http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

व्यावसायिक समाजकार्य हा विषय आजकाल समजून घेण्याची बाब झाली असूनही या गोष्टीकडे सर्वथः दुर्लक्ष केले जाते आणि थोडक्यात महत्वाच्या बाजू लक्षात न घेता बरेच समाजातील मानवी घटक या विषयापासून स्वतःला दूर ठेवताना आज क्षणी आपल्या निदर्शनास येतं. व्यावसायिक समाजकार्य ही बाब मूलतः सर्व स्तरातील वैचारिक लोकांनी खरंतर लक्षात घ्यायला हवी आहे. समाजकार्य म्हणजे नेमकं काय? हे प्रथमदर्शी पाहण्याची गरज आहे. समाजकार्य करणाऱ्या बऱ्याच संस्था,संघटन आज आपण पाहतो. त्यांचं उद्दिष्ट आणि धोरण नेमकं काय आहे हे आपल्या लक्षात घेणं अधिक गरजेचं झालं आहे. या अशा संस्था आणि संघटना आपल्याला कितपत फायदेशीर असू शकतात आणि त्याचा आपल्या करू इच्छित असलेल्या व्यावसायिक जडणघडणीत आपण कितपत विनियोग करू शकतो याचा विचार सहसा कमी लोक करताना आपण पाहतो.

Empowering Business .. Empowering Nation

उद्योगक्रांतीचे अपडेट्स सुरु करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Whattsapp-https://bit.ly/3ljZyxs

फेसबुक- https://bit.ly/3oCH8tZ

Youtube – https://bit.ly/3AexIXz

समाजकार्य म्हणजे मानवी कल्याण आणि या मानवी कल्याणाची बाजू आपल्याशी निगडित असू शकते ही बाब सर्वांच्या धोरणी येणे खूप महत्वाचे आहे. एकमेकांच्या गरजा भागवत असताना एखाद्या व्यवसायाची उत्पत्ती होत असते आणि त्या व्यवसायाबाबत लागणारं आकलन,ज्ञान आपण घेणं आपल्या सोयीचं ठरू शकतं! निस्वार्थीपणे करत असलेले समाजकार्य आणि व्यावसायिक समाजकार्य या दोन बाबी पडताळून पाहत असताना दोहोतील संबंध चाचपडता आला पाहिजे. व्यावसायिक समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे.यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि ज्ञानाच्या आधारावर सामाजिक कार्य केले जाते. मानवी प्रभावांना समजून घेऊन सामाजिक समस्या लक्षात घेत सामाजिक समस्या सोडविण्याचे कार्य थोडक्यात व्यावसायिक समाजकार्य आहे. दुःखी, वंचित,पीडित आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी हे व्यावसायिक समाजकार्य विविध संस्था आणि समूहाच्या माध्यमातून कार्य करत असते.

व्यावसायिक समाजकार्य एखाद्या व्यक्ती व गटाला आत्मनिर्भर बनवणारी एक प्रकारची सेवा आहे. निस्वार्थी दृष्टीने समाजकार्य न करता समाजकार्यातून मोबदल्याची अपेक्षा ठेवली जाते,त्याला आपण व्यावसायिक समाजकार्य म्हणू शकतो. एखाद्या बाबतीत नवीन ज्ञान अवगत करून देणे, व्यवसायिकतेत मदत करणे,गरजांची पूर्तता करणे किंवा मार्ग दाखवणे या काही गोष्टी व्यावसायिक समाजकार्यातील बाजू आहेत. सामाजिक परिवर्तन घडवून आणणे,लोककल्याणासाठी सदैव तत्पर राहणे, सामाजिक समस्या सोडविणे, लोकशाही रुजवत योग्य संधी व न्याय मिळवून देणे ही काही व्यावसायिक समाजकार्याची उद्दिष्टे आहेत. गरजवंतांच्या क्षमतांचा विकास करत व्यक्ती व समूहाच्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला करण्यासाठी व्यावसायिक समाजकार्य निमित्त ठरते. त्यासाठी व्यावसायिक समाजकार्य करणाऱ्या संस्था आणि समूहांना लक्षात घेत समाजातील प्रत्येक घटकांनी याचा फायदा घ्यायला हवा आणि आपल्या व्यावसायिक किंवा आर्थिक प्रगतीच्या बाजू मजबूत करून घेत या व्यावसायिक समाजकार्य करणाऱ्या माध्यमांना आपल्या कक्षेत सामावून घेणे अतिशय उपयुक्त ठरते.

उद्योगक्रांती..

Empowering Business

Empowering Nation

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..