http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

कुसूंबा (ता. जि. जळगाव ) येथे अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये देशी गोवंशाचे संगोपन केले जाते. त्याच बरोबरीने दूध , तूपनिर्मिती, शेणापासून सेंद्रिय खत, दंतमंजन निर्मिती होते. शाकाहार प्रसार  तसेच सेंद्रिय खत, जैविक शेतीबाबतही संस्थेर्फे मार्गदर्शन केले जाते.

       देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धनामध्ये कुसुंबा ( ता.जि. जळगाव)  

येथे १९९९ पासून अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र कार्यरत आहे. सव्वीस एकरावर या केंद्राचा विस्तार आहे. या ठिकाणी राठी, व्यवस्थापक, अहिंसक तीर्थ साहिवाल, गीर, कांकरेज, खिल्लार, आणि गावठी गाईंचे संवर्धन, संशोधन केले जाते. जैन मुनी श्री तरुणसागरजी, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे श्री श्री रविशंकर आदी अनेकांनी अहिंसा तीर्थ ला भेट दिली आहे. तरुणसागरजी यांच्या सूचने नुसार या गोसेवा केंद्राचे ” अहिंसा तीर्थ ” असे नामकरण करण्यात आले. सध्या या केंद्रात सुमारे २३०० गायीचे संगोपन होत आहे. या केंद्रामध्ये १५० जणांना बारमाही रोजगार मिळाला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरासरी दररोज साठ हजारांची मिळकत होते. मजूर, वीज, इंधन, दुरुस्ती आदीवर दररोज दीड लाख रुपये खर्च होतात. व्यावसायिक दृष्टिकोनपेक्षा सामाजिक उपक्रमांवर केंद्राने सतत भर दिला आहे. त्यामुळे अनेक वर्ष हे केंद्र चांगल्या पद्धतीने सुरु आहे. केंद्रात पंचगव्यापासून गो उत्पादने निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. केंद्रातर्फे जनजगृतीसाठी विविध गावांमध्ये अहिंसा रथ फिरविण्यात येतो. केंद्रामध्ये वीजनिर्मिसाठी गोबर गॅस प्रकल्प आहे. यावर केंद्रातील काही पर्थादेवही कार्यरत आहेत. केंद्रात २४ तास पशु चिकित्सालय आहे. शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती संबंधी कृषी संमेलनाचे आयोजन केले जाते.

        अहिंसा तीर्थमधील परसरानी गोशाळेच्या दर्शनी भागात तीर्थचे संस्थापक रतनलाल बाफना आणि त्यांचे वडील चुन्नीलाल बाफना आणि माता सोयराबाई यांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत. त्याच बरोबरीने विविध संत, महा पुरुषांच्या प्रतिमादेखील या ठिकाणी पाहायला मिळतात.

गाईंसाठी स्वतंत्र व्यवस्था:-

 * भाकड गाईंसाठी जीवनदया धाम, मुक्तांगण उभारणी.

* लहान वासरांसाठी इंद्रायणी आणि गायत्री गोठा.

* गुढाल गाईंसाठी मनोरमा, शारदा, प्रीतिसुधा गोठा.

* वासरांना दूध पाजण्यासाठी सीता, भगवती, आणि वसुंधरा गोठा.

* विविध प्रजातींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र गोठा. यामध्ये ५०० गाईंचे संवर्धन

* केंद्रामध्ये गोमाता प्रसूतिगृह, गर्भवतीगाईंसाठी स्वतंत्र गोठा.

* विना आईच्या वासरांसाठी स्वतंत्र गोठा.

* अंध, अपंग, वृध्द गाई, बैलांसाठी आश्रमाची स्वतंत्र व्यवस्था.

संस्थेचे विविध उपक्रम :-

अहिंसा तीर्थ मध्ये गरजवंतांच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. रुक्ष वाटिका, उद्यान, आणि ध्यान केंद्र उभारण्यात आले आहेत. वृद्धांसाठी दादा-दादी पार्क आहे. सामाजिक गरजा लक्षात घेऊन केंद्राने या प्रकल्पची उभारणी केली आहे.

* केंद्राच्या ठिकाणी पक्ष्यांची भूक भागविण्यासाठी राजामेघरत कबुतरांना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पक्ष्याना खाद्य, पाण्याची व्यवस्था आहे. अहिंसा तीर्थचे व्यवस्थापन रतनलाल बाफना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला. सुशील बाफना हे देखील या कबुतरकारखान्यात आठवड्यातून किमान तीनदा येऊन पक्षी सेवा करतात.

* अहिंसा तीर्थ परिसरात गो प्रदकशिनेसाठी सप्त गोमाता प्रदक्षिणा मंदिर उभारण्यात आले आहे.

* शाकाहार प्रसार, प्रेरणेसाठी जनजागृती तसेच शाकाहार संग्रालय आहे. या ठिकाणी शाहाकाराची गरज याबाबतचे संदेश देणारे चित्र, विचार आहेत. अहिंसा तीर्थ चे संस्थापक रतनलाल बाफना यांच्या सामाजिक, गोसेवेच्या कार्यासंबंधी मिळालेली सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक पाहावयास मिळतात.

* अहिंसा तीर्थ परिसरात घेनुरक्षक आवास, जीवनदया कार्यालय, क्षमद्वार, दयाद्वार, शांतिद्वार, दूध पॅकिंग, आणि वितरण केंद्र कार्यरत आहे. तसेच तीन पाणी साठवण तलाव, फुलांची रोपवाटिका आहे.

* कर्मचाऱ्यांसाठी निवास्थान, अतिथी गृह, खुले व्यासपीठ, उपहारगृहाची व्यवस्था.

उत्पादनाची निर्मिती :-

* दररोज ६०० लिटर दूध संकलन. जळगावातील ग्राहकांना थेट विक्री.

* दररोज सहा लिटर तूप निर्मिती. कल्याणी तू ब्रॅंडने विक्री.

* गोमूत्रापासून अर्क, शेणापासून अगरबत्ती, दंतमंजन उत्पादन.

* गोमूत्रापासून कीटकनाशक निर्मिती. शेतकऱ्यांकडून चांगली मागणी.

उपपदार्थांचे दर :-

दरवर्षी केंद्रातर्फे उत्पादित कल्याणी खताच्या विक्रीतून ८० ते ९० लाखाची उलाढाल होते. या केंद्रामधून शेतकरी सेंद्रिय खतांची खरेदी करतात. त्याच बरोबरीने मागणीनुसार पुरवठा देखील केला जातो. केंद्राच्या परिसरामध्ये तूप, धूपबत्ती, दंतमंजन, गोमूत्र अर्क विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था आहे.

दूध ( प्रति लिटर )५५
तूप ( प्रति लिटर )१६००
धूपबत्ती ( ३० नग )३०
दंतमंजन ( ५० ग्रॅम )३०
गोमूत्र ( २०० मिली )२०
कल्याणी पॉवर प्लस सेंद्रिय खत ( ५० किलो )४००
कल्याणी गोल्ड खत ( ५० किलो )३५०

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..