प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हवे ते कष्ट उपसतात. त्यांना चांगली शाळा, चांगली खेळणी आणि जे हव्या त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. का? तर आपल्या मुलाला कशाचीच कमी पडू नये, त्याने शिकून खूप मोठं व्हावं, यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू असते. पण, एक महत्वाची गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटून जाते.
होय, ती आहे आर्थिक साक्षरता. जी शाळेतही शिकवल्या जात नाही. त्यामुळे शिक्षणानंतर नेमकं काय करायचं, कशासाठी करायचं, यातच अनेकांचा गोंधळ होतो. हा गोंधळ एकाही मुलांच्या डोक्यात येऊ नये, मुलांना लहानपणातच या गोष्टी समजाव्यात. म्हणून व्यंकटेश फाऊंडेशनने अर्थसाक्षर चळवळ सुरू केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांना सहाय्य करण्यात आहे.
या खास उपक्रमांचा लाभ गाव-शहरातील प्रत्येकाला मिळावा, यासाठी संस्था प्रचंड मेहनत घेत आहे. विशेषत: शाळेत जाऊन, त्या मुलांना अर्थसाक्षरता काय आहे, ती कशी प्राप्त करायची याचे धडे देण्यात येत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना बॅंकिंग काय आहे. तिचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे. याचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांना थेट दाखवण्यात येते.
या खास उपक्रमांसह अनेक मुलांचा शैक्षणिक प्रवास सोपा व्हावा, यासाठी आपणही या चळवळीचा भाग होऊ शकता. म्हणून आपल्याला जी जमेल ती देणगी देऊन, या अर्थसाक्षर चळवळीचे साक्षीदार व्हा..