आज जगभरात पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या सगळ्या कागदपत्री गोष्टींना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जगात जेवढे पण देश आहेत आणि त्या देशामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कारण त्या ओळखपत्राद्वारेच आपण हे माहिती करू शकतो की तो कोणत्या देशाचा रहिवाशी आहे. आपल्या देशात आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड हे मुख्य ओळखपत्र म्हणून मुख्यतः वापरले जाते. यामध्ये बँकेचे व्यवहार, बँकेच्या कर्जासाठी किंवा इतरही काही आर्थिक गोष्टींसाठी पॅन कार्ड मुख्य कागदपत्र म्हणून वापरले जाते.
भारतात अजूनही बऱ्याच लोकांकडे पॅन कार्ड नाही किंबहुना त्यांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. ग्रामीण भागात पॅन कार्ड बद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा जमिनीची खरेदी विक्री करताना अथवा इतरही आर्थिक कामांमध्ये पॅन कार्ड अनावश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी आता पॅन कार्ड काढणे अत्यावश्यक आहे जेणेकरून आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
पॅन कार्ड म्हणजे नेमकं आहे तरी काय ?
तर मित्रांनो पॅन कार्डचा(PAN CARD) फुल फॉर्म आहे (PERMANENT ACCOUNT NUMBER) . पॅन कार्ड हे एक युनिक म्हणजेच विशिष्ट ओळखपत्र आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड हे अत्यावश्यक असते. पॅन कार्डवर जो दहा अंकी क्रमांक दिलेला असतो तो आयकर खात्याकडून देण्यात आलेला असतो. इन्कम टक्स (income tax) भरण्यासाठी पॅन कार्डचा उपयोग केला जातो. कोणत्याही बँकेत खाते खोलण्यासाठी, taxable salary मिळवण्यासाठी, धन संपत्ती आणि दागिने विकण्यासाठी किंवा घेण्यासाठी या सर्व ठिकाणी पॅन कार्डची आपल्याला गरज पडत असते. यासाठी पॅन कार्डवर account holder(ज्याचे खाते आहे ) ची सर्व माहिती दिलेली असते. पॅन कार्ड आपल्या एटीएम किंवा क्रेडिट कार्डच्या आकाराचे असते. पॅन कार्डवर आपले नाव , वडिलांचे नाव, जन्मतारीख, आपली सही आणि pan (permanent account number) आणि फोटो असतो.
पॅन कार्डचे व्यवसायिकांसाठी फायदे कोणते ?
१. पॅन कार्ड मध्ये photo, नाव, आणि सही हे ओळखपत्राच्या स्वरूपात आपण उपयोग करू शकतो.
२. पॅन कार्डचा मुख्य उपयोग कर(Tax) भरण्यासाठी होतो. पॅन कार्ड नसल्यास आपल्याला जास्त कर भरावा लागू शकतो. पॅन कार्ड वरचा UNIQUE NUMBER च्या मदतीने आयकर विभाग एका व्यक्तीने केलेले सर्व व्यवहार एकाच ठिकाणी LINK करतात आणि त्याच्यावर नजर ठेवतात आणि कराची चोरी यामुळे थांबते.
3. काही मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता भासते. बँकेत अनेक वेळा लाखांच्या वर रक्कम आपल्याला वितरित करायची असेल किंवा कोणाला पाठवायची असेल तर त्यासाठी देखील पॅन कार्ड विचारतात.
४. पॅन कार्डचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तो अचल मालमत्ता खरेदी किंवा विक्री दरम्यान गुंतलेल्या औपचारिकतांमध्ये स्वीकारला जातो.१० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
५. बर्याच वेळा कर भरण्यावेळी करदात्यास वास्तविक कर रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. त्या रक्कमेचा परतावा मिळविण्यासाठी, व्यक्तीला त्याचे पॅन कार्ड बँक खात्यात जोडणे अनिवार्य आहे.
६. जर आपल्याला एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरू करायची असेल तर संस्थेच्या नावे पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.
७. आज-काल प्रत्येकाला शेअर मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवायचा असतो. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी आपले डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते उघडण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, जे डीमटेरिलाईज्ड फॉर्ममध्ये शेअर्स ठेवण्यासाठी वापरले जाते.
८. बँकेचे व्यवहार करत असताना आपल्याला पे ऑर्डर, बँक धनादेश आणि ड्राफ्टची विनंती करताना पॅन कार्ड आवश्यक आहे.
९. पॅन कार्ड हे आयकर विभागाला एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटकाच्या आर्थिक व्यवहारांचे मूल्यांकन करण्यास मदत करते. जर एखादा व्यक्ती कर चोरी करत असेल तर पॅन कार्ड मुळे लगेचच ही चोरी पकडता येते. पॅनकार्डमध्ये नाव, छायाचित्र आणि इतर संबंधित माहिती असते जी त्यास वैध ओळखपत्र देखील बनवते.
१०. बँकेत आज-काल कर्ज घेतल्यानंतर जर आपण जर हफ्ते भरले नाही तर त्याचा आपल्या सी-बिलावर (credit score)वर थेट परिणाम होत असतो. जर आपले सी-बील चांगले नसेल तर आपल्या गृह कर्ज असो अथवा इतर कर्ज देखील घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्व आपण आपल्या पॅनकार्डच्या माध्यमातून पाहू शकतो किंवा त्याबद्दलची खात्री करू शकतो. या सर्व गोष्टींसाठी पॅन कार्ड असणे मूलभूत गरजे सामान झाले आहे असं म्हणायला हरकत नाही.