• Ahilyanagar 414003
  • info@venkateshfoundation.org
  • +91 9804041111

शेतकरी विकास

शेतकरी हा राजा आहे. हे आम्ही म्हणतोही आणि मानतोही! आज शेता-शिवारात राब-राब राबणारा शेतकरी भारताचा कणा आहे. शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी व्यंकटेश फाऊंडेशनने काही ठोस पावलं उचलली. स्पष्ट आराखडा तयार केला. अगदी मुळापासून सुरुवात केली. गावोगावी त्याची अंमलबजावणी केली आणि चित्र बदलायला लागलं. हाती घेतलेल्या कामांना यश मिळू लागलं.

शेतकरी बांधव आपल्या पारंपरिक शेतीबरोबरच नव्या गोष्टी शिकण्यासाठी पुढाकार घ्यायला लागले. आपले उत्पन्न वाढावे यासाठी नवी दिशा पाहू लागले. नेहमीच्या शेतीबरोबरच अजून नवे जोडधंदे कसे सुरु करता येतील हे आम्ही सांगण्यासाठी विविध शिबिरे घेत आहोत. आपल्या शेतातील माल केवळ भारतातच नव्हे तर विदेशी बाजारपेठेत जाऊ शकतो. हे आम्ही त्यांच्या मनावर ठसवत आहोत. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आणि अत्यंत मागणीची असल्यामुळे त्यातही सुजलाम सुफलाम भविष्याचे चित्र रंगवू लागलो.

व्यंकटेश फाउंडेशनने शेतकऱ्यांना केवळ स्वप्नच दाखवली नाहीत तर त्यांच्या असलेल्या असीमित शक्यतांचा परिचय देखील त्यांना करून दिला. दिवसेंदिवस ही कृषी चळवळ अधिक वाढत आहे. शेतकरी नव्या युगाशी जोडला जात आहे. हे कार्य अखंडपणे चालणारे आहे. कधीच न संपणारे. पण नित्य नवे बदल घडवणारे. धरणी मातेचे ऋण तर कधी फिटणार नाहीत पण अशी सेवा करून मिळणारी संतुष्टी काही अनोखीच.

उत्तम भविष्यासाठी आपली सोबत आवश्यक..!

आपल्या मदतीतून बदल घडवा

व्यंकटेश फाऊंडेशनला 12A आणि 80G अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. आपल्या डोनेशनवर नियमानुसार करामध्ये सवलत मिळू शकते.