• Ahilyanagar 414003
  • info@venkateshfoundation.org
  • +91 9804041111

महिलांना केलं स्वावलंबी

कोणत्याही परिस्थितीला खंबीरपणे हाताळून त्यातून मार्ग काढण्यात महिला वर्ग आघाडीवर असतो. ज्यांच्याशिवाय घराचंच काय पूर्ण जगाचं पान हालत नाही. अशा माता-बहिणींना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन मोठ्या ताकदीने कार्यरत आहे.

व्यंकटेश फाऊंडेशनच्या या कामगिरीमुळे आज गावागावातून महिला उद्योजक व व्यावसायिक निर्माण होत आहेत. यासाठी महिलांना उद्योग उभारण्यासाठी किंवा व्यवसाय थाटण्यासाठी संस्थेच्या वतीने विविध प्रशिक्षण शिबिरं राबवण्यात येत आहे. यातूनच महिलांना अनेक कल्पना सूचत असून त्या कल्पनांवर आम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे. आपल्या माता-बहिणींसाठी काही तरी करता येत आहे.. याचा हा आनंद वेगळाच आहे.

फक्त महिलांना सक्षम करणे इतकेच आमचे ध्येय नाही, तर त्या निरोगी आणि आनंदी देखील असल्या पाहिजेत यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरं राबवण्यात येत असतात. आपल्याला आणखी अधिक महिलांपर्यंत पोहचून त्यांना स्वावलंबी करायचं आहे… कारण ते स्वावलंबी झाल्या म्हणजे देश आणखी प्रगती करेल.. म्हणून आपल्याला जी जमेल ती देणगी देऊन, महिलांना स्वावलंबी करण्याच्या लढाईत आपला सहभाग नोंदवा..

महिलांनी रोवला विजयी झेंडा

उद्योजक महिला व्यावसायिक महिला महिलांना दिला रोजगार

उत्तम भविष्यासाठी आपली सोबत आवश्यक..!

आपल्या मदतीतून बदल घडवा

व्यंकटेश फाऊंडेशनला 12A आणि 80G अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. आपल्या डोनेशनवर नियमानुसार करामध्ये सवलत मिळू शकते.