http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

व्यवसाय सदृश्य बुद्धीने तुम्ही जर जुन्या काही पारंपारिक उद्योग व्यवसायांकडे पहायला जाल,तर तुम्हाला त्यात काही अभ्यासन्वये नवीन तंत्र वापरून बरंच काही करता येईल. महत्त्वाची बाब हीच की आर्थिक सबलता आणावयाची असेल आणि नवीन काही व्यवसाय करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही जुन्या व्यवसायांना पाठीशी न घालता पोटाशी घ्याल तर तुमचा त्यात नक्कीच फायदा होईल. जुने,पारंपरिक उद्योग नवीन औद्योगिक वसाहतींनी जरी गिळंकृत केले असतील तरी माणसांच्या गरजा त्याच आहेत,ज्या पारंपरिक उद्योगांनी इतिहासात पुरवल्या आहेत. फक्त त्याला नवीन चकाकी देत, कामाचा वेग वाढवून आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याचा वापर करून पारंपरिक उद्यगांची गती कमी करण्याचे काम नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या उद्योगांनी केले आहे. विचार केल्यास पारंपरिक उद्योगांना तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नवीन केंद्र बनवू शकता,तेही तुमच्या बुद्धी क्षमतेच्या कुवतीला सहज चालना देऊन! फक्त पारंपरिक उद्योगांना आधार हवाय तो तुमच्या नवीन शैलीच्या साद घालणाऱ्या कार्यक्षमतेचा! तुमची कार्यक्षमता वाढवा, तंत्रज्ञानाची सांगड घाला, पारंपरिकतेच्या गोटात जाऊन गुणवत्ता न बदलू देता रासायनिक प्रक्रियेला दूर ठेवा आणि तुमच्या उत्पादनाला विकण्याचे कौशल्य दाखवा! रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आज लोक दूर ठेवू इच्छितात, पण मग त्यांच्या घरातील दैनंदिन जीवनावश्यक यादीत रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ ते शंभर टक्के दूर ठेवू शकतात का? हे थोडं चाचपडून पहायला हवं आणि त्यात या ठराविक ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आपण हवं ते देऊ शकतो का याचा विचार करायला पाहिजे. यांतील असाच एक पदार्थ म्हणजे तेल! रासायनिक प्रक्रिया केलेले तेल बहुतांश लोकांना आज नको आहे. त्यासाठी ते नियमित योग्य असा पुरवठादार शोधत असतात. पारंपारिक उद्योगांना गती देऊन आपण या क्षेत्रात तग धरू शकतो आणि अशा ग्राहकांना न्याय देऊन आपला एक ठराविक ग्राहकवर्ग आपण तयार करू शकतो,हे नक्की!

Empowering Business .. Empowering Nation

 उद्योगक्रांतीचे अपडेट्स  सुरु करण्यासाठी  खालील लिंकला क्लिक करा.

Whattsapp-https://bit.ly/3ljZyxs

फेसबुक- https://bit.ly/3oCH8tZ

Youtube – https://bit.ly/3AexIXz

जुन्या काळी लाकडी तेल घाणा असे आणि या तेल घण्यात तयार झालेले तेल प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात नित्य वापरात येई. बैलाच्या वापराने हा घाणा ओढला जाई आणि तीळ, मोहरी, शेंगदाणा,करडई,कारळे, एरंडेल,बादाम,खोबरेल,सूर्यफूल या पदार्थांपासून तेल काढले जाई. या पारंपरिक उद्योगांना उत्पादन मर्यादा असे. उत्पादनाच्या प्रतीवर शंका उपस्थित रहात असे.उत्पादनाचा दर्जा आणि मुबलकता यांमुळे हे पारंपरिक उद्योग नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या ओघात लयास जाऊन बसले. यांसारखे बरेच पारंपरिक उद्योग शून्य होण्यास वेळ लागला नाही.

तर अशाच काही उद्योगांची यादी घेऊन बसल्यास तुम्हाला त्यात एक नवीन सफल उद्योग उभारणीचा रस्ता नक्कीच सापडेल. या लाकडी तेल घाण्याच्या जागी जर तुम्ही “सेमी ऑईल मिल” किंवा “संपूर्ण स्वयंचलित आधुनिक यंत्र” वापरले आणि रासायनिक पदार्थांचा उपयोग कमी करत किंवा रासायनिक प्रक्रिया न करताच शुद्ध पारंपरिक उत्पादन वाढवले,तर तुम्हाला तुमचा ग्राहक नक्कीच शोधत येईल यात शंका नाही. ग्राहक तयार करण्यापेक्षा ग्राहकांच्या मागणींवर कार्य केले तर बाजारात वाट पाहत उभा असलेला ग्राहक तुम्हाला तुमच्या डोळ्यात ठळक दिसेल.

तुम्ही तुमच्या जागेच्या उपलब्धतेनुसार, तुमची उत्पादन क्षमता ठरवून तेल घाण्यासारख्या (ऑइल मिल) व्यवसायाचे भांडवल ठरवू शकता. २५,००० ते ३,००००० लक्षपर्यंतच्या भांडवलात तुम्ही तुमचा ऑइल मिल हा व्यवसाय नक्की सुरू करू शकता. फक्त तेल विक्री हे लक्षात न घेता,ढेप तयार करणे आणि विकणे, पशुखाद्य तयार करून विकणे इथपर्यंत तुम्ही तुमच्या व्यवसायात मजल मारू शकता. रिफाईंड तेल रासायनिकयुक्त पदार्थांनी बनवले जात असल्याने तुम्ही तुमचा शुद्ध हेतूने तेल खाणार स्वतःचा ग्राहक तयार करू शकता हे जरा लक्षात घ्या! सहजपणे यंत्र हाताळू शकणारे यंत्र, योग्य व्यावसायिक मार्गदर्शन आणि कच्च्या मालाची उपयोजन राबवून तुम्ही तुमच्या व्यवसायात बहर आणू शकता. तुम्हाला तुमचा ग्राहक सापडला आणि त्याला हाताळण्याची कला जमली की तो ग्राहक देखील तुमचा पारंपारिक ग्राहक बनून आर्थिक अवस्था वाढवण्याचा एकमेव दुवा बनेल हे सांगायला नको! 

लाकडी घाणा उघडा असतो, त्यात जास्त पाण्याची मात्रा वापरावी लागते, शेंगदाण्यासारखा कच्चा माल ओला करून बराच वेळ ठेवावा लागतो,मालाचे प्रमाण जास्त वापरावे लागते, त्याला शक्तीचा जास्त प्रयोग करावा लागतो यांसारखे बाजू लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञान आजमावून यांवर मात करत एक सरळ गणित बनवत पारंपारीकतेला नव्या तंत्रज्ञानाचे तोरण लावायला काय हरकत आहे, नाही का? शेवटी व्यवसाय उभा राहिला पाहिजे आणि घरात बरकत आली पाहिजे, जुन्याचं सोनं करत! बरोबर ना?

उद्योगक्रांती..

Empowering Business

Empowering Nation

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..