http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

                    कणेरी येथिल सिद्धगिरी मठाचे धार्मिक क्षेत्रात सक्रिय राहण्याबरोबरच सेंद्रिय शेतीही केली आहे. त्या अनुषंगाने विविध जातीच्या देशी गाईंचे जातन करण्याच्या उद्धेशाने माठाने पंचवीस वर्षांपूर्वी गोशाळा सुरु केली. आज येथे सुमारे एक हजार देशी गाईंचे संगोपन केले जात आहे. मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर यांच्या प्रयत्नातून गोशाळा उभी राहिली आहे. केवळ मठाधिपती म्हणवून न घेता आदर्श व्यवस्थापक म्हणून त्यांचे कार्य सुरु आहे.

कणेरी ( ता. करवीर ) येथे सुमारे एक हजार देशी गाईंची गोशाळा उभारण्यात आली आहे. 

               काही वर्षांपासून संकरित गाईंचे पालन किंवा त्यांची संख्या वाढत असल्याने देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे विविध जातींच्या देशी गाई मिळवण्यासाठी मठाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. दुष्काळी भागात जायचे, तेथे जनावरे पाहायची व तेथील देशी जनावरे घेऊन यायची, असा उपक्रम त्यांनी राबवला. केवळ त्यांचे पालनपोषण व संवर्धन हाच हेतू ठेवून त्या नेल्या जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गाई मठाला तशाच दिल्या. गाईंची जात व इतर वैशिष्ट्ये पाहूनच ती गोठ्यात आणण्याचा उपकरण सुरु आहे.

गोठ्यांची रचना :-

             शाळेच्या सुमारे पाच एक्कर क्षेत्रात जनावरांचा गोठा आहे. त्यामध्ये मध्यभागी शेड आहे. पाणी, चाऱ्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. एके ठिकाणी जनावरांना पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी बंदिस्त गोठा आहे, तर इतर ठिकाणी मुक्त पद्धतीने जनावरे सोडली जातात. जनावरांच्या कांद्यासाठी विविध प्रकारच्या चारपिकांचा वापर केला जातो ; यामध्ये हायड्रोपोनिक्स, मुरघास, कडबाकुट्टी, पशुखाद्य, मिल्क रिप्लेसर, खनिज मिश्रण, मका, ज्वारी, बाजरी, कडवळ, मारवेल गावात, फुले गुणवंत, सुपर नेपियर यांचा जनावरांच्या वाढीसाठी फायदा होतो. त्यामुळे दुधात आर्धा तर एक लिटर वाढ होते. जनावरांच्या प्रतिकारशक्तीतहि  चांगली वाढ होते. या शिवाय मका, बाजरी आदी धान्य भरडुनही दिले जाते. पेंढीचा वापरही केला जातो. जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण व अन्य सेवेसाठी कायमस्वरूपी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. प्रतिजनावर दिवसाला विस किलो ओला व सुका चारा दिला जातो. दिवसा वीस लिटर पाणी दिले जाते. गोशाळेचे स्वतःचे पशुखाद्य निर्मिती केंद्र आहे, त्यामुळे जनावरांना संतुलित पशुआहार मिळतो, त्यामुळे खर्चात बचत होते व दुधाची परत उत्कृष्ठ  राहते.

सेंद्रिय दूध तूप ताकाची विक्री :-

             गोशाळेत दाररोज २०० लिटर दुधाचे संकलन होते. यात खिल्लार गाय सरासरी चार लिटर , गिरी दहा लिटर, साहिवाल दहा लिटर, कोंग्रेज पाच लिटर तर खडकी खिल्लार ते पाच  लिटर दुध देते . दूध काढणे व इतर व्यवस्थापनासाठी तीस मजूर काम करतात. शंभर रुपये प्रति लिटर हा दुधाचा दर आहे.

कोल्हापूर परिसरातील ग्राहकांना घरपोच विकले जाते. येणाऱ्या पर्यटकांना दहा रुई ग्लास या दराने ताक विकले जाते. प्रति किलो अडीच हजार रुपये दराने तूप विकले जाते यातून मिळणारे उत्पन्न गोठ्याच्या देखभालीसाठीच वापरले जाते. मठाचा लोकसंपर्क जास्त असल्याने तूप दुधाची विक्री सहजतेने होते. याशिवाय पंचगव्यापासून (गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप ) विविध उपपदार्थ तयार करण्यात येतात. तेल, साबण, धूप, गोमूत्र, अर्क, आदी उपपदार्थ निर्मितीही नुकतीच सुरु केली आहे.

शेण – गोमूत्र मठाच्या शेतीला :-

           मठाची सुमारे शंभर एक्कर सेंद्रिय शेती आहे. त्यात त्यात ऊस, चार, पीक, आंबा, भात, भुईमूग, आदी पिके आहेत. आता मलाही घेतला आहे. गोठ्यात तयार होणारे शेण,मलमूत्र मठाच्या सेंद्रिय शेतीत वापरले जाते. यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होते. गोठ्याची स्वच्छता केलेले पाणीहि  थेट शेतीलाच दिले जाते.

गोबर गॅस प्रकल्पातून इंधन निर्मिती :-

             गोठ्याच्या ठिकाणीच  गोबर गॅस चा प्रकल्प आहे. दाररोज तीस अस्वशक्ती ऊर्जा तयार होते. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ , गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याच उपयोग केला जातो.

गोशाळेची वैशिष्ट्ये :-

    * गाईंची जोपासना केल्यास जमिनीचे व मानवी आरोग्य सुधारते. यामुळे त्याचे जातं करून जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न.

    * कोणत्याही देशी गाईंचा संगोपनासाठी स्वीकार.

    * देशभरातील दुर्मिळ जातीच्या देशी गाईंचा गोठ्यात संग्र्ह.

    * शेणखताचा मठाच्या शेतीसाठी उपयोग.

    * शेणखतावर प्रक्रिया करून विक्री.

    * प्रत्येक जातीसाठी वेगळा गोठा.

    * कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मिळ देशी गाईंचे संवर्धन व्हावे त्यादृष्टीनेच शाळेची उभारणी.

    * ज्या शेतकऱ्यांना आपल्या गाईंचे व्यवस्थापन करणे अशक्य होते, ते शेतकरी या गोशाळेत गाई आणून सोडतात. दुष्काळी भागातून तसेच कसायांकडे जाणाऱ्या गाईही इथे आणल्या गेल्या आहेत.

लहरो

  माठाने जशा उपलब्ध होतील तसे गाईंचे संकलन केले. बोटावर मोजण्या इतक्या गाईंपासून गोठा अस्तित्वात आला आज देशातल्या बावीस जातींच्या गाई मठाच्या गोठ्यात आहेत. प्रत्येक गाईंची वेगळी नोंद आहे.

* वेचून ———————————-कोटाय्याम – केरळ

* उम्बलचेरी —————————-तंजावर नागापट्टम व दिंडी गुल तामिळनाडू

*थारपारकर —————————– कच्छ- गुजरात. जैसलमेर व जोधपूर – राजस्थान

* साहिवाल ——————————फिरोजपूर – पंजाब , श्रीगंगानगर – राजस्थान.

* बारगुर ———————————इरोड, पेरियार,बारगुर टेकड्या – तामिळनाडू

* राठी ————————————बिकानेर, गंगानगर व हनुमानगड – राजस्थान  अमोर-पंजाब

* कांगायम ——————————इरोड, कोईमतूर, – तामिळनाडू

* अमृतमहल ————————-हसन मंगरूळ – कर्नाटक 

* डांगी ——————————–नाशिक, धुळे, नंदुरबार, – महाराष्ट्र. पंचमहाल, डांग-गुजरात

* गिरी ———————————अमरेली,कवनागर, जुनागड, राजकोट. गीर जंगलावरून गीर हे नाव पडले.

* देवणी ——————————–लातूर उदगीर – महाराष्ट्र , आंध्र प्रदेश

* म्हैसुर खिल्लार———————- म्हैसुर, मंड्या, कोलार, हसन, चित्रदुर्ग-कर्नाटक

* कांग्रेज ———————- कच्छ, मेहसाना, अहमदाबाद – गुजरात, खेड – जोधपूर.

* कोकण कपिला ———————-कोकणपट्टी, पश्चिमघाट विभाग -महाराष्ट्र

* खिल्लार ——————————सांगली, सातारा, किहापूर, पुणे, सोल्हापूर – महाराष्ट्र

* कृष्णावेल्ली —————–घटप्रभा, बेळगाव – कर्नाटक. मिरज सातारा , कोल्हापूर- महाराष्ट्र

* ओंगल————————————प्रकाशम, नेल्लोर , गुंटूर – आंध्र प्रदेश

* निमारी————————————बडवानी, खारगाव – मध्य प्रदेश 

* लाल कंधारी —————————– लातूर, नांदेड व मराठवाडा – महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..