• Ahilyanagar 414003
  • info@venkateshfoundation.org
  • +91 9804041111

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

आपल्या गुणांचं कौतुक होणं, हे आपल्यातील उत्साह वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यातून नवी दिशा, नवे मार्ग आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते. ही बाब सर्वांनाच लागू होते. मात्र, विद्यार्थ्यांवर याचा जास्त प्रभाव पडतो. म्हणूनच दरवर्षी व्यंकटेश फाऊंडेशनच्या वतीने १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठा सन्मान सोहळा साजरा करण्यात येतो.

व्यंकटेश फाऊंडेशनच्या स्थापनेपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तसेच, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी. यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरं राबवून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. विद्यार्थांनी युवा अवस्थेपासूनच आपले ध्येय ठरवून, त्यासाठी प्रचंड मेहनत करावी. तसेच, आपले भविष्य उज्ज्वल करून, बुलंद भारताच्या बांधणीत आपले योगदान द्यावे. म्हणूनच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांचं मनोबल वाढण्यास मदतही होत आहे. हा उपक्रम आणखी मोठा करण्यासाठी आर्थिक मदत करून, या उपक्रमात आपला सहभाग नोंदवा..

विद्यार्थ्यांचा केला सन्मान

6660

उत्तम भविष्यासाठी आपली सोबत आवश्यक..!

आपल्या मदतीतून बदल घडवा

व्यंकटेश फाऊंडेशनला 12A आणि 80G अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. आपल्या डोनेशनवर नियमानुसार करामध्ये सवलत मिळू शकते.