऱ्या ‘EPA ‘ ची स्थापना केली. दररोज भूमितीय श्रेणीने वाढत असलेल्या व आक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर उपायकारण्याची वेळ निघून जात आहे. सहाव्यांदा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जगाला आज कोरोना विषाणूने हतबल करून टाकले असताना, हे पुस्तक आज ६० वर्षांनी सुद्धा अप्रस्तुत किंवा अप्रासंगित आहे, असे म्हणायचे धाडस कोणी करणार नाही, असे वाटते.     

घडामोडी :-

   मानवी प्रगतीच्या इतिहासात ७० हजार वर्षांपूर्वी बौद्धिक क्रांती झाली. त्यानंतर आथिर्क व कृषी क्रांती ( १६००- १७५० ); औद्योगिक क्रांती १७८०-१८४०; तंत्रज्ञान क्रांती १८७०-१९२०; वैज्ञानिक क्रांती १९४०-१९७०; व डिजिटल क्रांती १९७५-२०२१ या याटप्य्यानी आपण आज इथे पोहचलो आहोत.

    १९३९ मध्ये पॉल म्युलर यांनी डिडिटी शोध लावला

     जागतिक इतिहास युवल नोवा हिरारी म्हणतात, पर्यावरणाचा समतोल ढळू लागला, कि पर्यावरणीय संकट व त्यामुळे आर्थिक संकट जे पर्यायाने राजकीय व सामाजिक संकट घेऊन येते.  त्यामुळे मानवीसंस्कृतीचा ऱ्हास होऊ शकतो. हा समतोल सांभाळणे फक्त मांसाच्याच हातात आहे. पण आपल्याला मात्र या बौद्धिक शक्ती बरोबर येणाऱ्या जबाबदारीचा विसर पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..