http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

एक्वापोनिक शेती ( Aquaponic Farming )

एखाद्या देशाला कृषिप्रधान देश का म्हणावं? कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या देशात सद्य परिस्थितीत शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांच्या परिस्थितीचा आढावा शासन घेतो का? घेतलेला आढावा फक्त कागदोपत्री नमूद करून बंद केला जातो, का त्या आढावा घेतलेल्या कागदांवर अभ्यास करून उपस्थित समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी शासन घेते? या आणि अशा कित्येक बाबींचा विचार शासन दरबारी होत नसल्याने भारतासारख्या कृषी प्रधान म्हणवल्या जाणाऱ्या देशाची कृषी व्यावसायिकता खोल पाण्यात जाऊन बुडते.

शेती विषयक असणारे नवीन तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रशिक्षण शिबिरे शेतकरी बांधवांपर्यंत पोहचत नाहीत,त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आर्थिकदृष्टया खचला जात आहे. त्यासाठी सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाला आधुनिक रूप देऊन शेतीची औद्योगिक वसाहत बनवण्याची नवीन  संकल्पना अंमलात आणण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी.

एक्वापोनिक शेती (Aquaponic Farming)  हा त्यातील एक प्रकार!  एक्वापोनिक शेती ही नवीन तंत्रज्ञानाच्या गोटातील एक जम्याची बाजू बनू शकते.शेतकरी मित्रांसाठी आर्थिकदृष्टया प्रबळ बनण्याचे यशस्वी माध्यम म्हणून  एक्वापोनिक शेतीकडे पहायला हरकत नाही. “मातीविना शेती” ही संकल्पना बऱ्याच जणांना माहीत नसावी. मातीविना शेती करण्याची पद्धत कदाचित आश्चर्यकारक देखील वाटू शकते. तर आपण याच मातीविना शेतीची म्हणजेच एक्वापोनिक शेतीची माहिती थोडक्यात घेणार आहोत.

Empowering Business ..

Empowering Nation

उद्योगक्रांतीचे अपडेट्स सुरु करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Whattsapp-https://bit.ly/3ljZyxs

फेसबुक- https://bit.ly/3oCH8tZ

Youtube – https://bit.ly/3AexIXz

एक्वापोनिक शेती मुख्यतः दोन घटकांत विभागते. एक म्हणजे  एक्वाकल्चर आणि दोन म्हणजे हैड्रोपोनिकस. एक्वाकल्चर या प्रकारात मासे पाळले जातात आणि हैड्रोपोनिकस प्रकारात भाजीपाला किंवा फळ झाडे वाढवली जातात. संभ्रमात न पडता थोडक्यात सांगायचे झाले तर एक्वापोनिक शेती ही मत्स्यपालन आणि भाजीपाला,फळबाग यांचे मिश्र स्वरूप आहे. एक्वाकल्चर आणि हैड्रोपोनिकस हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात. 

एका बाजूला मत्स्यपालन केले जाते, तर दुसऱ्या बाजूला पाण्यावर अवलंबून असणारी भाजीपाल्याची शेती केली जाते. माशांपासून बाहेर पडणारे पदार्थ (waste material) पाण्याद्वारे बाजूला काढत हैड्रोपोनिकस घटकांकडे काढले जाते. तिकडे हे माशांचे निरुपयोगी द्रव बॅक्टरीयापासून बाजूला काढले जाते आणि त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतर केले जाते. आता हेच नायट्रेट हैड्रोपोनिकस घटकांच्या पाण्यात सोडले जाते.हे नायट्रेट पालेभाज्या जोपासण्याकरिता अतिशय महत्वाचे ठरते. पाण्यावर अलगद तरंगत असणारी पालेभाज्यांची शेती या कारणामुळे व्यवस्थित जोपासली जाते.त्यामुळे पालेभाज्यांना वेगळ्या खत मात्रांची आवश्यकता भासत नाही. परत हैड्रोपोनिकस घटकांतील पाणी स्वच्छ करून एक्वाकल्चर घटकाकडे पाठवले जाते.हे चक्र असेच चालू राहते,त्यामुळे ९०% पाण्याची बचत देखील होते. या शेती तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे योग्य प्रशिक्षण आणि योग्य माहिती! 

हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा एक्वापोनिक शेतीचा प्लांट उभा राहिलेला आहे. अशा ठिकाणी एकवेळ भेट देऊन नक्कीच शेतीचे हे नवे तंत्र आत्मसात करायला काहीच हरकत नाही.शेतीत असे वेगवेगळे यशस्वी प्रयोग घडवून आणण्यासाठी शासनाने नक्कीच मदत केली पाहिजे आणि असे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे. एक्वापोनिक शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागल्यास सुशिक्षित तरुण-वर्ग शेती व्यवसायाकडे नक्कीच खेचला जाईल.कमी क्षेत्रात,पाण्याच्या कमी वापरात मत्स्यपालन आणि पालेभाज्या या दोहोंची सांगड तुमच्या शेती व्यवसायाला उद्योजकतेचा दर्जा देईल यांत शंका नाही!

उद्योगक्रांती..

Empowering Business

Empowering Nation

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..