आरोग्य जरा जरी बिघडलं की प्रत्येकाला टेन्शन येत, की आता पुढे काय? कारण, सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांच्या इमारती, तिथं मिळत असलेल्या सुविधा सर्वांच्याच बजेटमध्ये नसतात. याशिवाय सरकारी सुविधा शहरांच्या ठिकाणी असून तिथे असणारी गर्दी, तिथे जायला लागणारा खर्च यामुळे अनेकांना ते परवडण्यासारखे नसते. त्यामुळे रूग्णालयात जायचं की नाही येथूनच खरी सुरुवात होते. बऱ्याच जणांना ते शक्यही होत नाही. म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन गावोगावी जाऊन आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा पोहचवत आहे.
तसेच, अशा उपक्रमांमध्ये आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहेत. यामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. या उपक्रमामुळे देशातील आरोग्य व्यवस्था बळकट होण्यासही मदत मिळत आहे. कारण, आपल्या देशातील वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा पोहचणं कठीण आहे. म्हणून फाऊंडेशनच्या वतीने सातत्याने आरोग्य शिबिरं राबवले जात आहे. या आरोग्य शिबिरांमुळे महिला, पुरुष, वृद्ध तसेच मुलांनाही उत्तम आरोग्य सेवा दिल्या जात आहे. कारण, एकदा आरोग्य बिघडलं आणि वेळेवर उपचार मिळाले नाही की, पुढचं सर्व अवघड होत.. म्हणून आपल्याला जी जमेल ती देणगी देऊन, आमचा आरोग्याचा लढा अधिक बळकट करा.